Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी | Success Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी शक्तिशाली प्रेरणादायी सुविचार (Powerfull motivational quotes in marathi) जे तुम्हाला आयुष्यात नक्की कामी पडेल. 

150+ आत्मविश्वास सुविचार मराठी


अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.


अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.


आपण जे पेरतो तेच उगवतं.


आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.


motivational quotes in marathi

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !


आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.


उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.


उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.


उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.


उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.


एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.


कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी


कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.


कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.


कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !


कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.


केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.


खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.


खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.


खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.


गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.


गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.


"जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!"


जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.


motivational quotes in marathi for success

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.


जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.


जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो.


"जो मुलांचे मन जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो. "


"ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही , त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही"


ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.


inspirational quotes in marathi

टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.


ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर


तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.


"तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा …"


तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !


थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.


दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका.


"ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे ."


नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.


पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.


पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.


प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !


"प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी"


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.


प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.


प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं.


भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले


मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.


माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.


माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.


मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.


मोठेपणाची इच्छा असेलतर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करु नका.


मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.


यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.


या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.


रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !


लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.


वचन देताना विलंब करा, पण पाळताना घाई करा.


विजय हाच शौर्याचा अलंकार आहे.


विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.


व्देष, कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका.


शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.


शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.


"शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे, शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे. "


श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.


"संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय ."


सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा; परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.


समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो


सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


सर्वव्यापी चैतन्य हे जगाचे मूळ रुप आहे.


सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.


सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही. 


स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.


स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.


हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.


ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते , पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की , तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते


स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर… त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..


एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.


खरी श्रीमंती शरीराची , बुद्धीची आणि मनाची


"हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!"


चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..


वाईट घटनांशी अथवा दु:खद क्षणांशी सामना करायची तेवढी हिँमत देखिल असली पाहीजे. जर कठीण परिस्थितीशी सामना करताच येत नसेल तर आयुष्याच्या नव्या प्रकरणाला सुरवात करताच येणार नाही.


परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा..


"आयुष्य जगण्याच्या २ पध्दती: पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी - जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका."


"आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. "


ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.


"स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो ..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात ..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं .."


"सुंदर दिवसाची सुंदर सुरवात, नाजुक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वारयाचीहळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ...."


"जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! "


"तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !"


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.


एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?


यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !


"रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा. "


"एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो"


जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ''परमेश्वर '' हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!


"विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे "


आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.


स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत


उठा ! जागृत व्हा !! जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका


"""मी 'कोणापेक्षा ' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही , पण मी ' कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!"" "


"अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. "


"उत्साह हेच सर्वकाही आहे फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे. "


"एखादी वस्तू वापरली नाही कि ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते… काहीही झाल तरी शेवट तर ठरलेलाच आहे … मग कोणाच्याही उपयोगात न येता गाजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजण केव्हाही उत्तमच ….!! "


"जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण, उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात..."


"आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं.... ही भावना जास्त भयंकर असते.... प्रयत्न करत रहा.... "


"सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं"


"आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं"


"भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कमाल लागल पाहिजे ."


"जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे "


चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल


प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते


"तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता "


प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा


"व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा "


"दुबळी माणस भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणस भूतकाळातून शिकत असतात "


भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.


स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.


ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.


चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.


शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.


आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.


नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.


विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.


स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.


कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.


जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.


मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.


बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.


खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?


या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.


“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..


यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.


माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.


आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..


शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.


कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.


कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.


सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.


मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.


आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.


स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.


चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.


विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.


सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.


नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.


अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.


जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.


मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.


जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.


मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.


कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.


कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.


प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …


न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.


कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.


नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.


छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.


तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.


व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.


विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.


ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.


कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.


श्रम संपले म्हणजे आनंद होतो.


मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.


लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.


भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.


आपण श्रद्धेवर जगत असतो.


सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.


रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.


जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.


काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.


पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.


जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.


जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.


स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही


जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो


माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.


कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.


आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.


सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.


सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.


एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.


सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.


घाबरटाला सारेच अशक्य असते.


माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.


श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.


सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.


चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.


उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.


साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.


आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.


दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.





Post a Comment

Previous Post Next Post