स्वयंरोजगार काळाची गरज निबंध मराठी | Self Employment Essay In Marathi
तुम्हा सर्वान साठी स्वयंरोजगार काळाची गरज मराठी निबंध लिहिला आहे (Self Employment Essay In Marathi).
या निबंध मध्ये बेरोजगारी च्या काळात स्वयंरोजगार चे महत्त्व व्यक्त केले आहे. (Swayrozgar Kalachi Garaj Marathi Nibandh) तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल
स्वयंरोजगार काळाची गरज मराठी निबंध
आज आपल्या देशापुढे ज्या अनेक समस्या आहेत, त्यातील एक महत्त्वाची समस्या आहे ' बेकारी '. कोट्यवधी तरुण माणसे बेकार आहेत. त्यांत सुशिक्षित आहेत, त्याप्रमाणे अशिक्षितही आहेत. कुशल, निपुण माणसे बेकार आहेत; त्याप्रमाप लाखो अकुशल माणसेही कामाविना आहेत. अशी ही काम नसलेली माणसे समाजाला घातक ठरतात. कारण रिकामे डोके, रिकामे हात हे नको त्या गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात. अशा बेकार मंडळीतून गुन्हेगारी वाढत जाते.
भारतातील ' लोकसंख्येचा विस्फोट ' हे या बेकारीचे एक कारण आहे. उपलब्ध नोकऱ्यांपेक्षा बेकारांची संख्या फार मोठी आहे. हे बेकारीचे एक कारण आहे. सरकारी नोकरी करायची, महिना संपला की, निश्चित वेतन घ्यायचे आणि निवृत्तीचे वय झाले की, निवृत्ती वेतन घेऊन आराम करीत बसायचे. हे सुखासीन जगणे सर्वांना हवेहवेसे वाटते. त्यामुळेच प्रत्येकजण आपल्याला कायमची हमी देणारी नोकरी मिळावी, असा प्रयत्न करतो.
आाता हे स्पष्ट झाले आहे की, मागणी इतक्या नोकर्या उपलब्ध नाहीत. तेव्हा नोकरी शोधण्यात वेळ घालवण्याऐवजी प्रत्येकाने स्वयंरोजगाराचा विचार करावा. आपण नोकरी शोधत हिंडण्याऐवजी आपण असा रोजगार सुरू करावा की आपणच चारजणांना नोकरी देऊ शकू. एक लक्षात ठेवावे की, जेथे इच्छा आहे तेथे मार्ग नक्की मिळू शकतो.
अनेकजण व्यवसाय म्हटला की भांडवलाचा बाऊ उभा करतात; कारण त्यांच्या डोळ्यांसमोर असतात मोठमोठे उद्योजक 'पण हे उद्योजक काही एकदम मोठे झाले नाहीत. त्यांनी आपली सुरुवात केली ती शून्यातूनच. तेव्हा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, तर गरज असते ती मोठ्या जिद्दीची.
मालती नावाची एक साधी गृहिणी. फारशी न शिकलेली. संसारात अडचण उभी राहिली. तिचा जोडीदार आजारी, अपंग झाला. त्याची सेवा करणे आवश्यक होते व घर चालवणेही तितकेच गरजेचे होते. मालतीने गरजू, नोकरी करणाऱ्या गृहिणींना पोळी भाजीचे डबे देण्यास सुरुवात केली. घर उभे राहिले. मग मालतीने चिकाटीने आपला व्यवसाय वाढवला. मोठ्या कारखान्यांतील कॅन्टीनमध्ये पोळ्या पुरवण्याची कामे मिळवली. रोज दोन तीन हजार पोळ्या करायच्या. मालतीने मदतीला चार स्त्रिया नेमल्या व आपला स्वयंरोजगार अधिक विकसित केला.
बेकारीला कंटाळून चुकीच्या वा आत्मघाताच्या मार्गाकडे वळण्याऐवजी असा एखादा स्वयंरोजगार शोधावा. हे लक्षात घ्यावे की, कोणताही रोजगार, व्ोणतेहो काम हे कनिष्ठ प्रतीचे नसते. फक्त ते काम प्रामाणिकपणे व निष्ठेने केले पाहिजे. नोकरी करणे म्हणजेच प्रतिष्ठेचे काम, ही चुकीची ' कल्पना पुसून टाकली पाहिजे. स्वयंरोजगार ही उत्तम आयष्य जगण्यासाठी सुवर्णसंधी आहे, असे मनापासून मानले पाहिजे, कारण तीच काळाची गरज आहे.
Read
बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी
Post a Comment