तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध, (Varkaryache manogat essay in marathi) सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

varkaryache manogat marathi nibandh

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "मी वारकरी बोलते" (mi varkari boltoy nibandh) किंवा "वारकऱ्याचे मनोगत" किंवा "वारकऱ्यांची ची कैफियत मराठी निबंध".


वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

मी एक वारकरी आहे. नुकतीच वारी पूर्ण करून आलो आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी वारी कधी चुकवत नाही. वारी करायचा शिरस्ता आणि ही तुळशीची माळ मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे. जर शेतीवाडी मला वंशपरंपरेने मिळत असेल, तर वडिलांची भक्ती, निष्ठा ही पण वंशपरंपरेने का मिळू नये ? पण एक गोष्ट नक्की -ही भक्ती काही मी आंधळेपणाने स्वीकारलेली नाही.

मी शेतकरी आहे, मला शेती करायला आवडते. मी सुशिक्षित आहे, पदवीधर आहे. तरी पण वारीला जायलाही मला आवडते. वारी हे सर्व वैष्णवांचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात आम्हांला मिळणारे -टॉनिक, जीवनसत्त्व हे आम्हांला वर्षभरासाठी पुरते. किंबहुना वर्षभरात येणाऱ्या विविध अडचणींवर आम्ही याच जीवनसत्त्वांमुळे मात करतो.

वारी हे महाराष्ट्राचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी लाखो भक्‍त आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. या दिंडीत सर्व जाती-धर्मांचे लोक असतात. सर्व वयाचे - अगदी वृद्धांपासून युवकांपर्यंत - सर्वजण वीस-एकवीस दिवस बरोबर असतात. सर्व गैरसोय सहन करतात. कारण त्यांना ती गैरसोय वाटतच नाही. त्यांची जात, त्यांचा धर्म एकच असतो. ते सर्वजण त्या एकाच पंढरीची लेकरे असतात. 

विठाई माउलीबरोबर ते ग्यानबा-तुकोबांचे सखे असतात. ज्ञानेश्‍वर, तुकाराम आणि इतर संतांचे अभंग गुणगुणत चालतात. त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचे कष्टही वाटत नाहीत. नाचत, गात, कोौर्तन करीत, वेगवेगळे खेळ खेळत. हे लाखो वारकरी जेव्हा एवढी वाट तुडबतात, तेव्हा ते केवळ भक्तिरूपच झालेले असतात. त्यामुळे या वारीच्या काळात आलेल्या अडचणी, आजारपण या सगळ्यांवर ते मात करू शकतात.

लाखो लोक एवढे एकदिलाने कसे एकत्र राहू शकतात, याचेच देशी-परदेशी लोकांना नवल वाटते. अनेक विद्वान, अभ्यासू लोकही या वारीत असतात. समाजशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे या स्वत: वारीबरोबर आल्या होत्या. त्यांनी, विठ्ठलाचा उल्लेख ' माय बॉयफ्रेंड ' असा केला होता. सर्वच वारकऱ्यांना विठोबा हा आपला ' सखा ' वाटतो आणि या सख्याला भेटायला जाताना ते आपले ' तनमनश्रम ' सर्व त्याच्या पायाशी अर्पण करून विठ्ठलमय होतात.

मित्रांनो, वारकरी आणि त्यांची दिंडी ही खरी भक्तीची पेठ आहे. मृग नक्षत्रावर शेताची पेरणी करून तो वारीला जातो आणि पंढरपूरच्या देवळाचा केवळ कळस पाहून देखील तो सुखावतो आणि मिळेल त्या वाहनाने परत फिरतो. कारण त्याचे शेत, शेतातील कामे त्याची वाट पाहत असतात. आल्या आल्या दुप्पट जोमाने तो कामाला लागतो. कोणत्याही इतर फळाची त्याला अपेक्षा नसते. कारण वारीचे फळ त्याला मनोमन मिळालेले असते. ''


वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध PDF

वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


Read

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत

युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत

खुर्ची ची आत्मकथा

एका जीर्ण पुस्तकाची कैफियत

एका पुतळयाचे मनोगत

Post a Comment

Previous Post Next Post