हमालाचे आत्मकथन मराठी निबंध | Eka Hamalche Atmavrutta

तुम्हा सर्वान साठी हमालाचे आत्मकथन मराठी निबंध (Hamalache Atmakathan Marathi Nibandh) लिहिला आहे. या निबंध मध्ये एका हमालाचे चे आत्मकथन (autobiography of a labour essay in marathi) व्यक्त केला आहे. 

eka hamalache atmavrutta marathi nibandh

या निबंध चे शीर्षक "एका कष्टकऱ्याचे मनोगत" किंवा "मी एक हमाल" पण असू शकते.   

हमालाचे आत्मकथन मराठी निबंध

“पुढच्या आठवड्यात माझा इथला अन्नाचा शेर संपणार ! मी गावाला जाणार. तुम्हा लोकांसारखी आम्हा श्रमिकांच्या जीवनात “पेन्शन' नसते. हातपाय थकले की थांबायचे ! गेली पंचावन्न-साठ वर्षे ही मोलमजुरी चाललीय ! आता मी सत्तरी गाठली. ओझे उचलले की मान डगडगते, 'पाय अडखळतात. एक-दोनदा सामान घेऊन जाताना पडलोही. उगाच लोकांच्या चीजवस्तूंचे नुकसान नको, म्हणून मी आता गावाला परतायचा निर्णय घेतला आहे.

“वयाच्या १० व्या वर्षी मी गावाकडून शहरात आलो. वाटले, कुठे आधार मिळेल. थोडं शिकायला मिळेल. एका गावकऱ्याच्या ओळखीने एका शेटजीकडे कामाला राहिलो. खायला-प्यायला भरपूर मिळे, पण पुस्तकाला हात लावला कौ शेटजी संतापत. म्हणून ते काम सोडले आणि हमाली सुरू केली. रात्रीच्या शाळेत नाव घातले. सातवीपर्यंत शिक्षण झाले, पण कोठे नोकरी मिळाली नाही. मग एकदा सुरू केलेली हमाली आजतागायत चालली आहे. 

''सुरुवातीला हमाल संघटित नव्हते, तेव्हा मजुरीसाठी फार झगडावे लागत असे. लोक अवजड ओझी उचलायला लावत, पण पैसे देताना फार काचकूच करीत. आता मजुरांची संघटना झाली आहे. त्यामुळे ओझी उचलण्याचे दर ठरले आहेत. एखादा भला माणूस खूश होऊन जास्त मजुरी देतोही; नाही असे नाही.

'“एवढे कष्ट करून हमालाच्या वाट्याला काय येते? तर खाणावळीतले थंडगार जेवण. फलाटावर झोपणे , फलाटावरच स्नान. रात्री तेथेच भजन करतो. तेवढेच मनाला बरे वाटते ! वर्षातून पंधरा दिवस गावात जातो. गावात एक वाडवडिलांचे घर आहे.

त्याचीच डागडुजी करून माझी माणसे तिथे राहतात. माझ्या मुलाबाळांची लग्नेही झाली. मुलगे गावाकडेच काम करतात. आता माझी नातवंडे गावी शिकत आहेत. |

'“जेवढे कष्ट आम्ही करतो, तेवढे फळ मिळते का? उन्हापावसात धड निवाराही नाही. काही दिवसांपूर्वी एका स्टेशनवरची कचेरीची इमारत पडली, तेव्हा त्याखाली काही हमाल गाडले गेले ! अशी आमची स्थिती । वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, समाजातील इतर जनांचे या श्रमिकांकडे लक्ष नसते. उलट, “हमाल दे धमाल' आणि 'कुली' अशा सिनेमांतून हमालांचे हास्यास्पद चित्र रंगवले जाते. आज आयुष्याच्या अबेरीस माझी ओळख काय? “मी एक हमाल !'

'' आयुष्याची उरलेली वर्षे निवांतपणे जावीत, एवढीच परमेश्वराकडे मागणी ! ''


तर हा होता हमालाचे आत्मकथन मराठी निबंध  तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

कष्टकरी स्त्रीचे मनोगत

शेतकऱ्याचे  मनोगत निबंध

झाडाचे महत्त्व मराठी निबंध

सागराचे मनोगत मराठी निबंध

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post