कष्टकरी स्त्री चे मनोगत निबंध मराठी  | Kashtakari Stri Che Manogat | Mi Kashtakari Stri Boltoy

तुम्हा सर्वान साठी हा कष्टकरी स्त्रीचे मनोगत मराठी निबंध (Kashtakari Stri Che Manogat) लिहिला आहे. या निबंध मध्ये एका कष्टकरी स्त्री चे आत्मकथन व्यक्त केला आहे. 

kashtakari stri che manogat nibandh

या निबंध चे शीर्षक "मी कष्टकरी स्त्री बोलतोय" (Mi Kashtakari Stri Boltoy) हे पण असू शकते.

 कष्टकरी स्त्रीचे मनोगत

“मी शालिनी. खरं सांगायचं तर आमच्या आयुष्याबद्दल आम्ही काय सांगणार ? 

“मी व माझा नवरा आम्ही दोघंही अशिक्षित. नवरा माझा मिळेल ती मोलमजुरी करून चार पैसे आणायचा ! त्यातच आम्ही सर्व खर्च भागवत होतो. खूप त्रास व्हायचा. कधी कधी नुसता चहापाव खाऊन दिवस भागवायचो. डॉक्टरकडे जायला पैसे नाहीत, म्हणून अंगावरच ताप काढायचो.

"नवरा माझा अगदी देवमाणूस ! कधी कोणाला फसवलं नाही. चोरीलबाडी केली नाही. कधी कोणाचा अपमान केला नाही. कोणाला उलट बोलला नाही. मला त्याचा अभिमानच वाटतो. त्यामुळे मीही ठरवलं आपणसुद्धा हातपाय हलवले पाहिजेत. 

“सुरुवातीला मी चार घरची धुणीभांडी करायला लागले. पण लक्षात ठेवा, धुणीभांडी हे सोपं काम नाही हं. तुमच्यासारख्या ऑफिसात जाणाऱ्यांना त्यातली दुःखं कळणारच नाहीत. कोण आमच्याशी दोन शब्द मानाने बोलत नाही. सगळे हुडूततुडूतच करतात. माझी एक मालकीण तर फक्त खेकसतेच. ती बोलत नाहीच. पाच मिनिटे उशीर झाला, तरी कामावरून काढून टाकण्याची धमको देते. कितीही चांगलं काम केलं, मनापासून केलं, तरी अपमान करते. खूप दुःख होतं. मनातल्या मनात रडू येतं.

"माझ्या एका मैत्रिणीने मला एक नवीनच मार्ग दाखवला. मणी ओवून माळा तयार करून द्यायच्या. घरकाम, मुलांचं . खाणंपिणं, धुणीभांडी हे सगळं पटापट आवरून मी माळा करू लागले. दोन पैसे अधिक मिळू लागले. मग मुलं व नवरा देखील थोडीफार मदत करीत. थोडे पैसे साठवले अन्‌ पहिल्यांदा घरात मोरीला लादी बसवून घेतली !

"सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली, तेव्हा भाजीवाल्यांबरोबर सगळ्यांची भांडणं सुरू झाली. त्यावरून आणखी एक मार्ग दिसला. नवऱ्याशी बोलले आणि आम्ही रद्दी पेपराच्या पिशव्या करून विकू लागलो. पिशव्यांचा आमचा हा धंदा लवकरच तेजीत आला. नवऱ्याने तर सगळी कामं सोडून हाच धंदा सुरू केला. सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ-दहापर्यंत सतत काम चालू असतं.

"आम्हांला खूप कष्ट पडतात. खरं आहे ते. पण आम्ही प्रामाणिकपणे सर्व कामे करतो. प्रामाणिकपणाचा खूप फायदा होतो. प्रामाणिक कष्टच जीवन उजळतात, असं माझं ठाम मत झालंय. ''


तर हा होता कष्टकरी स्त्रीचे मनोगत मराठी निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

हमालाचे आत्मकथन मराठी निबंध

शेतकऱ्याचे  मनोगत निबंध

झाडाचे महत्त्व मराठी निबंध  

श्रमाचे महत्त्व मराठी निबंध

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post