संगणक चे महत्त्व मराठी निबंध | Computer Essay in Marathi | Sanganak Che Mahatva Essay in Marathi

तुम्हा सर्वान साठी संगणक चे महत्त्व मराठी निबंध (sanganak che mahatva essay in marathi) लिहिला आहे. या निबंध मध्ये संगणक व त्याचे महत्व (Computer Essay in Marathi) या विषय वर चर्चा केली आहे.

essay on computer in marathi

या निबंध चे शीर्षक "संगणकाचे अधिराज्य" किंवा "संगणक ब त्याचे महत्त्व" किंवा "संगणक - काळाची गरज" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

संगणक चे महत्त्व मराठी निबंध

आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. संगणकाचा जन्म पाश्‍चिमात्य देशात झाला. चार्लस्‌ बॅबेज हा संगणकाचा जन्मदाता. इ. स. १८३२ मध्ये म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलेले हे बाळ भलेभक्कम आणि मोठे होते. त्याची कार्यक्षमताही मर्यादित होती. पण हा गुणी बाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा आकार अधिकाधिक लहान होत गेला आणि कर्तृत्वाच्या कक्षा मात्र सतत रुंदावतच गेल्या. म्हणून तर आज हा संगणक आपले अधिराज्य सर्वत्र स्थापू शकला आहे.

एकविसावे शतक हे ' ज्ञानयुग' आहे आणि या ज्ञानयुगाचा कळस म्हणजे संगणक ! आज या संगणकाला ' अशक्य ' हा ' शब्द माहीत नाही. एके काळी संगणक ही फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी होती. पण आज तो जनसामान्यांचा सेवेकरी झाला आहे. आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या प्रवासातील रेल्वेच्या वा विमानाच्या तिकिटांचे आरक्षण संगणक करतो. आपल्या घरात दरमहिन्याला येणारी विजेची व दूरध्वनीची बिले, विम्याचा हप्ता भरण्याची सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो. संगणकाने सर्व कामे सोपी, सुलभ आणि शिस्तीची केली आहेत. आणि आता तर मोबाईलमध्ये संगणक अवतरल्यामुळे दैनंदिन कामे विलक्षण वेगात व कार्यक्षमतेने करता येऊ लागली आहेत. त्यामुळे अखंड जगच खिशात आले आहे.

मोठमोठ्या संस्था, कारखाने, कचेऱ्या येथील बिले तयार करण्याची कामे संगणक करतात. शालान्त परीक्षा आणि इतर अनेक मोठमोठ्या परीक्षांचे निकाल संगणक तयार करतो. मोठमोठी पुस्तके, ग्रंथ अगदी सहजगत्या चुटकीसरशी संगणकाच्या साहाय्याने छापले जातात. बँका, विमा कंपन्या, शेअर्स कचेर्‍यांमधील हिशेब संगणक क्षणात बिनचूक करतात.

सध्याच्या विज्ञानयुगात सतत संशोधन चालू असते. या संशोधनाला संगणक मोठे साहाय्य करतो. या युगातील अंतराळविज्ञानाला संगणकाचा आधार लाभला आहे. अंतराळात उपग्रह सोडण्यास संगणकाने मदत केली आहे. हवामानाचा ' अंदाज, दूरदर्शनवरील चित्रदर्शन अशी किती कामे सांगावीत या संगणकाची ! इंटरनेटसारख्या चमत्काराने तत जग जवळ आणण्याचे महान कार्य केले आहे. आज कोणतेही क्षेत्र संगणकाच्या स्पर्शापासून दूर राहू शकत नाही, इतके या संगणकाचे माहात्म्य वाढले आहे.

असे या संगणकाचे अधिराज्य सर्वत्र आहे. म्हणून या संगणकाचे आपण गुलाम झालो आहोत काय? असा प्रश्‍न पडतो. पण विचारांती या प्रश्‍नातील फोलपणा लक्षात येतो. एक गोष्ट नक्की की, या संगणकाचा निर्माता माणूस आहे. माणूसच संगणकाला माहिती ब आज्ञावली देतो. अंतिमतः या अधिराज्याचा दूरस्थ नियंत्रक माणूसच आहे !! 

तर हा होता संगणक चे महत्त्व मराठी निबंध (importance of computer essay in marathi) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.


Read

मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध

विज्ञान आणि मानव मराठी निबंध

दूरदर्शन शाप की बरदान मराठी निबंध

झाडांवर मराठी निबंध

2 Comments

  1. I like this composition of Marathi and I write in my book for a reading anytime it is interesting so that is good passage. Thank you for posting this passage that's all thank you

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post