तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत मराठी निबंध, सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "मी महाविद्यालयातील विद्यार्थी बोलते" किंवा "महाविद्यालयातील विद्यार्थी चे मनोगत" किंवा "महाविद्यालयीन विद्यार्थ्यां ची कैफियत मराठी निबंध".
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत निबंध
महाबिद्यालयात शिकणारा मी एक सामान्य विद्यार्थी आहे. मला आठवतेय मी महाविद्यालयात आलो, तेव्हा या जीवनाचे इतरांनी मोठे ' फुलपाखरी जीवन ' असे वर्णन केले होते. महाविद्यालयीन जीवन म्हणजे ' मज्जाच मजा ' असेच चित्र बहुतेक जण रंगवतात. पण माझा अनुभव मात्र तसा नाही. महाविद्यालयात पाऊल टाकताना प्रथम माझ्यावर मात्र फार मोठे दडपण होते. शाळेतील बातावरण अगदी वेगळे होते. पूर्व-प्राथमिक वर्गापासून दहावीपर्यंत मी एकाच शाळेत होतो. त्यामुळे त्या शाळेशी आमचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. महाविद्यालयात हा जिव्हाळा मात्र मला कुठेच आढळला नाही. काही विद्यार्थी आपला कंपू करून असतात; पण ते बहुधा अभ्यासेतर गोष्टींसाठी. बरीचशी मुले आपला महाविद्यालयातील वेळ वर्गाबाहेर कट्ट्यावर किंवा केंटीनमध्ये घालवतात.
वर्गात विद्यार्थ्यांची संख्या एवढी असते कौ, आपण शिकवतोय ते या विद्यार्थ्यांनी कळत आहे की नाही, याकडे प्राध्यापक विशेष लक्षही देऊ शकत नाहीत. बहुसंख्य विद्यार्थी कुठे ना कुठे खाजगी वर्गांना जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयातील शिक्षण महत्त्वाचे वाटत नाही. जे विद्याथी कुठल्याही खाजगी वर्गाला 'जाऊ शकत नाहीत, त्यांचे मात्र नुकसान होते. त्याची कुणालाही तमा नसते. महाविद्यालयात वक्तृत्व, अभिनय, गायन, खेळ इत्यादी अनेक उपक्रम चालू असतात, पण सत्य सांगायचे, तर महाविद्यालयातील ठराबीक मुलेच त्यांत सहभागी होतात.
बहुसंख्य विद्यार्थी हे प्रेक्षक वा अलिप्त असतात; काही वेळेला तास ' बंक ' करण्याची टूम निघते, तर काही वेळेला सामुदायिक सुट्टी घेण्याचा कार्यक्रम आखला जातो. मात्र, महाविद्यालयातील विविध ' डे 'ज महाविद्यालयातील वातावरण उत्फुल्ल, रंगीबेरंगी बनवून टाकतात. त्या वातावरणात आम्ही सारे न्हाऊन निघतो. चॉकलेट डे, रोझ डे, ट्रॅडिशनल डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेन्टाईन डे इत्यादी विविध डे 'च्या निमित्ताने महाविद्यालयातील वातावरणाला बहर येतो.
महाविद्यालयात अनेक चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींची लागण लागलेली असते. बरीच व्यसने पसरलेली असतात. छुपेपणाने त्यांचा प्रसार चालू असतो. त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणे, हे काहीजणांना फार अवघड जाते. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी हे परीक्षार्थी असतात. ज्ञानार्थी विद्यार्थी तेथे कमीच आढळतात. हे खरे शिक्षण ठरेल का ?
दिवसेंदिवस महाविद्यालयीन शिक्षण हे अतिशय महाग होत चालले आहे. त्याबरोबरच हे शिक्षण घेतल्यावरही आपले भवितव्य उज्ज्वल होईल, याची विद्यार्थ्याला खात्री नसते. किंबहुना ' पदवी ' प्राप्त केल्यावरही अनेकदा तो ' बेकारी 'च्या प्रवाहात गटांगळ्या खात राहतो. मग त्याच्यापुढे प्रश्न उभा राहतो -' काय उपयोग या महाविद्यालयीन शिक्षणाचा ? ' ''
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत निबंध PDF
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read
Post a Comment