मागणीपत्र लेखन | Magni Patra Lekhan In Marathi With Examples

या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी मागणीपत्र लेखन (Magni Patra Lekhan In Marathi) शिकायला मिडेल ज्या मध्ये तुम्हाला मागणी पत्र कसे लिहायचे हे माहित पडेल आणि मागणीपत्र चे नमुने देखील मिडेल.

Magni Patra Lekhan In Marathi

जर तुम्ही संपूर्ण मराठी पत्र लेखन नाही वाचलं असेल तर तेही तुम्ही वाचू शकता.



मागणीपत्र | Magni Patra In Marathi

  1. एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र.
  2. मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते.
  3. पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.
  4. सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते. (Magni Patra Lekhan in Marathi)

मागणीपत्राच्या विषयाची कक्षा :

  1. शालेय वस्तूंची मागणी करणे. (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.)
  2. घरासाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे.
  3. कॅटरर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे.
  4. वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे.
  5. शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदवणे.
  6. माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था वगैरे) .

मांगणीपत्राचा नमुना | Magnipatra Example

1. शाळेच्या ग्रंथालयासाठी काही कोशांची पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. (Pustak Magni Patra In Marathi)

 स. म. द.
रा न विद्यार्थी प्रतिनिधी,
ज. ए. सो. ची मुलांची प्रशाला,
दादर, मुंबई - ४०० ०२८.
दि. २० जुलै २०२१


प्रति,
मे. नरेंद्र बुक डेपो,
मुंबई - ४०० ०२८.

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी.

महोदय,

ज. ए. सोसायटीच्या मुलांच्या शाळेतील ग्रंथालय समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र मी लिहीत आहे. माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीनुसारच हे पत्र लिहीत आहे.

आमच्या ग्रंथालयासाठी पुढील पुस्तके हवी आहेत. कृपया पुस्तके बिलासह शाळेत पाठवावीत. योग्य ती सवलत द्यावी. म्हणजे आम्ही बिलाच्या रकमेचा धनादेश पाठवू.

Sr पुस्तके संपादक प्रती
1 आदर्श मराठी शब्दकोश डॉ. प्र. न. जोशी 1
2 मराठी व्युत्पत्ती कोश कृ. पां. कुलकणी 1
3 पर्याय शब्दकोश वि. शं. ठकार 1
4 मराठी लेखन कोष अरुण फडके 1
5 मराठी इंग्रजी वाक्यकोश वा. के. लेले 1
6 नवनीत मराठी इंग्लिश डिक्शनरी सुधाकर प्रभुदेसाई 1


आपला कृपाभिलाषी,
स. म. द.
विद्यार्थी प्रतिनिधी

Pustak Magni Patra In Marathi


2.  शाळेतील विद्यार्थी भांडारासाठी आवश्यक मालाची मागणी करणारे पत्र.

अ. ब, क.
विद्याथी प्रतिनिधी,
आदर्श प्रशाला, विक्रोळी,
मुंबई - ४०० ०७९.
दि.७ जुलै २०१५

प्रति,
मा. संचालक,
मे. स्टेशनरी मार्ट,
प्रिन्सेस स्ट्रीट,
मुंबई - ४०० ००२. 

विषय : शालेय विद्यार्थी भांडारासाठी शालोपयोगी वस्तूंची मागणी.

महोदय,

आमच्या शाळेतील ' विद्यार्थी सहकारी भांडारा 'साठी पुढील मालाची आवश्यकता आहे. कृपया हा माल त्वरित पाठवण्याची व्यवस्था करावी. लवकरच शाळा सुरू होत असल्याने या वस्तूंसाठी विद्यार्थ्यांची खूप मागणी आहे, तेव्हा विलंब करू नये. 

वस्तूंची यादी

head 1 head 2 head 3
1 २०० पानी हार्ड बाऊंड वह्या २ ग्रोस
2 १०० पानी हार्ड बाऊंड वह्या ४ ग्रोस
3 चित्रकला वह्या १० डझन
4 हस्तकला वह्या १० डझन
5 नकाशा वह्या १० डझन
6 कंपास पेटी ५ डझन


आम्ही आपल्याकडून शालेय साहित्याची नियमित खरेदी करतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे योग्य ती सवलत द्यालच. कृपया बिलही सोबत पाठवावे, ही विनंती.

आपला विश्‍वासू
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी


3. शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांसाठी एन. के. जोशी विद्यालय, मुंबई या शाळेचे मैदान दोन दिवस भाड्याने मिळण्यासाठी त्या शाळेकडे मागणीपत्र सादर करा. 

 अ. ब. क.
नूतन विद्यालय,
विद्यार्थी प्रतिनिधी,
 महात्मा फुले मार्ग, कर्ला,
मुंबई - ४०० ०७०.
दि. १५ नोव्हेंबर २०२१

प्रति,
माननीय सचिव,
एन. के. जोशी विद्यालय,
कुर्ला, मुंबई - ४०० ०७०.

विषय : शाळेचे मैदान भाड्याने मिळण्याबाबत.

महोदय,

आमची शाळा आपल्याच परिसरातील आहे आणि आमच्या शाळेला मैदान नाही , ही वस्तुस्थिती आपल्याला माहीत आहेच. 

आमच्या शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा आम्ही १३ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२१ या दोन दिवसांत घेण्याचे योजीत आहोत. कृपया त्यासाठी आपल्या शाळेचे मैदान दोन दिवस भाड्याने द्यावे , ही विनंती. मैदानाचे भाडे व अन्य अटी कृपया कळवाव्यात.

मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व आमच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहिले आहे.


अ. ब. क.

विद्यार्थी प्रतिनिधी



4. तुमच्या शाळेसाठी “शिक्षण संक्रमण' या मासिकाचे अंक नियमितपणे मिळण्याची मागणी नोंदवण्यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना उददेशून पत्र तयार करा.

अ. ब. क.
आदर्श विद्यालय,
पुणे - ४११ ००७.
दि. २ जानेवारी २०२१

प्रति,
मा. सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे - ४१९ ००४.


बिषय : ' शिक्षण संक्रमण' या मासिकाचा वर्गणीदार होण्याबाबत.


महोदय, 

मी आदर्श विद्यालय, पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहीत आहे.  .

आमची शाळा 'शिक्षण संक्रमण' या मासिकाची वर्गणीदार होऊ इच्छिते. सोबत र १८० चा चेक पाठवत आहोत.

जानवारी २०२१ पासून आम्हांला वर्गणीदार करून घ्यावे आणि 'शिक्षण संक्रमण'चे अंक नियमित पाठवावेत, ही विनंती.

वर्गणीदारासंबंधी अधिक तपशील :

(१) अंक पाठवण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, आदर्श विद्यालय, कोथरूड, पुणे -४११ ०२९.

(२) वगणीचा रक्‍कम : ₹ १८०.

(३) चेकचा तपशील : चेक क्र. २५३५४५ दि. २-१- २०२१, बँक ऑफ महाराष्ट्र, कोथरूड शाखा, पुणे - ४९१ ०२९.

(४) वगंणीचा कालावधो  : जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१.

आपला विश्‍वासू,
अ. ब. क.

5. "श्री पूजा साहित्य भांडार" यांच्याकडे काही पूजासाहित्याची मागणी करणारे पत्र लिहीत आहे.


प्रणीता नसिराबादकर
प्रभुकंज,
बाजारस्ता,
रत्नागिरी - ४१५ ६१२.
दि. १ डिसेंबर २०२१

प्रति,
मा. व्यवस्थापक,
श्री पूजा साहित्य भांडार,
रत्नागिरी - ४१५ ६१२.


विषय : गणेशचतुर्थीसाठी पूजासाहित्याची मागणी.


महोदय,

आम्हांला गणेशचतुर्थीसाठी पुढील पूजासाहित्याची आवश्यकता आहे. कृपया यादीप्रमाणे साहित्य पाठवावे. सोबत बिलही व्यावे.

(१) धूप-१ मोठा पुडा
(२) कापूर-१ मोठी डबी
(३) उदबत्ती (केवडा) -१ मोठा पुडा
(४) अष्टगंध - १०० ग्रॅम
(५) अबीर - १०० ग्रॅम
(६) गुलाल - १०० ग्रॅम
(७) शेंदूर - १०० ग्रॅम 

कृपया साहित्य संध्याकाळी ४ वाजल्यानंतर पाठवावे.

आपली विश्वासू
प्रणीता नसिराबादकर

Magni Patra Lekhan In Marathi eample


6. 'अ ते ज्ञ' वस्तू भांडार, नागपूर' यांच्याकडे काही भेटवस्तूंची मागणी नोंदवणारे पत्र लिहीत आहे.

बिजय पाटील
४, विश्रामयोग,
धनतोली,
नागपूर - ४४० ०१२.
दि. १० डिसेंबर २०२१

प्रति,
मा. व्यवस्थापक, श
अ ते ज्ञ वस्तू भांडार, धिक्रा
धनतोली, नागपूर - ४४० ०१२.


विषय : १० ते १२ वर्षे या वयोगटातील मुलीच्या वाढदिवसासाठी भेटवस्तू इत्यादींची मागणी नोंदवणे.


महोदय, 

माझ्या बहिणीचा दहावा वाढदिवस आम्ही दि. १९ डिसेंबर रोजी साजरा करीत आहोत. त्यासाठी आम्हांला पुढील

वस्तूंचा पुरवठा करावा, ही विनंती :

(१) लहान फुगे : २००
(२) मध्यम फुगे : १००
(३) रंगीत मेणबत्त्या : १०९ विजा
(४) दहा या अंकाची विशेष मेणबत्ती : १
(५) पताका : ९ पेटी
(६) झिरमिळ्या : ५मी रि
(७) “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या शब्दांचे तोरण : ९
(८) स्केच पेन : २० संच
(९) घोटीव कागद : २० संच (५ रंगांच्या कागदांचा एक संच)

कृपया सोबत बिलही पाठवावे; म्हणजे रोख रक्‍कम देऊन बिल त्वरित चुकते करता येईल.

आपला विश्‍वासू,
विजय पाटील

7. विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणारे पत्र.

गौतमी लंके
विद्यार्थी प्रतिनिधी,
सरस्वती विद्यामंदिर,
जालना-४३१ २०३.
दि. २५ जून २०२१

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
यशोदीप विज्ञान साहित्य भांडार,
औरंगाबाद-४३१ ००१.


विषय : विज्ञान प्रयोगशाळेसाठी उपकरणांची मागणी. 


महोदय, 

मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहीत आहे.

आमच्या शाळेसाठी कृपया पुढील उपकरणे पाठवण्याची व्यवस्था करावी :

अ क्र उपकरणाचे नाव संख्या
1 परीक्षानळी (२५ मिली) 25
2 चंबू (१ लीटर) 5
3 चंचुपात्र (१ लीटर) 5
4 वजनमाप पेटी (शास्त्रीय तराजूसाठी) 5


आपण घाऊक व्यापाऱ्यांना जी सवलत देता, ती आम्हांलाही द्यावी, ही विनंती.

मालासोबत बिलही पाठवावे. बिलाच्या रकमेचा धनादेश आपल्याला त्वरित पाठवला जाईल.


आपली विश्वासू,
गोतमी लंके
विद्यार्थी प्रतिनिधी
सरस्वती विद्यामंदिर.

तर हे होतं संपूर्ण मागणी पत्र लेखन मराठी (Demant letter in marathi) मध्ये. तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला कंमेंट करून सांगा आणि या ह्रतिकला ला आपल्या मितान सोबत सहारे करा.  

Read

मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example

मराठी अंक १ ते १०० | Number Names In Marathi 1 To 100 

Marathi Months Name | मराठी महिने व नाव मराठी आणि इंग्रजी

Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi

11 Comments

Post a Comment

Previous Post Next Post