chan chan goshti marathi

खाली तुमच्या साठी काही लहान मुलांच्या छान छान गोष्टी (Chan Chan Goshti) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल.


छान छान गोष्टी मराठीत - Chan Chan Goshti Marathi

1. दुकानदार आणि हत्ती

एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत.सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्यला जीव लावत असे. हत्ती रोज साकळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. 

दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत-मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्याप्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत.लोक हत्तीचे कैतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. 

रोजच्या सवयी प्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्यावजी त्यच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदारने कारण नसतानाही स्वताचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखवला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढयाच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. 

हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला .हत्तीने ते घाणरडे पाणी दुकानदार , फुले आणि हरांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला. त्याला स्वताची चूक कळून आली. मात्र त्यसाठी त्याला मोठी किमंत मोजावी लागली.

 तात्पर्य - जसाच तसे.

संस्कार कथा मराठीत  | Sanskar Katha in Marathi

2. स्वार्थी मित्र

एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे. 

 ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो. 

अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो. 

थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ' अस्वलाने तुला काय सांगितले रे '..? त्यावर शाम उत्तर देतो की , ""त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली. 

तात्पर्य - संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र

इसापनीती कथा | Isapniti Stories in Marathi

3. हुशार कोल्हा आणि धूर्त कावळा

एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते. 

 तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, 

त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला ! 

तात्पर्य:- आपल्या खोटया प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात, ते शेवटी बहुत करून फसतात.

महाभारत कथा मराठीत | Mahabharat Stories in Marathi

4. गाढवाचे किंकाळाने

एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते. परंतु कुंभार गरीब असल्यामुळे गाढवाला पुरेसे खायला देऊ शकत नसे. 

एक दिवस कुंभार जंगलातून जात असताना त्याला एक वाघ उपाशी झोपलेला दिसतो. कुंभार त्याचा जवळ जातो, पाहतो तर तो वाघ मेलेला असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो दिवसभर वाघाचे कातडे काडतो आणि घरी घेऊन येतो. रात्री कुंभार वाघाचे कातडे गाढवाच्या पाठीवर टाकतो आणि गाढवाच्या कानात सांगतो, जा आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक रात्रभर खा. 

ते तुला वाघ समजतील. ते तुला घाबरून पकडायला येणार नाहीत. तुला पकडण्याचे धैर्य त्यांना होणार नाही. अशा प्रकारे दररोज रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतात पिक खात असे. एका रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक खाण्यात मग्न होते. त्याच वेळी त्याने गाढवीणीच्या ओरडण्याचा आवाज ऎकला. 

लगेचच तो देखील किंचाळून प्रतिसाद देऊ लागला. सर्व शेतकऱ्यांना खरा प्रकार समजला. ते शेतकरी गाढवाला चोप देतात. आपण जे नाही ते दाखवायला गेल्यामुळे गाढवाने मार खाल्ला. 

 तात्पर्य - आती शहाणा त्याचा बैल रिकामा

लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids

5. द्राक्षे आणि कोल्हा

एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते. शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. 

सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो, ही फळे चवदार दिसत आहेत. मला ती पाहिजेत. कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो. द्राक्षे खूप उंचावर असतात. 

त्याच्या पोहंचण्यापलीकडे उंच लटकत होती. त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु तो द्राक्षापर्यंत पोहचू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात. काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला. त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला, कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे? मला तर नकोतच..! असे म्हणून तो तेथून निघून जातो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार कारण खूप सोप्पं असतं. 

 तात्पर्य - अंथरून पाहून पाय पसरावे.

अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

6. सुतार आणि माकड

एका जंगलामध्ये सुतार लाकूड तोडायला जात असे. त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती. एके दिवशी सुतार लाकूड तोडत असताना काही माकडांनी पहिले. 

त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले. दुपारच्यावेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो. त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते, म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो. 

जेव्हा माकड त्या सुताराला पहातो आणि घाबरून जातो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो परतुं , त्याच वेळेस माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते आणि त्या माकडाला पळून जाता येत नाही. सुतार तिथे पोहचल्यावर त्याला माकड दिसते. माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो. 

 तात्पर्य -आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.

तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

7. हुशार नावाडी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला प्राणी पाळण्याचे खूप आवड होती. त्याच्याकडे शेळी, सिंह ,मेंढ्या , गाय अशाप्रकरे अनेक प्राणी होते. त्या शेतकऱ्याच्या घराजवळ एक नदी होती. एके दिवशी शेतकरी शेतातून येत असताना त्याच्याकडे शेळी, सिंह आणि गवताची पेंढी असते परंतु त्या दिवशी त्या नदीला पूर आलेले असतो. 

त्या शेतकऱ्याला काही सुचत नाही कस जावे नदी पार करून हा प्रश्न त्याच्यासमोर पडतो. तेव्हा त्या शेतकऱ्याला एक नावाडी नाव घेऊन येताना दिसतो . तो त्या नावाड्याला बोलवून घेतो व सांगतो ह्या तीन गोष्टी आहेत. त्या तीन गोष्टी व्यवस्थित पोहोचवल्या तर मी तुला बक्षीस देईल. 

तो नावाडी विचार करू लागतो मग घेऊन जाण्यासाठी तयार होतो. जर नावाड्याने गवत पहिल्यांदा घेतलं तर सिंह शेळीला खाऊन टाकेल. जर सिंहाला घेतलं तर शेळी गवत खाऊन टाकेल प्रश्न पडतो. नावाडी हुशार असल्यामुळे तो विचार करतो आणि कामाला सुरुवात करतो. नावाडी नावेत पहिल्यांदा शेळीला घेतो. तिला दुसऱ्या टोकाला सोडून येतो नंतर तो सिंहाला घेतो. 

सिंहाला दुसऱ्या टोकाला सोडतो आणि शेळीला स्वतःबरोबर घेऊन परत या तीराला येतो. त्यानंतर तो शेळीला तिथेच ठेवतो आणि गवताची पेंढी दुसऱ्या टोकाला घेऊन जातो. सिंह आणि गवताची पेंढी एकत्रित ठेवतो. पुन्हा शेळीला आणण्यासाठी निघतो. शेतकरी खुश होतो. तो नावाड्याला बक्षीस देतो. 

तात्पर्य - विचार करून काम केले तर अशक्य गोष्ट पण शक्य होते.

मराठी प्रेम कथा | Love Stories in Marathi

8. कबुतर आणि भांडखोर कोंबडे

एके काळची गोष्ट आहे. एक माणूस एका गावात राहत होता. त्याच्याकडे दोन कोंबडे होते. एक दिवस तो बाजारातून येत असताना त्याला एक माणूस कबुतर पक्षी विकत असताना दिसतो. 

त्याने विचार केला माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल आणि त्यांना छान वाटेल. त्याने तो कबुतर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला. त्याने कबुतर पक्षाला कोंबडयांबरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण कोंबडे कबुतर पक्षाला त्रास देत असत.

कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या चोचींनी मारत होते. एकदा कबुतर पक्ष्याने विचार केला की, हे मला का त्रास देतात. मी यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे आसे समजून हे माझ्याशी वाईट वागतात. एक दिवस कबुतर पक्ष्याने पहिले की, ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये भांडण करत असतात. 

एकमेकांवर आपल्या चोचींनी वार करत आहे. तेव्हा तो स्वतःशीच म्हंटला की, मला यांच्या वागण्याचे दुख वाटून घेता कामा नये. मला यांच्या वागण्याची तक्रार पण करायला नको. हे मला चोचींनी मारत आहेत. मी हे पाहू शकतो की, हे एकमेकांमध्ये देखील लढाई करू शकतात. हा तर त्यांचा स्वभावच आहे. आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही. 

तात्पर्य - जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

भुतांच्या गोष्टी  | Horror Stories in Marathi

9. भित्रा व शूर मित्र

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर दोन मित्रांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचवण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्त्र करतो. 

हे पाहून डरपोक, भित्रा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेलं असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हटला 'थांब आता मी तुला माझी बहादुरी दाखवतो. त्याला माहित होते की,चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता. त्यामुळे भित्र्या मित्राने परीस्थितिचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला. 

शूर मित्र त्याला म्हणला, तू आता शौर्याचे नाटक नको करूस. स्वत:ची हातातील लाकूड फेकून दे. तू अशा वागण्याने दुसऱ्यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खंर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता. 

मी पहिले आहे तू किती भित्रा आहे. तू तुझा जीव वाचवून पळून गेलास. कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे एकूण भित्रा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला. 

तात्पर्य -विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नये

मराठी लघु कथा | Marathi Laghu Katha

10. कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. 

थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी न कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल. 

लाकुडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटविलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दुध पाजिले. थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले. लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता. 

एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजराण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला. हे पाहून लाकुडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. 

ज्या लाकुडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला. 

तात्पर्य- उपकाराची फेड अपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते.

बोध कथा मराठीत | Bodh Katha Marathi 

11. दृष्ट मांजर

जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती.

पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते. मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत होती. एक दिवस तिच्या डोक्यामध्ये एक दुष्ट कल्पना आली. 

मांजराने घारीला बोलवले. मांजर घारीला म्हणाली, ""हे बघ डुकरीण झाडांची मुळे उकरत आहेत. लवकरच हे झाड पडेल आणि डुकरीण तुझ्या पिल्लांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते . घार हे ऐकून खूपच घाबरली. नंतर मांजर डुकरीणीकडे गेली आणि तिला म्हणाली, ""तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा घार तुझ्या पिल्लांना खाऊन टाकणार आहे. 

मी तिला तसे म्हणताना ऐकले आहे.' डुकरीण पण घाबरली. त्या दोघी घाबरून आपल्या घरातून बाहेर पडल्याच नाहीत. एके दिवशी दोघी भुकेने मारून गेल्या. अशा प्रकारे पूर्ण झाडावर मांजर एकटी राहू लागली. मांजरीने त्या दोघींना आपापसात घाबरूनच मारून टाकले. 

तात्पर्य -शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

12. हुशार मुलगा आणि चोर

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, आपल्या इतके हुशार कोणीच नाही. यथे मला मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कोठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाले नाही . 

एके दिवशी चोराने एका विहिरीजवळ एका मुलाला पहिले. तो मुलगा रडत होता. चोराने त्याला विचारले, ""तू का रडत आहेस?"" मुलाने त्याला दोरीचा एक तुकडा दाखवून म्हटले की, ""या विहिरीत, माझी चांदीची बादली पडली आहे."" चोराने विचार केला, ""पहिली मी याची बदली काढून देतो. 

मग याची बादली चोरुयात"". विचार करून चोर मुलाला म्हणाला ,""तू रडणे थांबव"" मी बादली शोधून काढतो. त्याने कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. त्याने बादली शोधली, पण त्याला तिथे काहीच मिळाले नाही. जेव्हा तो विहिरीतून बाहेर आला.

त्याने पहिले की, मुलगा त्याचे सगळे कपडे घेऊन गायब झाला होता. त्याने चोराला मूर्ख बनवले होते व चोर स्वताच फसला होता. 

 तात्पर्य- गर्वाचे घर खाली.

13. गर्विष्ठ गाढव आणि एक कुत्रा

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जानावारांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते. 

मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता. ते जंगलातून जात असताना तो माणूस थकलेला असल्यामुळे थोडा वेळ आराम करण्यासाठी जंगलात एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप लागली. 

गाढव गवत खायला लागला. कुत्रा गाढवाला म्हंटला,""कृपा करून थोडा खाली वाक""मी तुझ्या पाठीवर असणाऱ्या पोत्या मधून थोडेसे खायला घेतो. मला खूप भूक लागली आहे. गाढवा त्याला म्हटला,""आपल्या मालकाला उठू देत, ते तुला काहीतरी खायला देतील."" कुत्रा गुपचूप झोपला. 

अचानक तेथे का लांडगा आला आणि तो गाढवावर तुटून पडला. गाढव कुत्र्याला म्हणाला,""मित्रा, कृपाकरून माझे प्राण वाचव.""कुत्र्याला बदला घेण्यासाठी आयती संधी मिळाली होती. कुत्रा त्याला म्हंटला ,""आपल्या मालकाला उठू देत तो तुला वाचवेल. ""गाढव जसा वागला होता. तसेच कुत्र्याने पण उत्तर दिले. 

तात्पर्य-करावे तसे भरावे याची प्रचीती त्याला आली.

14. पती,पत्नी आणि गाढव

एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात . एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला,पहा!पत्नी गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे.

हे ऐकताच पत्नी खाली उतरते आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला . तेवढ्यात कोणी तरी म्हटले, अरे व्वा!बिचारा पत्नी पायी येत आहे आणि तू गाढवावर बसला आहेस? तुला लाज नाही वाटत? तिच्या पतीला काहीच सुचेना की काय करावे.लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून पती आणि पत्नी दोघेही एकदमच गाढवावर बसले. 

काही वेळाने एका मुलीने त्या तिघांना पहिले. मुलगी म्हणाली, केव्हापासून तुम्ही दोघे गाढवावर बसला आहात? जरा गाढवाला आराम द्या की! लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकूनत्यामुळे तिघेपण पायी चालू लागले. 

 ते पायी चालत आहे हे एका माणसाने पहिले तो म्हणू लागला कि,गाढव असून पण पायी चालत आहे . 

तात्पर्य- आपण योग्य मार्गावर आसू तर आपण लोकांच्या उल-सुलट प्रतिक्रियांकडे लक्ष देता कामा नये.

15. गोंधळाचे राज्य

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात, खूप गोंधळ असतो. लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांचे ऐकत नसतात. कोणाचा कोणावर विश्वास नसतो. देशात चोरांचे प्रमाण वाढते. राजापण या सगळ्या गोष्टी मध्ये सहभागी असतो. 

त्याचे त्याच्या प्रजेकडे लक्षच नसते. स्वर्गातून देव हे सगळ पाहत असतो. देवाला ते सगळ पाहून खूप वाईट वाटत. मग देव ठरवतो या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा म्हणून देव एका जंगल प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अक्राळ-विक्राळ कुत्रा घेऊन जातो. 

 कुत्रा लोकांच्या अंगावर जोरजोरात भुंकत असतो, भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात. लोकांच्या ओरडण्याचा आवज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर, एक भयंकर कुत्रा त्याच्या मालकाबरोबर उभा असतो. 

 तो माणूस राजाला म्हणतो, 'माझा कुत्रा भुकेलेला आहे आणि ज्या लोकांनी पाप केले आहे त्यांना तो खाऊन टाकणार आहे. 'राजा घाबरतो. गयावया करू लागतो. राजा आणि देशातील सर्व लोक त्यंची माफी मागू लागतात. जंगलाचा राखणदार त्याच्या खऱ्या रुपात म्हणजेच देव रुपात येतो. सर्वजण देवाची क्षमा मागतात. आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात. 

तात्पर्य - नेहमी चांगले वागावे.

16. चांगला माणूस आणि दृष्ट माणूस

एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. 

पण एक दृष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसर्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दृष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो. तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो . 

 चांगल्या माणसाच्या लक्षात येते कि आपण लावलेला दिवा कोणीतरी येवून विझवून जात आहे. मग तो माणूस विचार करतो कि आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही. एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पुजा करण्यासाठी मंदिरात जात नाही पण दृष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दृष्ट माणसाला देव प्रसन्न होतो . कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो . 

तात्पर्य - नित्यनेमेने काम केल्यास फळ मिळते.

17. हुशार बेडूक

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. 

राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात कि तलावात त्यांना न आवडणारा एक बेढब प्राणी आहे. राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो कि त्या बेढब प्राण्याला मारून टाका. 

तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वांच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृध्द शिपाई सांगतो कि 'त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल.'ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले मला पाण्यात फेकू नका नाहीतर मी मरून जाईन.' 

बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते 'या मूर्ख लोकांना माहित नाही कि, मी पाण्यात किती सुरक्षित आहे.' 

 तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

18. राक्षस आणि राजा

एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो 'आता मी तुला खाणार आहे.' राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन. राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. 

राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस? राजकुमार त्याला म्हणतो,' माझ्या पोटाच्या बेंबीत हिरा आहे आणि तेच माझ मोठ शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तर तू देखील मरणार. त्यामुळे मला तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. 

 हे सर्व राक्षसाला खरच वाटले आणि तो राजकुमारला सोडून देतो: परंतु प्रत्यक्षात राजकुमारच्या पोटात हिऱ्याचे शस्त्र वगैरे काहीच नसते.ते राजकुमारने केलेले एक नाटक असते शेवटी त्याला त्याचे हजरजबाबिपनाचेच शस्त्र वाचवते. 

तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

19. खरा न्याय

एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. 

शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. 

तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. 

शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो. राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो. 

तात्पर्य -खरा न्याय करावा.

20. दोन मित्र

एका गावात रघु आणि श्याम नावाचे दोन शेतकरी असतात. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असतात. एक दिवस रघु काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार असतो म्हणून तो त्याचा शेत नांगरण्याचा नांगर श्यामकडे ठेवून जातो.

दुसऱ्या दिवशी श्याम नांगर विकतो व त्याचे पैसे मिळवतो. काही दिवसांनी रघु त्याचे काम संपवून श्यामकडे नांगर घ्यायला जातो. श्याम त्याला म्हणतो ' नांगर उंदराने खाल्ला' . श्यामचे हे विचित्र उत्तर ऐकून रघुला धक्काच बसतो. तो श्यामला धडा शिकवण्याचे ठरवतो. त्याच दिवशी संध्याकाळी रघु श्यामच्या मुलाला स्वत:च्या एका मित्राकडे नेतो. मित्राच्या घरी ठेवतो आणि त्याला सांगतो, कि जो पर्यंत मी परत येत नाही तो पर्यंत या लहान मुलाला तुझ्या घरी ठेव'. 

 रात्री उशिरा श्याम रघुला त्याच्या मुलाबद्दल विचारतो तेव्हा राम म्हणतो, ' एक पक्षी येउन तुझ्या मुलाला घेऊन गेला. ' श्याम त्याला चिडून म्हणतो पक्षी कसा काय मुलाला उचलू शकतो? त्यांचे भांडण मिटता मिटत नाही. श्याम रागाने न्यायालयात जातो. 

न्यायाधीशांना सर्व हकीकत सांगतो. न्यायाधीश रामला विचारतात, 'एखांदा पक्षी मुलाला कसा काय घेऊन जाऊ शकतो? हे कस शक्य आहे? रघु न्यायाधीशांना म्हणतो ' जर पक्षी मुलाला घेऊन जाऊ शकत नाही तर मग उंदीर नांगराला कसा काय खाऊ शकतो? न्यायाधीशांना रघु काय बोलत आहे काहीच समजत नाही आणि ते त्याला म्हणतात,' तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? रघु त्यांना नांगराची हकीकत सांगतो. 

 न्यायाधीशांना समजते कि नक्की काय गडबड झाली. न्यायाधीश श्यामला सांगतात ' रघुला त्याचा नांगर परत दे, तो तुझा मुलगा तुला परत देईल. 

तात्पर्य - कोणाचाही विश्वास तोडू नये.

Post a Comment

Previous Post Next Post