मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Flag in Marathi Essay
तुम्हा सर्वान साठी मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध ( Autobiography of Flag in Marathi Essay) लिहिला आहे. या निबंध मध्ये राष्ट्रध्वज चे आत्मकथन (Mi rashtradhwaj boltoy) व्यक्त केला आहे.
या निबंध चे शीर्षक "राष्ट्रध्वजाची कहाणी" किंवा "राष्ट्रध्वज चे मनोगत" हे पण असू शकते.
मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध
मित्रांनो, तो दिवस मला अजूनही आठवतो. भारतीय क्रिकेट संघाने ' ट्वेंटी-ट्वेंटी 'च्या सामन्यांतील विश्वचषक
जिंकला आणि संपूर्ण देशात देशप्रेमाच्या लाटाच्या लाटा उसळल्या. मीसुद्धा बेभान होऊन लहरलो, फडकलो ! माझ्या देहाच्या प्रत्येक धाग्यातून, प्रत्येक तंतूतून देशप्रेमाचे वारे सळसळत होते ! त्या दिवशी मैदानावर सर्वत्र “माझीच रूपे फडकत होती. भारतीय खेळाडूंनी मला उंच उंच फडकवत मैदानात फेऱ्या मारल्या, तेव्हा मला धन्य धन्य वाटले ! हा मोलाचा क्षण मी कधी कधी विसरणार नाही ! मित्रांनो, ही प्रतिष्ठा, हा सन्मान माझ्या जन्मापासून मला मिळत आला आहे. माझी कहाणी तुम्हांला ठाऊक आहे का? ऐकाच तर मग माझी कहाणी...
'मित्रांनो, मी आज तुम्हांला दिसतो ना, तसा जन्माच्या वेळी नव्हतो. जन्मापासून माझ्यात खूप बदल होत गेले आहेत. मला अनेक रूपे मिळत गेली. माझा जन्म झाला २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीमध्ये. या दिवशी मादाम कामा या राष्ट्रभक्त महिलेने समाजवाद्यांच्या जागतिक परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज म्हणून तिरंगी निशाणाची निर्मिती केली. ते माझे पहिले रूप ! या निशाणात हिरवा, केशरी व तांबडा या रंगांचे तीन आडवे पट्टे होते. हिरव्या पट्ट्यात कमळाची आठ चित्रे, केशरी पट्ट्यात ' वंदे मातरम् ' ही अक्षरे आणि तांबड्या पट्ट्यात सूर्यचंद्राची चित्रे असा माझा एकंदरीत साज होता. पण मित्रांनो, या रूपामध्ये मी भारतात मात्र वावरू शकलो नाही.
“काही वर्षांनंतर, म्हणजे १९१६ साली अँनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी अटकेत असताना मला दुसरे रूप देण्याचा. प्रयत्न केला. पण हेही रूप फार काळ टिकले नाही.
“काही काळाने महात्मा गांधींनी माझ्या रंग-रूपाबाबत विचारमंथन सुरू केले. त्या वेळी आलेल्या अनेकांच्या सूचनांनुसार गांधीजींनी मला एक रूप दिले. ते काही काळ टिकलेही. मित्रांनो, नंतरही यात बदल होत गेले. आज तुम्हांला दिसते ना, ते माझे रूप २२ जुलै १९४७ रोजी निश्चित केले गेले. भारताच्या संविधान समितीने या दिवशी माझ्या या रूपाला मान्यता दिली. त्यानुसार गर्द केशरी, पांढरा व गर्द हिरवा या क्रमाने आडवे तीन पट्टे व मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगातील अशोकचक्र हे माझे रूप भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून सिद्ध झाले.
"डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी माझ्या या रूपामागचा राष्ट्रनेत्यांचा विचार छान समजावून सांगितला आहे. माझ्या अंगावरील तीनही रंग वेगवेगळ्या गोष्टींचे सूचक आहेत. केशरी रंग देशभक्ती आणि त्याग यांचे प्रतीक आहे; तर माझा हिमधवल रंग चारित्र्य, शांतता आणि मांगल्य यांचा सूचक आहे आणि हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते को, हे राष्ट्र धर्म, नीती आणि प्रगती यांच्याच मार्गावर अखंड गतिमान राहील.
“काही काळ मला माजे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. मी त्या आनंदाच्या उन्मादात वावरत होतो. पण देश हळूहळू घसरणीला कसा लागला होता, हे त्या आनंदात कळलेच नाही. राधाकृष्णन यांनी सांगितलेली तत्त्वे कुठल्या कुठे वाहून गेली. देशासाठी खस्ता खाणारे हळूहळू बाजूला पडले आणि मृतांच्या टाळूवरचेही लोणी खाणारे पुढे येऊ लागले. लबाड, स्वार्थी, चोर, लुटारू, बदमाश अशांनी देशाचा ताबा घेतला. चोऱ्या, दरोडे, हाणामाऱ्या, दंगली, बलात्कार या घटना तर नित्याच्याच होऊन बसल्या आहेत. आता भ्रष्टाचारही हजारो कोटी रुपयांच्या घरात होतो. जनतेच्या नावाने जनतेलाच राजरोस लुटले जात आहे.
नीतिमत्ता नावाची गोष्टच संपली आहे. नीतीने वागणे म्हणजे बावळटपणा व मूर्खपणा मानला जात आहे. अशा स्थितीत देशाचे काय होणार ? मी कोणाचा प्रतिनिधी ? सामान्य भारतीय जनतेचा की जनतेला फसवणाऱ्या बदमाशांचा ? मला या परिस्थितीच्या खूप खूप वेदना होत आहेत. ' '
तर हा होता राष्ट्रध्वज चे मनोगत मराठी निबंध (Autobiography Of Flag in Marathi Essay) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
Read
Post a Comment