बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध | Berojgari Essay In Marathi | Berojgari Nibandh In Marathi
तुम्हा सर्वान साठी बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध लिहिला आहे (Berojgari Essay In Marathi).
या निबंध मध्ये बेरोजगारी हि एक भीषण समस्या आहे हे व्यक्त केले आहे. तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.
बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध
भारताला स्वातंत्र्य मिळून पासष्ठहून अधिक वंर्षे झाली. भारतीयांनी विविध क्षेत्रांत प्रगती केली; पण या काळात भारताला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक समस्यांना भारत एकजुटीने सामोरा गेला आणि कठीण परिस्थितीवर त्याने मात केली. पण मानवनिर्मित समस्या मात्र राष्ट्रप्रगतीला विघातक ठरत आहेत. त्यांपैकी एक भीषण समस्या म्हणजे बेकारी !
आज भारतात कोट्यवधी माणसे- सुशिक्षित-अशिक्षित, कुशल-अकुशल कारागीर, स्त्री-पुरुष-बेकार आहेत. उद्योग, नोकरी, कामधंदा करण्याची इच्छा असूनही त्यांच्या पदरी निराशा येते. एके काळी असा समज होता को, शिक्षण घेतले तर आपल्याला नोकरी मिळेल; पण आज काय दिसते? लक्षावधी सुशिक्षित, पदवीधर बेकार आहेत. असे का? याचे उत्तर - सतत वाढत जाणारी आपली अफाट लोकसंख्या हे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला नोकरी मिळावी अशी सर्वांची अपेक्षा असते. पण सुशिक्षितांच्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या अल्प आहे. त्यामुळे बेकारांची संख्या सतत वाढत चालली आहे.
अशा या भीषण अवस्थेत बेकार तरुण बेभान होतो. 'रिकामे डोके सैतानाचे घर असते,' या उक्तीनुसार या बेकारांतून ' गुन्हेगार निर्माण होतात. अलीकडे तर असे लक्षात आले की, सीमेवरच्या दहशतवाद्यांमध्ये आणि शहरातील टोळीयदधात हे. बेकार तरुण सामील होतात, यालाही बेकारीच कारणीभूत आहे.
या बेकारीतून देशाचे होणारे मोठे नुकसान म्हणजे, आपल्या देशातील बुद्धिमान तरुण परदेशात शिक्षणासाठी जातात आणि तेथेच स्थायिक होतात. त्यामुळे आपल्या देशातील बुद्धिमत्ता आपल्या देशाच्या उपयोगी येत नाही.
ही बेकारी नष्ट करायची असेल, तर आपण उदरनिर्वाहासाठी नोकरीवर अवलंबून राहणे थांबवले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, आपल्याला अन्य कोणीही स्वयंरोजगार आपल्या हातात आणून देणार नाही. आपण समाजातील व्यवहारांचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले पाहिजे. लोकांच्या गरजा कोणत्या आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे शोधले पाहिजे. त्यातूनच आपला स्वयंरोजगार उभा करायचा आहे.
दुसरा एक मार्ग म्हणजे ग्रामीण भागाकडे वळले पाहिजे. तेथे शेती-आधारित अनेक व्यवसाय आपली वाट पाहत आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन, धुमक्षिकापालन वगैरे अनेक व्यवसायांची येथे उदाहरणे देता येतील. फळे, फुले, दूध, औषधी वनस्पती आदींच्या निर्मितीमधूनही मोठमोठे व्यवसाय उभे करता येतील. या व्यवसायांसाठी आपले शासनही भरपूर साहाय्य करण्यास तयार आहे.
शासकोय पातळीवर करता येतील असेही काही उपाय आहेत. त्यासाठी शासनाने जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्य उद्थोगधंद्यांना परवानगी दिली पाहिजे. रस्ते, विहिरी, पाझर तलाव यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करणारी कामे हाती घेऊन रोजगार निर्माण केला पाहिजे.
अशा तर्हेने चहू बाजूंनी प्रयत्न केल्यासच देशापुढील बेकारीची समस्या नष्ट होऊ शकेल.
Read
स्वयंरोजगार काळाची गरज मराठी निबंध
भाझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी
खूप छान
ReplyDeletePost a Comment