तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो मी झोपडपट्टी बोलत आहे मराठी निबंध (autobiography of slum essay marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "मी झोपडपट्टी बोलत आहे" किंवा "झोपडपट्टी चे मनोगत" किंवा "झोपडपट्टी ची कैफियत" मराठी निबंध.
मी झोपडपट्टी बोलत आहे निबंध
मी झोपडपट्टी बोलत आहे. आज मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. किती आनंद झाला आहे ! एरवी माझं कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं. माझं नुसतं नाव निघालं, तरी लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात ! सगळ्यांना मी नकोशी!
काय करणार ? मी जिथे असते, तिथे दलदल, घाण असते. गटारं तुंबून वाहत असतात. सगळीकडे कचरा पसरलेला असतो. कुत्री, मांजरं, गाढवं ही कचर्याचा ढिगारा उपसत असतात. उघडीनागडी मुलं कचऱ्याच्या, गटाराच्या आसपासच खेळत असतात. भांडणं, शिवीगाळी यांचे आवाज येत असतात. घरं म्हणजे पत्र्याच्या भिती व पत्र्याचेच छप्पर ! किंवा ताडपत्रीच्या वा प्लास्टिकच्या तुकड्यांनी उभारलेली झोपडी. सांडपाण्याची व्यवस्था नसते. लहान लहान झोपडीत पाचपाच, दहादहा माणसे राहतात ! अपुरे अन्नवस्त्र, आरोग्याची हेळसांड व शिक्षणाचं तर नाव नाही ! या मुंबई शहरात एका बाजूला टोलेजंग ऐषारामी इमारती आणि त्यांच्याच बाजूला गलिच्छ झोपडपट्टी ! असे अत्यंत विद्रूप दृश्य जिथे तिथे दिसते.
एकंदरीत माझे हे असे काळेकुट्ट चित्र सर्वांना दिसते. पण काय करणार ? बाबांनो, मला स्वतःला हे असं ओंगळ रूप आवडतं का? माझ्या आश्रयाने राहणाऱ्यांना तरी हे गलिच्छ जीवन आवडत असेल का? पण काय हो, मला निर्माण तरी कोण करतं आणि का?कधी विचार केला आहे ? .
बाबांनो, माझ्या आश्रयाने राहणाऱ्या गरिबांनी मला निर्माण केलेले नाही. आपल्या देशातील विषमतेमुळे माझी निर्मिती झाली आहे. मूठभर लोक श्रीमंत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता व पैसा आहे, तेच मुजोर बनत आहेत. सर्व सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. खेड्यांमध्ये सर्वत्र दैन्य व दारिद्र्यच आहे. पोटभर अन्न मिळण्याची खात्री नाही. अंगभर वस्त्र नाही. साधं पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी मैलमैल वणवण करावी लागते. आरोग्याच्या सोयी नाहीत. शिक्षणाच्या सोयी नाहीत. दुष्काळ पडला कौ माणसे किड्यामुंग्यांसारखी मरतात. उरलेली जीव जगवण्यासाठी शहरांकडे धाब घेतात. तेथे रस्त्यांच्या वा गटारांच्या कडेला गलिच्छ आयुष्य मुकाटपणे स्वीकारतात !
मात्र, सगळ्यांना वाटतं हीच गरीब माणसे मला निर्माण करतात. खरं सांगा, ही पण माणसंच ना? त्यांना जगण्याचाही अधिकार नाही का? त्यांना हे गलिच्छ जीवन जगण्याची हौस आहे का ? खरं सांगते, माझं हे ओंगळ रूप नाहीसं व्हावं आणि या गरिबांना निर्मळ आयुष्य जगायला मिळावं, असं मलाही वाटतं. त्यासाठी समाजाने, सरकारने पुढाकार घ्यायला हवा. गरिबांच्या हातांना काम दिलं पाहिजे. त्यांच्या अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय केली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त भलं करणारं धोरण सरकारने आखलं पाहिजे. असं जेव्हा घडेल, तेव्हाच माझं हे ओंगळ रूप नाहीसं होईल. मला त्यातच आनंद आहे.
“महात्मा गांधींनी हेच सांगितले - Unto the last ही त्यांची घोषणा होती. समाजातल्या अगदी तळातल्या - शेवटच्या - माणसापर्यंत प्रगतीची फळे पोहोचली पाहिजेत, तरच देशाची प्रगती झाली, असे म्हणता येईल. हे महात्माजींचे मत होते. अजूनही आपण महात्माजींच्या मार्गाने गेलो, तरी झोपडपट्टी नष्ट होईल. माणसाला माणसासारखे जगता येईल. ''
मी झोपडपट्टी बोलत आहे निबंध PDF
झोपडपट्टी चे मनोगत निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read
Post a Comment