तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो मी रस्ता बोलतोय मराठी निबंध, सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "मी रस्ता बोलते" किंवा "रस्त्याचे चे मनोगत" किंवा "रस्त्याची कैफियत मराठी निबंध".
मी रस्ता बोलतोय मराठी निबंध
मित्रहो, आज मला अतोनात दुःख होत आहे. माझ्या अंगावर असंख्य खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे जावे तेथे सर्वत्र वाहतुकीचा खोळंबा ! अपघातांच्या मालिका ! आणि तुम्ही सर्व लोक या गैरव्यवस्थेला मलाच जबाबदार धरून माझ्या नावाने ओरडत आहात ! हे ऐकून मला किती यातना होत आहेत ! खरे सांगा, या अनागोंदीला मी जबाबदार आहे का ?
मित्रांनो, वास्तविक पाहता, मानवी जीवनाच्या प्रारंभापासून मी तुम्हा मानवांची सोबत करीत आहे. आदिमानवाने जेव्हाकेव्हा पहिले पाऊल टाकले, तेव्हा माझा जन्म झाला. माणूस अधिकाधिक चालू लागला आणि मी वाढत गेलो. म्हणूनच रस्ता म्हणजे प्रवास ! रस्ता म्हणजे प्रगती ! रस्ता म्हणजे जीवन !- अशा व्याख्या तुम्ही निर्माण केल्या. माणसाच्या आजवरच्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे.
माणसाचे प्रारंभीचे जीवन कष्टमय व खडतर होते. म्हणून माझे रूपही ओबडधोबड वब खडकाळ होते. मी काट्याकुट्यांनी भरलेला होतो. खरचटत, ठेचकाळत, रक्ताळलेल्या पायांनी माणसाला वाटचाल करावी लागे. तशातच जंगली श्वापदे केव्हा हल्ला करतील याचा नेम नसे. माणूस भलतीकडे भरकटू नये, संकटात सापडू नये म्हणून मलाच काळजी घ्यावी लागे. मी त्याला योग्य मार्ग दाखवू लागलो. किंबहुना, तेच माझे जीवितकार्य आहे. मी माणसाला त्याच्या इच्छित स्थळी योग्य दिशेने नेतो. आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यावर माणसाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहण्यातले सुख खरोखर अपूर्व असते. माणसाचा सुखाच्या वाटेवरील मी सोबती आहे. त्याच्या जीवनाचा कायमचा साक्षीदार ! माझ्याशिवाय मानवी जीवन अशक्यच आहे !
मित्रांनो, माणसाबरोबर मीसुद्धा खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत. आता मी तुम्हांला जसा ऐसपैस, रुंद, गुळगुळीत दिसतो, तसा सुरुवातीला नव्हतो. साधी पाऊलवाट हे माझे प्रारंभीचे रूप होते. माणसाने बैलगाडी निर्माण केली, तेव्हा मीच विचार करून स्वतःला थोडेसे रुंद केले. कालांतराने मोटरगाडी आली, तेव्हा माझ्या अंगावरील लहानमोठे दगड काढून टाकणे. भाग पडले. खडूडे बुजवण्यात आले.
अशा प्रकारे कच्च्या रस्त्याच्या स्वरूपात मी तुमच्या सेवेसाठी हजर झालो. त्या काळात माझ्या अंगावरून एखादी मोटर भुर्रकन गेली की, धुळीचे लोट उसळत. मात्र माणसाचे जीवन जसजसे सुधारत गेले, तसतसा मीही बदलत गेलो. मी डांबरी / काँक्रीट रस्त्याचे रूप घेतले. मग मात्र माझे रूप झपाट्याने बदलले. एकपदरी, दुपरी, चौपदरी, महामार्ग इत्यादी अनेक रूपे मी धारण केली. आणि आता तर ' एक्स्प्रेस हायवे ' हे अत्यंत देखणे रूप मला मिळाले आहे.
मित्रांनो, काहीजणांना मात्र हे मार्ग म्हणजे धोपटमार्ग वाटतात. त्यांना आडवळणाने जाण्यातच सुख मिळते. डोंगरदर्या धुंडाळणाऱ्या अशा गिर्यारोहकांना किंवा कोलंबस, स्कॉट, वबास्को-द-गामा यांसारख्या धाडसी समुद्र-प्रवाशांनाही मी आनंदाने सोबत केली आहे. माणसाच्या प्रगतीतला मी साक्षीदार आहे. त्याच्या संपूर्ण जीवनाचा मी साक्षीदार आहे. मीच त्याला इथवर आणून सोडले आहे. संपूर्ण मानवी जीवनाचा खराखुरा इतिहास फक्त मीच लिहू शकेन !
मी रस्ता बोलतोय मराठी निबंध PDF
मी रस्ता बोलतोय आत्मकथा मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत
Sagar
ReplyDeletePost a Comment