Autobiography of a Tree in Marathi | मी झाड बोलतोय मराठी निबंध

या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे एका झाडाची आत्मकथा मराठी निबंध (Tree Autobiography In Marathi). या निबंध मध्ये एका झाडाचे मनोगत सांगितले आहे झाडाला कोण कोणत्या दिक्कत झेलावा लागतात आणि का झाड हे मानवानं साठी महत्वपूर्ण आहे हे या निबंध मध्ये सांगितलं आहे. 

Tree Autobiography In Marathi

आशा करतो झाडाचे मनोगत निबंध तुम्हाला नक्की आवडेल. 

मी झाड बोलतोय मराठी निबंध

माझ्या गावात एक मोठा कारखाना उभारण्यासाठी जंगलतोड सुरू होती. एकामागून एक झाडे तोडत सुटलेले काही लोक अखेर एका वटवृक्षाजबळ आले आणि ... आणि काय नवल! त्या वृक्षाने गर्जजा केली-''दूर व्हा कृतध्न करंट्यांनो, निर्दयी माणसांनो !'' क्षणात वृक्षतोड करणारे थबकले. सर्वांनी आश्चर्याने कान टवकारले. पुन्हा तो घनगंभीर आवाज कानी आला-

“अरे मूर्खांनो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. आजपर्यंत शेकडो पावसाळे मी पाहिले. भूमातेकडून होणारे लालनपालन आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगांतून सतत बहरत राहिलो आणि आता या माझ्या उतारवयातही मी काटक आहे, मजबूत आहे. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही. 

“मित्रांनो, मी केवळ एक जुना वठलेला वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे, हितकर्ता आहे. या गावाचा जन्म र्‍या गावाचा विकास, या गावाचे आजचे समृदूध स्वरूप या साऱ्यांचा मी एक मूक साक्षीदार आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबे येथे राहायला आली. पण तेव्हादेखील त्यांनी प्रथम माज्ञ पूजन करून नंतरच गावात प्रवेश केला. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत. ही प्रथा पिढ्यान्‌पिढ्या चालू राहिली.

“मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहुण्यांना, श्रान्त पांथस्थांना माझ्या शीतल सावलीत आसरा दिला. अनेक पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांद्यांवर खेळत असतात आणि रात्री माझ्याच फांद्यांवर 'विसावतात. गावातील सारी मुले सूरपारंब्या खेळण्यासाठी येथेच जमतात. कित्येक सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात. अशा रितीने माझा हा सारा आसमंत म्हणजे गावाचे एक तीर्थक्षेत्र बनला आहे.

“या गावकऱ्यांविषयी मला विलक्षण जिव्हाळा वाटतो. म्हणून उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या माझ्या फांद्यांनी मी वरुणराजाला सदैव कळकळीचे आवाहन करीत असतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे सावट कधीच भेडसावत नाही. लोकहो, तुम्ही गावाला नवे रूप देताना येथील जुन्या वृक्षांची कत्तल करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा. '' इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि काय चमत्कार ! वृक्षतोडीसाठी जमलेले सारे लोक दूर झाले, ते अधिक झाडे लावण्याच्या निर्धारानेच !

हा झाडाची आत्मकथा निबंध मराठी (Tree Autobiography In Marathi) निबंध तुम्हाला कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून नक्की कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share जरूर करा.


Read

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

माझी आई निबंध मराठी मधे 

झाडाचे महत्त्व मराठी निबंध

माझे बालपण निबंध

प्रदूषण वर मराठी निबंध

1 Comments

  1. मस्त आहे मला खूप आवडला

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post