विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Marks In Marathi

तुम्हा सर्वां साठी आम्ही सादर करत आहो विरामचिन्हे व त्यांचे अर्थ उदाहरण सोबत (viram chinh in marathi  with examples) .

Viram Chinh In Marathi

विरामचिन्हे : वाचतांना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात, त्यांना विरामचिन्हे म्हणतात.


1. पूर्णविराम (.)

(अ) वाक्‍य पूर्ण झाले हे दर्शविण्यास वाक्याच्या शेवटी (.) असा एक टिंब देतात, त्याला पूर्णविराम म्हणतात.

उदा. 

(1) मुले परत निघाली.

(2) आई एकदम चकित झाली.

(ब) आध्याक्षरे किंवा संक्षिप्त रुपे यांच्या शेवटी.

उदा. 

(1) पु.. देशपांडे 

(2) बी. 

(3) म. सा.वि. इत्यादी


2. अर्धविराम (;)

दोन छोटी वाक्ये जोडतांना उभयान्वीयी अव्ययाच्या आधी (;) असे चिन्ह दिले जाते, त्याला अर्धविराम म्हणतात.

उदा. 

(1) हे खरे अवघड काम होते; पण गोविंदा कल्पक होता.

(2) आग वाढत चालली होती; पण गोदावरीबाईना त्याची तमा नव्हती.



3. स्वल्पविराम (,)

(अ) एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्दाखेरीज किंवा शेवटच्या वाक्‍्याखेरीज प्रत्येकानंतर (,) असे चिन्ह दिले जाते, त्याला स्वल्पविराम म्हणतात.

उदा. 

(1) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी ही तृणधान्ये आहेत.

(2) शिकारी पुन्हा गेला, जाळे पसरवले, दाणे टाकलें आणि बाजूला जाऊन बसला.


(ब) संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी : 

उदा. 

(1) महाराज, मला क्षमा करा. 

(2) राजू , आपण आंधी घरी जाऊ.


(क) 'हो, नाही, नको ' यासारख्या शब्दांनी वाक्‍य सुरु होऊन ते पुढे चालू राहिल्यास त्या शब्दानंतर 

उदा. 

(1) हो, मीच त्याला सांगितले. 

(2) नाही, मी हे काम करणार नाही.

(3) नको, मला आता घरी गेलं पाहिजे.

(ड) विलोपित (गाळलेला) शब्द सुचवण्यासाठी.

उदा.

(1) शाम बोलला खरं; आणि रमेश, खोटं ( बोलला).

(2) श्रीमंत मारतो मजा; आणि गरीब, सजा (भोगतो).


4. अपूर्ण विराम (:) 

 वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास (:) हे चिन्ह वापरतात, त्याला अपूर्णविराम म्हणतात.

उदा. 

(1) पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा : 1, 2, 3, 4



5. प्रश्नचिन्ह (?) 

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी (?) चिन्ह दिले जाते, त्याला प्रश्‍नचिन्ह म्हणतात.

उदा. 

(1) त्याने काय केले ? 

(2) तूहे आता का सांगतोस ?


6. उद्गारचिन्ह (!) 

उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी (!) असे चिन्ह दिले जाते, त्याला उदगारचिन्ह म्हणतात.

(अ) मनातील तीव्र भावना व्यक्‍त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केवलप्रयोगी अव्ययानंतर .

उदा. 

(1) शाबास ! उत्तम गुण मिळविलेस. 

(2) अरेरे ! तो गाडीखाली चिरडला.

(3) शाबास ! मला तुझा अभिमान वाटतो.

(4) अरेरे ! त्याला दुखापत झाली हे फार वाईट झाले.

(ब) उद्गारवाचक शब्द वाक्यात न येताही वाक्यातून तशी भावना व्यक्‍त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी.

उदा. 

(1) किती हो वेंधळे तुम्ही ! 

(2) आता काय बोलावं कपाळ !

(3) आमच्या नशिबी कुठलं आलं सुख !

(क) जेव्हा तीव्र भावना व्यंकक्‍्त करायची असते. तेव्हा संबोधनानंतर स्वल्पविरामाऐवजी उदृ्गारचिन्ह वापरतात.

उदा. 

(1) चांडाळा ! तुला हे सुचलेच कसे ! 

(2) कारटे ! काय केलंस हे ....... !



7. अवतरण चिन्हे

(अ) एकेरी अवतरण चिन्ह.  (ब) दुहेरी अवतरण चिन्ह.

(अ) एकेरी अवतरण चिन्ह 

लेखनात एखादे सुभाषित, उक्ती, म्हण देताना अथवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना ('-') असे चिन्ह दिले जाते, त्याला एकेरी अवतरणचिन्ह म्हणतात.

उदा. 

(1) 'जय जवान जय किसान ही घोषणा शास्त्रींनी दिली.

(2) श्यामची आई' हे साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहे.

(ब) दुहेरी अवतरण चिन्ह 

बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखविताना ("-") असे चिन्ह दिले जाते, त्याला दुहेरी अवतरणचिन्ह म्हणतात.

उदा.

(1) साधू म्हणाले, “असा निराश होऊ नकोस.” 

(2) पोपट म्हणाला, ''यापुढे मी नुसती पोपटपंची करणार नाही.”


8. संयोग चिन्ह (-) 

 दोन शब्द जोडताना अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास (-) असे चिन्ह देतात, त्याला संयोगचिन्ह म्हणतात.

उदा. 

(1) प्रेम - विवाह 

(2) दोन - तीन 

(3) स्त्री - पुरुष

(4) रांगत - लोळत 

(5) त्या-त्या 



9. अपसारण चिन्ह (स्पष्टीकरणासह) (-) 

वाक्यातील एखाद्या-शब्दाविषयी किंवा एखाद्या संकल्पनेविषयी त्याच वाक्यात आलेले स्पष्टीकरण, किंवा त्या संबघीचा शेरा. उर्वरित वाक्‍्यापासून वेगळा दाखविण्यासाठी हे विरामचिन्ह वापरतात.

उदा. 

(1) तिथल्या एका गुहेत मी सर्व प्रकारच्या वस्तू - काही सोन्याच्या तर काही रत्नजडीत - इतस्ततः विखुरलेल्या पाहिल्या.

(2) तो माणूस - ज्याने बऱ्याच लोकांना गंडा घातला - अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला.


10. लोप चिन्ह (...) 

घुटमळत केलेले अथवा अर्धवट तोडलेले अथवा बोलता बोलता. विचार खंडित झालेले दाखविण्यासाठी हे विरामचिन्ह वापरतात.

उदा. 

(1) मला ते पाहायचं होतं , पण.... 

(2) पण ... हे तर जोखमीचे काम...

(3) बाबा ... मला ... शंभर रुपये... 

(4) आस्ते ... शिस्तीने घे... हां, दमानं ....



11. दंड (एकेरी ।, दुहेरी ।।) 

ओवी, अभंग, श्लोक यांसारख्या काव्यप्रकारांत ओवीचा किंवा चरणांचा शेवट दाखवण्यासाठी वापरतात.

उदा. 

(1) देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर ॥

(2) जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ॥


12. अवग्रह (ऽ) 

विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब करायचा आहे हे सुचवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.

उदा. 

(1) शू ऽ! कुणीही बोलू नका. 

(2) का ऽ ही बिघडणार नाही.


13. विकल्प चिन्ह (/) 

एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी मध्ये वापरले जाणारेचिन्ह 

उदा. 

(1) आपण विवाहित / अविवाहित आहत का?

(2) परीक्षेची शुल्क, मनिऑर्डर / डी. डी. / चेक ने पाठविण्यात यावे.



marathi punctuation chart


तर या होत्या मराठी व्याकरणातील विरामचिन्हे (viram chinh in marathi grammar) तुम्हाला हि माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत सहारे करा. 

Read 

१४० मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani List With Meaning

मराठी वाक्प्रचार व अर्थ | Vakprachar In Marathi With Meaning

मराठी विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd In Marathi

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post