मी मुलगी बोलतेय मराठी निबंध | Mi Mulgi Boltey Marathi Nibandh
तुम्हा सर्वान साठी मी मुलगी बोलतेय मराठी निबंध (Mi Mulgi Boltey Marathi Nibandh) लिहिला आहे. या निबंध मध्ये एका मुली चे मनोगत व्यक्त केले आहे.
या निबंध चे शीर्षक "मुलगी म्हणून जगताना..." किंवा "एका मुलीची आत्मकथा" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
मी मुलगी बोलतेय मराठी निबंध किंवा मुली ची आत्मकथा
ती जाहिरात वाचून मला चीडच आली. ती होती नौदलाची जाहिरात. नौदलात जवानांची भरती. तीत स्पष्टपणे नमूद केले होते की फक्त पुरुष उमेदवारांनीच अर्ज करावेत. म्हणजे काय ? मुलींनी का नाही अर्ज करायचे ? असा हा कोणता मोठा पराक्रम आहे की, तो फक्त मुलगाच करू शकतो आणि मुलगी करू शकत नाही ? इंजिनिअर, डॉक्टर, वाहनचालक, रेल्वेचालक, वैज्ञानिक अशा विविध प्रकारच्या जागांवर स्त्रिया काम करीत आहेत. स्त्रियांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्या खोल समुद्रात विहार करीत आहेत. अंतराळातही आमच्या पावलांचे ठसे उमटले आहेत ! मग हे काय ?
हा सर्व पुरुषांच्या मक्तेदारीचा मामला आहे. पुरुषांनाच सर्व काही येते. स्त्रियांना फक्त थोड्याच क्षेत्रात कर्तबगारी गाजवता येते. स्त्रिया पुरुषांची बरोबरी करूच शकणार नाहीत. म्हणजेच पुरुष श्रेष्ठ आणि स्त्रिया कनिष्ठ ! शेकडो वर्षे चालत आले आहे तसेच हे.
मात्र, एक गोष्ट मान्य केली पाहिजेच. आता आमच्यावर पूर्वीहतका अन्याय होत नाही. आईबाबा मला आणि दादाला अभ्यासाच्या बाबतीत सारखेच वागवतात. मला अभ्यास करायला उत्तेजन मिळते. स्पर्धा परीक्षेत भाग घेता येतो. सहलीला परवानगी देताना आढेवेढे घेतले जात नाहीत. छान छान कपडेही मिळतात. पण... पण... तरीही...
मी आठवीत आले, तेव्हा मला आई स्वयंपाक करायला शिकवू लागली. चपात्या कशा लाटायच्या; पदार्थ शिजला, हे कसे ओळखायचे; फोडणी कशी द्यायची; किती माणसांना किती स्वयंपाक हे प्रमाण कसे ओळखायचे; कोणत्या भांड्यात कोणते पदार्थ शिजवायचे वगैरे वगैरे खूप बारकावे मला शिकवले. आता मला छान स्वयंपाक येतो. पण हे दादाला कोणी शिकवले नाही. पाहुणे आले, तर त्याला कोणी चहाही करायला सांगत नाही. तो मीच करते.
माझ्या काही मैत्रिणी घरी अजिबात स्वयंपाक करीत नाहीत, त्यांचे आईबाबा तो आग्रहही धरत नाही. 'वेळ आली को बघेल ती. आत्ताच कशाला ?' असे म्हणतात. म्हणजे काही घरांत मोकळीक मिळत आहे, हे खरे.
काही बाबतीत मी मुलगी असल्याचा परिणाम मला दिसतोच. दादाचे मित्र आले कौ, ते गप्पाटप्पा करीत बसतात. न सांगता अनेकदा खेळायला जातात. मी तेच केले, तर मला मात्र दम मिळतो. ' कुठे गेली होतीस ?', “काय करीत होतीस? ', कोण कोण सोबत होते ?', “तुला सांगून जाता येत नाही का ?', ' यापुढे हे असले लाड चालणार नाहीत. ध्यानात ठेव ' इत्यादी शब्दांचा मारा होतो व दमही मिळतो. दादाला मात्र काहीच बोलले जात नाही.
' असे बोलू नये, जास्त हसू नये, असे बसू नये', यांसारख्या सूचना तर अनेकदा मिळतात. तसेच, मुलांशी जास्त सलगी करू नये, नंतर ते आगाऊपणा करतात, त्रास देतात, असे मार्गदर्शन तर सतत चालू असते. एखाद्या तरुणाने तरुणीवर असिड हल्ला केल्याची बातमी आली की, त्या बातमीवर घरात गंभीर प्रतिक्रिया व्यक्त होतात. अशा बातम्यांचा मथितार्थ मी लक्षात घ्यावा, असे मला सुचवतात. कपड्यांचे, देवधर्माचे रितीरिवाज पाळणे आवश्यक आहे, ही जबाबदारी माझ्यावरच टाकली जाते.
एकंदरीत, मुलगी म्हणून जगत असताना मला असे जाणवते की, तशी बऱ्यापैकी मोकळीक मला मिळते. माझ्या मैत्रिणींनाही मिळते. पण अजूनही काही बंधने आहेतच. स्त्री व.पुरुष समान केव्हा होतील, कोण जाणे !
तर हा होता मी मुलगी बोलतेय मराठी निबंध (mi mulgi boltey essay in marathi) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
Read
वृद्धाश्रमातील वृद्धाचे मनोगत मराठी निबंध
Mi mulgi boltey comp
ReplyDeletePost a Comment