भ्रष्टाचार वर मराठी निबंध | Corruption Essay in Marathi | Bhrashtachar Essay in Marathi
तुम्हा सर्वान साठी हा भ्रष्टाचार वर मराठी निबंध लिहिला (Bhrashtachar Essay in Marathi) आहे. या निबंध चे शीर्षक "भ्रष्टाचार हाच शिष्टाचार" पण असू शकते.
भ्रष्टाचार वर मराठी निबंध
हल्ली कोणतेही वर्तमानपत्र उघडा, भ्रष्टाचाराची बातमी नाही, असा दिवस नसतो. दररोज नित्य नवा ' आर्थिक घोटाळा ' जाहीर होत असतो. बँक घोटाळे, मुद्रांक घोटाळे, खोट्या नोटा छापणे... हे असे एक ना अनेक घोटाळे आता चिरपरिचित झालेत. लोकसभेत भ्रष्टाचारावर चर्चा करताना एकदा एक खासदार म्हणाले, '' भ्रष्टाचार नष्ट करून तो पैसा सरकारला मिळाला, तर देशभरातले रेल्वेचे लोखंडी रूळ बदलून सोन्याचे रूळ घालता येतील ! ''
पुराणकाळातील भस्मासुरापेक्षा या आधुनिक भस्मासुराच्या लीला महाभयंकर आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा स्वैर संचार चाललेला दिसतो. वाढत्या महागाईमागे याचाच हात आहे. कोणत्याही गोष्टीची कृत्रिम टंचाई हाच निर्माण करतो.
नोकऱ्यांची टंचाई असली, तर भ्रष्टाचाराला तेथे मुक्त वाव मिळतो. लाखो रुपयांची लाच देऊन अधिकाराच्या जागा ळवल्या जातात आणि एकदा अधिकाराची जागा मिळाली कौ, लाच म्हणून दिलेले पैसे वसूल करण्याच्या निमित्ताने लाच स्वीकारण्याची मालिका सुरू होते. असे हे एक दुष्टचक्र सुरू आहे. त्यातून ' काळा पैसा ' निर्माण झाला आहे.
विज्ञानाच्या बळावर व्यक्तिगत जीवनात अनेक सुखसोयी, चेनीच्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. त्याकरिता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीच तयारी नसते. सहजगत्या, सुलभतेने मिळणारा पैसा बहुतेकांना हवा असतो. पैशाच्या या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म होतो. पैसा हे एकदा ' सर्वस्व ' मानल्यावर, तो मिळवण्यासाठी वाट्टेल ते केले जाते. अन्नात भेसळ, पाण्यात भेसळ, औषधातदेखील भेसळ केली जाते. औषधातील भेसळीमुळे निरपराध जीवांचे बळी घेतले जातात.
भ्रष्टाचार करणाऱ्यांची विवेकशक्ती नष्ट झालेली असते. बालवर्गापासून शाळा-महाविद्यालयांपर्यंत प्रवेशासाठी लाच घेतली जाते. लाच घेऊन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात व लाच घेऊनच परीक्षेचे गुण फिरवले जातात. एवढेच नव्हे, तर वैयक्तिक स्वार्थासाठी देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला पुरवली जातात. चोरट्या व्यापाराला उधाण येते. नव्या पिढीला बरबाद करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराला जोर चढतो.
भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर तो भारताचा विध्वंस केल्यावाचून राहणार नाही. आजच्या युवकांनी त्यासाठी ' मोहिनीरूप' धारण करायला हवे व समाजातील भ्रष्टाचाराची मुळे उपटून काढून स्वच्छ जीवनाचा पाया घातला पाहिजे. त्यासाठी आज अशा असंख्य आधुनिक विष्णूंची आज गरज आहे.
तर हा होता भ्रष्टाचार वर मराठी निबंध (Bhrashtachar Essay in Marathi) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
Read
दुष्काळाचे संकट
ReplyDeletePost a Comment