भ्रूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Bhukamp Grastache Manogat Marathi Nibandh

तुम्हा सर्वान साठी भ्रूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध (Bhukamp Grastache Manogat Marathi Nibandh) लिहिला आहे. या निबंध मध्ये एका भूकंपग्रस्ताचे आत्मकथन व्यक्त केला आहे. 

bhukampgrastache manogat marathi nibandh

हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. 

भ्रूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

एके दिवशी बाई वर्गात आल्या व म्हणाल्या, “ आज आपण निबंध लिहायचा.'' मुलांनी ' विषय कोणता, विषय कोणता,'' असा एकच गलका केला. त्या गलक्‍यातच बाईंनी विषय जाहीर केला - भूकंप ! ' भूकंप ' हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला...

''भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वत: भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेबण घ्यायचं आणि र्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम.  के दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली... फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली... अनेक गुरेढोरे, माणसे घरांखाली गाडली गेली. काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे , ओरडणे, किंकाळ्या, आर्त हाका यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली... आणि सर्वांसमोर उद्‌ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती. सर्व घरे, वाडे उद्‌ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्‌धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते. कित्येकांची डोकी फुटली होती. काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्तत: पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थेमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं ? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?

“त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्‌ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं. औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली... त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.

''नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारून आमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली , हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही  घड्यावर पडले आहेत.

"भूकंपाच्या आठवणी आल्या की, अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्‌ध्वस्त झालं. माझी बहीण , आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.

“नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय." 

तर हा होता एका भ्रूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

वादळग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

शेतकऱ्याचे  मनोगत निबंध

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post