मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani list WIth Meaning | Proverbs In Marathi | Marathi Mhani PDF
तुम्हा सर्वां साठी आम्ही सादर करत आहो मराठी म्हणी व अर्थ (Marathi Mhani) जे तुम्ही वाचू शकता आणि मराठी म्हणी pdf डाउनलोड पण करू शकता.
तर हे आहे काही मराठी म्हणी व त्यांचे अर्थ.
Marathi Mhani List With Meaning
1) अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
2) अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपण नुकसानकारक ठरते.
3) असतील शिते तर जमतील भुते - आपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण नसते.
4) अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
5) अडला नारायण गाढवाचे पाय धरी - थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खांची मनधरणी करावी लागते.
6) आयत्या बिळावर नागोबा - दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.
7) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.
8) असंगासी संग आणि प्राणाशी गाठ - दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.
9) आधी पोटोबा मग विठोबा - प्रथम पोटाची सोय पहावी; नंतर देवधर्म करावा.
10) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.
11) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाहीतर तो दुसऱ्यास काय देणार ?
12) अंगापेक्षा बोंगा मोठा - खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे.
13) आपला हात जगन्नाथ - आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.
14) इकडे आड तिकडे विहिर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे
15) आंधळे दळते नि कुत्रे पिठं खाते- एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.
Read मराठी वाक्प्रचार व अर्थ | Vakprachar In Marathi With Meaning
16) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळपणानेमूर्खासारखे वर्तन करणे.
17) उचलली जीभ लावली टाळ्याला - अव्चाराने वागणे .
18) उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी गुण श्रोडे असणारा बढाई मारतो.
19) उंदराला मांजर साक्ष - वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे.
20) एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक गोष्ठी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.
21) एका हाताने टाळी वाजत नाही - भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असतं नाही.
22) एका किंवा एकाच माळेचे मणी - सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
23) ऐकावे जनाचे करावे मनाचे - अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.
24) करावे तसे भरावे - वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
25) कर नाही त्याला*डर कशाला ? - निरपराधी माणूस निर्भय असतो.
26) कसायाला गाय धार्जिणी - दुष्ट व कठोर माणसांशी सर्व लोक नम्रतेने वागतात.
27) कानामागून आली आणि तिखट झाली - श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ मार्णसाने वरचढ ठरणे.
28) काप गेले नि भोके रांहिली - वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या.
29) काखेत कळसा आणि गावाला वळसा - हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे.
30) कामापुरता मामा - काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.
31) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने. थोरांचे नुकसान होत नाही.
32) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच जातीतला फितुरीमुळे आपला घात करतो.
33) कोळसा उगाळावा तितका काळांच - वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यांतून वाईटच निघणार.
34) कोल्हा कांकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात.
35) खाई त्याला खवखवे - वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
Read मराठी विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd In Marathi
36) खाण तशी माती - आईवडीलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक हृअसते.
37) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी - परिस्थितीशी जुळवून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा.
38) खायला काळ भुईला भार - निरूद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
39) खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते.
40) गरज सरो वैद्य मरो - गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे.
41) गर्जेल तो पडेल काय ? - केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही.
42) गर्वाचे घर खाली - घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते.
43) गाढवाला गुळाची चव काय ?- मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
44) गुरूची विद्या गुरुला फळली - एखादयाचा डाव त्याच्यारच उलटणे.
45) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता - मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो.
46) गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.
47) गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृत्यं करणार.
48) गोगल गाय अन् पोटात पाय - एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
49) घरोघरी मातीच्या चुली - सर्वत्र सारखीच परिस्थिती.
50) घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - प्रतिकूल परिस्थितीत सारेच उलट वागू लागतात.
Read मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi
51) घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे - स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.
52) चार दिवस सासूचे चार दिवसं सुनेचे - प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.
53) चोराच्या मनात चांदुणे - वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
54) चोराच्या उलट्या बोंबा - स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
55) चोर सोडून संन्याशाला सुळी देणे - खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
56) चोराच्या हातची लंगोटी - लबाड कंजूषाकडूंन थोडे मिळाले तरी भाग्याचे.
57) जळात राहून माशाशी वैर - सहवासात रहायच्या व्यक्तीशी वैर करू नये.
58) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - मुळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
59) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकमेकांची वर्मे ठाऊक असणाऱ्या माणसांशी गाठ पडणे.
60) ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याला यश आले तो कर्तबगार.
61) ज्याचे करावे बरे तो म्हणतो आपलेच खरे - एखाद्याचे भले करायला जावेतर तोत्या गोष्टीस हेकेखोरपणे विरोध करतो.
62) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - उपकारकर्त्याचे उपकार स्मरून. त्याची बाजू घेणे.
63) झाकली भूठ सव्वा लाखाची - व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते , मौन पाळून अब्रू राखणे.
64) टाकीचघाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.
65) डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एका जागी पण इलाज दुसरीकडे कंरणे.
Read मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example
66) तळे राखी तो पाणी चाखी - स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.
67) ताकापुरते रामायण - एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
68) तेरड्याचा रंग तीन दिवस - एखाद्या गोष्टीचे नावीन्य अल्पकाळच टिकते.
69) तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे आले - फायद्याच्या दोन्ही गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाऊन क्षुल्लकगोष्टयेणे.
70) थेंबे थेंबे तळे साचे - थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होतो.
71) दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते.
72) दाम करी काम - पैशाने सर्व कामे साध्य होतात.
73) दिव्याखाली अंधार - मोठ्या माणसांत देखील दोष असतात.
74) दुरून डोंगर साजरे - दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींचे खरे स्वरुप जवळून समजते.
75) दुष्काळात तेरावा महिना - अगोदरच्या संकटात आणखी भर.
76) दुभत्या गाईच्या लाथा गोड - ज्याच्यापासून लाभ होतो त्यांचा त्रासही माणूस सहन करतो.
77) देश तसा वेश - परिस्थितीनुसार वागणे विल्या .
78) दे माय धरणीं ठाय- पुरे पुरेसे होणे.
79) देव तारी त्याला कोण मारी - देवं पाठिराखा असलेल्याचे कोणीही नुकसान करू शकणार नाही.
80) दोन्ही घरचा पाहुणा उपाशी - दोन्ही गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही.
81) दोघांचे भांडण तिसऱ्याचां लाभ - दोघांच्या वादात तिसऱ्या व्यक्तीचा फायदा होतो.
82) देखल्या देवा दंडक्त - एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून केवळ तिची विचारपूस करणे.
83) दैव देते आणि कर्म नेते - सुदैवाने,लाभलेली वस्लू नियतीने गमावून बसणे.
84) दृष्टी आड सृष्टी - आपल्यामागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे.
85) न कर्त्याचा वार शनिवार - न करायंचे काम सबबी सांगून टाळणे.
Read मागणीपत्र लेखन | Magni Patra Lekhan In Marathi
86) नव्याचे नऊ दिवस - नवीन गोष्टीचे काही दिवस कौतुक होते.
87) नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने - दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात.
88) नाचता येईना अंगण वाकडे - उणिवा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
89) नावडतीचे मीठ अळणी - नावडत्या व्यक्तीने केलेली चांगली गोष्ण्ी वाईट वाटते.
90) नाव मोठे लक्षण खोटे - भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी.
91) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा - नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे.
92) नाक दाबले की तोंड उघडते - अडवणूक करून काम साधणे.
93) नाकापेक्षा मोती जड - मालकापेक्षा नोकर शिरजोर, कुवतीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे.
94) नवी विटी नवे राज्य - सगळीच परिस्थिती नवीन असणे.
95) पदरी पडले पवित्र झाले - स्वीकारलेल्या बाबीला नावे न ठेवता समाधान मानणे.
96) पळसाला पाने तीनच - कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच.
97) पाचामुखी परमेश्वर - पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे.
98) पी हळद अनू हो गोरी - एखाद्या कृत्याचा त्वरीत लाभ मिळावा अशी अपेक्षा करणे.
99) पालथ्या घागरीवर पाणी - केलेला उपदेश वाया जाणे.
100) पुढच्यास ठेच मागचा शहाणा - दुसऱ्याच्या अनुभवातून आपण धडा घेणे.
101) पुराणातील वांगी पुराणात - उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे.
102) पेरावे तसे उगवते - चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते.
103) प्रयत्नांती परमेश्वर - प्रयत्नांती असाध्य गोष्ट साध्य करता येते.
104) बडा घर पोकळ वासा - दिसायला श्रीमंती परंतु प्रत्यक्षात तिचा अभाव.
105) बळी तो कान पिळी - शक्तीमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो.
Read Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे
106) बाप तसा बेटा - बापाचे गुणावगुण मुलाच्या अंगी असणे.
107) बुडत्याचा पाय खोलात - अधोगती होऊ लागली की अनेक बाजूंनी होते.
108) बुडत्याला कडीचा आधार - संकटात थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते.
109) बैल गेला नि झोपा केला - हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ.
110) भरवशाच्या म्हशीला टोणगा - ज्याच्या विषयी अपेक्षा आहेत अशा व्यक्तीने संपूर्ण निराशा करणे.
111) भित्या पाठी ब्रह्मराक्षस - भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
112) भीक नको, पण कुत्रं आवरं - एखादयाने कार्यास मदत केली नाही तरी चालेल पण त्या कार्यात विघ्न न आणू नयेत अशी स्थिती.
113) भुकेला कोंडा निजेला धोंडा - अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालते.
114) मनी वसे ते स्वप्नी दिसे - जसा विचार तशी स्वप्ने पडणे.
115) मांजरांच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ?- जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे सरसावत नाही.
116) मनात मांडे पदरात धोंडे - केवळ दिवास्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही.
117) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - भविष्यात कोण होणार याचा अंदाज बालपणी-बांधता येतो.
118) मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये- कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
119) यथा राजा तथा प्रजा - प्रमुख व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्याच्या हाताखालच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो.
120) रात्र थोडी सोंगे फार - कामे पुष्कळ त्यामानाने वेळ थोडा.
121) रोज मरे त्याला कोण रडे - वारंवार घडणाऱ्या गोष्टीविषयी स्वारस्य उरत नाही.
122) लहान तोंडी मोठा घास - आपली योग्यता नसताना मोठ्यांस सल्ला देणे.
123) लेकी बोले सुने लागे - एखादयाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
124) वराती मागून घोडे - काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे, एखादी गेष्ट घडून गेल्यावर मदतीस येणे.
125) वड्याचे तेल वांग्यावर - एकाबद्दल दुसऱ्यास दोष देणे.
126) वासरांत लंगडी गाय शहाणी - मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो.
127) शहाण्याला शब्दांचा मार - सूज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो.
128) शेंडी तुटो की पारंबी तुटो - पक्का निश्चय करणे.
129) शेरास सव्वाशेर - सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो.
130) शितावरून भाताची परीक्षा - वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.
131) सगळे मुसळ केरात - मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे.
132) सरड्याची धाव कुंपणापर्यंत - प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते.
133) साखरेचे खाणार त्याला देव देणार - सुदैवी माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.
134) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही - हट्टापायी नुकसान झाले तरी त्याचा हट्टीपणा जात नाही.
135) सुंठीवाचून खोकला जाणे - उपचाराशिवाय दोष निवारण होणे.
136) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
137) हत्ती गेला शेपूट राहिले - बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे शिल्लक राहणे.
138) हातच्या काकणाला आरसा कशाला - प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.
139) हाजीर तो वजीर - वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो.
140) हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे - सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे.
Marathi Mhani PDF
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ ऑफलाईन वाचण्या साठी व मराठी म्हणी pdf डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तर हे होते मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला कंमेंट करून सांगा व या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा.
होळी सणाशी संबंधित म्हणी वाक्प्रचार हवे आहेत
ReplyDeleteHOLI TI RANG CHOLI
DeleteVery good.
ReplyDeleteभढमतममददयय
ReplyDeleteOk mhani is the best and I liked it!!
DeletePost a Comment