विज्ञान आणि मानव मराठी निबंध | Vidnyan Ani Manav Nibandh Marathi

तुम्हा सर्वान साठी विज्ञान आणि मानव मराठी निबंध (Vidnyan Ani Manav Nibandh Marathi) लिहिला आहे. या निबंध मध्ये विज्ञान आणि मानवी जीवन या विषय वर चर्चा केली आहे.

vidnyan ani manav nibandh marathi

या निबंध चे शीर्षक "विज्ञान हाच परमेश्वर" किंवा "विज्ञान आणि मानव" किंवा "विज्ञान आणि मानवी जीवन" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. (science and human life essay in Marathi)

विज्ञान आणि मानव मराठी निबंध

विज्ञान हाच परमेश्वर किंवा विज्ञान आणि मानव किंवा विज्ञान आणि मानवी जीवन खरे पाहता ' विज्ञान ' ही माणसाचीच निर्मिती आहे. पण माणूस विज्ञानाच्या हातातील बाहुले झाला आहे, असे आज अनेक घटनांतून जाणवते. विशेषत: आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला असा अनुभव अनेकदा येतो. कधी कधी अगदी मोक्याच्या क्षणी विद्युतप्रवाह बंद पडतो, घरातील दिवे जातात, पंखा फिरत नाही, उदवाहन ठप्प होते आणि आपण सारेजण अगतिक होतो; त्या वेळी आपणाला वाटू लागते की, माणूस हा विज्ञानाचा गुलाम झाला आहे !

खरे तर विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्‍ती आहे. विज्ञान म्हणजे मानवी सामर्थ्याचा स्रोत आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली नसती, तर आजवरची प्रगती होऊच शकली नसती. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने केलेली प्रगती हे मानवाच्याच अखंड, प्रखर साधनेचे फळ आहे. विज्ञान हा मानवाला लाभलेला परीस आहे. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र आढळणार नाही की, जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही.

अलीकडेच आपल्या देशाने मंगळावर अवकाशयान पाठवले आहे. यापूर्वी आपण चंद्रावरही पोहोचलो होतो. आपल्यासहित वेगवेगळ्या देशांनी अवकाशात इतके उपग्रह पाठवले आहेत, की त्यांचाच आता ट्राफिक जॅम झाला आहे. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अंतराळात प्रवेश केला आणि विशाल अंतराळाचा तपास करण्याचा प्रयत्न केला. अवकाशात उपग्रह पाठवले आणि सागराच्या उदरातील खनिजांचा शोध घेतला. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने आपले सामर्थ्य हजारो पटींनी वाढवले आहे. दृष्टी, श्रुती, स्मृती या साऱ्या बाबतींत माणूस आज सर्व प्राणिमात्रांत श्रेष्ठ ठरला आहे, तो केवळ विज्ञानाच्या बळावरच! माणसाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्‍य केल्या, असाध्य रोगांवर विजय मिळवला. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता नेत्रदान, गात्रदान करणेदेखील सहज शक्‍य झाले आहे. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आज सारे जग जवळ आणले आहे. आज विज्ञानाने माणसाला इतके सामर्थ्य दिले आहे की, त्याला आता परमेश्‍वराजवळ मागण्यासारखे काही उरलेलेच नाही. किंबहुना विज्ञानच परमेश्वर बनले आहे.

माणसाने विज्ञानाच्या बळावर महाभयानक संहारक शस्त्रास्त्रे तयार केली. आजकाल वैज्ञानिक घोडदौडीत माणूस नैसर्गिक संतुलन हरवून बसला आहे. त्यामुळे ' विज्ञान ' हा माणसाचा शत्रू आहे, अशा प्रकारची टीका विज्ञानावर कधी कधी केली जाते. पण गंभीरपणे विचार करता, यात विज्ञानाचा दोष नसून तो माणसांच्या वृत्तीचा दोष आहे, हे स्पष्ट होते. विज्ञान हा मानवाचा जिवलग सखा आहे. मानवाच्या विकसनशीलतेचे रहस्य विज्ञानाच्या सामर्थ्यात दडलेले आहे, यात शंका नाही.


तर हा होता विज्ञान आणि मानव मराठी निबंध (science and human life essay in Marathi) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध

दूरदर्शन शाप की बरदान मराठी निबंध

संगणक चे महत्त्व मराठी निबंध

भ्रष्टाचार वर मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post