तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत मराठी निबंध, सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "मी सैनिक बोलते" किंवा "सैनिक चे मनोगत" किंवा "युद्धात अपंग झालेल्या सैनिकाची कैफियत" मराठी निबंध.
युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत निबंध
आज राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला, तेव्हा त्या क्षणी आनंद व दुःख अशा संमिश्र भावना माझ्या मनात दाटून आल्या. तुम्हांला नवल वाटेल कौ, एवढा सन्मान झाल्यावर दुःखाची भावना का? त्याला कारण आहे. माझी महत्त्वाकांक्षा काय होती आणि आज माझा सत्कार कशासाठी होत आहे ! सांगतोच माझी कथा.
अगदी लहानपणापासून मी एक आकांक्षा जपली होती. मला देशाचा सैनिक व्हायचे होते. सैन्यात मोठे अधिकारी होऊन मला परमवीरचक्र मिळवायचे होते. ते स्वप्न माझ्या नेहमी ध्यानीमनी असे. त्यामुळे बारावी पास झाल्यावर मी एन.डी.ए.त जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मला कोणीही विरोध केला नाही. मनासारखे शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूश होतो. त्यामुळे उत्तमरीत्या शिक्षण घेऊन मी सेन्यात केव्हा भरती झालो, ते मला कळलेच नाही. सैन्यात सतत शिक्षण चालू होते. त्यांत मी टप्प्याटप्प्याने पुढे जात होतो. वरच्या पदावर जाता जाता मी अधिकारीपदावर गेलो. पण, वीरश्री दाखवण्याची हौस अजूनही भागली नव्हती.
ती संधी पण लबकरच मिळाली. भारत-पाक युद्ध सुरू झाले आणि आपली वीरश्री दाखवण्याची संधी मला मिळाली. तुंबळ युद्ध झाले. त्या वेळी मी रणगाड्यावर होतो. आम्ही शत्रूवर दणदणीत विजय मिळवला, पण परतत असताना शत्रूने पेरलेल्या सुरुंगाचा स्फोट झाला. मी दूरवर फेकला गेलो. काय घडतंय हे समजण्यापूर्वी मी बेशुद्ध झालो.
शुद्धीबर आलो, तेव्हा मी रुग्णालयात होतो. महिन्याभराचा काळ गेला होता. पण जाणीव आल्यावर कळले की आपण आपले दोन्ही पाय गमावले आहेत. मला तो धक्काच बसला. आता संपले ! आता आपण परत रणभूमीवर जाऊ शकणार नाही, ही गोष्ट फार वेदनादायक होती. पण मी सैनिक होतो. लढवय्ये मन घेऊन जन्मलो होतो. निराशा झटकून टाकली. स्वतःला लवकरच सावरले. मी कोणताही गुन्हा केला नव्हता. मी देशासाठी लढताना दोन्ही पाय गमावले, हे खरे. पण देशाला विजय मिळवून दिला होता ! मग मी निश्चय केला. माझ्यासारखे अनेक अपंग मला आजूबाजूला दिसत होते. कोणी देशासाठी लढला होता; तर कोणी समाजासाठी कार्य करताना अपंग बनला होता. कोणी अपघातामुळे, तर कोणी जन्मतःच अपंग झाला होता. मी ठरवले... आता अपंगत्वाविरुद्ध लढायचे !
मग माझ्या मनाने उभारी घेतली. मी अपंगांसाठी संस्था सुरू केली. त्यांना मदतीचा हात दिला. त्यांना स्वावलंबी करण्याचा यत्न केला. अपंग करू शकतील, असे व्यवसाय शोधले. यश मिळत गेले, तसे माझे काम वाढत गेले. मग अपंगांसाठी क्रीडास्पर्धा सुरू केली. ठिकठिकाणचे अपंग एकत्र आले. अपंगांसाठी सहली आयोजित केल्या. अपंगांनी पर्वत आक्रमला. हळूहळू या कामाचा गाजावाजा झाला ब आज राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला. अनेक अपंगांना मी खऱ्या अर्थाने त्यांच्या पायांवर उभे केले.
सैनिक म्हणून सत्कार व्हावा असे वाटत असताना आज सत्कार झाला तो समाजसेवेसाठी ! निराळ्याच लढाईतील सैनिक म्हणून आज माझा सत्कार होत होता !
युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत निबंध PDF
युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read
Post a Comment