उपक्रमातला माझा सहभाग मराठी निबंध | Upkramatla Majha Sahbhag Nibandh

तुमच्या सर्वान साठी आम्ही उपक्रमातला माझा सहभाग मराठी निबंध (my contributions in initiative essay in marathi) लिहला आहे.

upkramatla majha sahbhag nibandh

उपक्रमातला माझा सहभाग मराठी निबंध

मी आणखी खूप शिकेन, यश मिळवीन, मोठा होईन. पण या वर्षीचा माझा उपक्रमातला सहभाग मी आयुष्यभर विसरणार नाही. या उपक्रमाने मला आत्मविश्‍वास दिला. आनंद दिला, ज्ञान दिले. हा सर्व अनुभव मला खूप काही शिकवून गेला आहे.

एके दिवशी आमचे सर वर्गात आले आणि त्यांनी एक उपक्रम जाहीर केला. उपक्रम होता - ' मराठी विषय कोपरा' तयार करणे, उपक्रमासंबंधातील माहिती ऐकत असताना मी तर गडबडलोच. होतो. हा उपक्रम आहे तरी कसा ? काय काय करावे लागेल ? कसे करावे लागेल ? सर समजावून सांगत होते. आम्ही उत्सुकतेने ऐकत होतो. एकेक गोष्ट स्पष्ट होत होती. एकेकज | उत्साहाने जबाबदारी स्वीकारत होता. या वेळी काहीतरी वेगळे, नवीन करायचे होते.

आमच्या कुमारभारतीमधील लेखक-कवींची छायाचित्रे जमवणे, त्यातील कवितांच्या आशयासारख्या पाच-पाच कविता निवडणे, शब्दकोश वाचनासाठी सूचनापत्र तयार करणे, अलंकारांची विविध उदाहरणे शोधणे, कुमारभारतीतीलच काही शब्दांची चुकोच्या पद्धतींनी लिहिली जाणारी रूपे शोधणे वगैरे चोदा-पंधरा घटकांची यादीच सरांनी सादर केली. माझ्या वाट्याला समानार्थी-विरुद्धार्थी शब्दांची यादी तयार करण्याचे काम आले होते. 

मी समानार्थी शब्दांपासून सुरुवात केली. मी ठरवले... पाठ्यपुस्तकातला एकही शब्द सोडायचा नाही. सर्वांची झकास यादी करायची. एकेक शब्द लिहीत गेलो. समानार्थी शब्द सापडत गेले. मजा येऊ लागली. काही काही शब्दांना तर चार-चार, पाच-पाच समानार्थी शब्द सापडले, पण त्यातही गंमत होती. काही समानाथी शब्द भिन्न अर्थछटा घेऊन येतात. सूर्य म्हणजे दिनकर, मार्तंड. मावळता सूर्य, मावळता दिनकर म्हणता येईल. पण मावळता मार्तंड ? छे ! शक्‍यच नाही. स्वप्न या शब्दाला तर समानार्थी शब्दच मिळेना. मला नवनवीन ज्ञान होत होते. शब्दांच्या गमती कळत होत्या.

विरुद्धार्थी शब्दांची तर फारच मजा आंली. 'आंबट'च्या विरुद्ध गोड. तसेच, कडू > गोड, तिखट > गोड, मग 'गोड'च्या विरुद्ध काय ? विरुद्धार्थ शोधणे फारच कठीण दिसू लागले. मग सरांचे मार्गदर्शन घेतले. काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द नसतात, हे कळले. विरुद्धार्थ व समानार्थ शब्दांचा मी वाक्यात उपयोग करून पाहिला. कोणत्या प्रसंगात, कोणत्या स्वभावाच्या व्यक्‍ती हे शब्द वापरतील याचा विचार करू लागलो आणि भाषेत किती मौज असते ते कळत गेले. मी अत्यंत आनंदाने माझी जबाबदारी पूर्ण केली. 

न आम्हांला वाचनालयाचा एक कोपरा मिळाला होता. तिथे आम्ही आमच्या सर्व माहितीची सुरेख मांडणी केली. सर्व पाहताना आमच्या लक्षात आले की, आमच्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासासंबंधातील कोणतीही अडचण आम्ही या 'मराठी 'कोपरा'च्या साहाय्याने सहज सोडवू शकतो. शिवाय तेथे बसून काहीही चाळले, तरी खूप आनंद मिळू शकेल, हे लक्षात आले. अशा या उपक्रमात मला सहभागी व्हायची संधी मिळाली, याचाच मला खूप आनंद होत आहे

Read

माझी आई निबंध मराठी मधे

माझे बालपण निबंध मराठी

माझे आवडते शिक्षक निबंध

माझी सहल मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post