दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध | Doordarshan Shap ki Vardan Essay in Marathi
तुम्हा सर्वान साठी दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध (Doordarshan Shap ki Vardan Essay in Marathi) लिहिला आहे. या निबंध मध्ये दूरदर्शन हे शाप आहे कि वरदान या विषय वर चर्चा केली आहे.
या निबंध चे शीर्षक "दूरचित्रवाणी शाप कि वरदान" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध
दूरचित्रवाणीचा प्रसार आता शहरांपासून खेड्यांपर्यंत सर्वत्र झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू नागला आहे. असे का बरे?
दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषत चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणार्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवबाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही.
'दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.
वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल. आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ श्राव्यापेक्षा दृक-श्राव्य साधन अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन 'मध्ये तर दृक् व श्रुती दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱया जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना !
अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे हे ठरवणे तसे कठीण आहे. कारण मुलांना, तरुणांना जे आवडेल, तेच प्रोढांना आवडेल असे नसते. येथे एक मार्ग अनुसरून पाहता येईल. पाहिलेल्या कार्यक्रमांबद्दल घरात सर्वांनी मोकळेपणाने चर्चा करावी. त्यातून सर्वांना एकमेकांचे विचार कळतील. चूक काय आणि बरोबर काय, हेही समजेल. हल्ली दूरदर्शनच्या स्वरूपातही क्रांती झाली आहे. संगणक व दूरदर्शन यांचे एकत्रीकरण झाले आहे. अनेक भन्नाट गोष्टी आता दूरचित्रवाणीवर करता येऊ लागल्या आहेत. त्यांत मनोरंजनाबरोबर ज्ञानही मिळू शकते. फक्त कल्पकतेने वापर करण्याची गरज आहे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.
तर हा होता दूरदर्शन शाप की बरदान मराठी निबंध (Doordarshan shap ki vardan marathi nibandh) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा
Read
Thank u so much for this nice essay
ReplyDeletePost a Comment