स्त्री पूरूष समानता निबंध मराठी - Stri Purush Samanta Essay in Marathi

आजचा हे निबंध आहे स्त्री पुरुष समानते वर. आजचा आधुनिक युगात स्त्री आणि पुरुष या दोघांची काय स्तिथी आहे आणि या दोघांच्या समानते ची गरज आहे का ते ह्या स्त्री पुरुष समानता मराठी निबंध (stri purush samanta essay in marathi) मध्ये सांगितलं आहे.

Stri Purush Samanta Essay in Marathi

आशा करतो तुम्हाला हे  निबंध नक्कीच आवडेल.

स्त्री पूरूष समानता निबंध मराठी

'स्त्री व पुरुष ही संसाररथाची दोन चाके आहेत,' असे मोठ्या कौतुकाने म्हटले जाते. पण रथ नीट चालायला हवा तर ही चाके सारखी हवीत, त्यांत कोणताही लहानमोठेपणा असता कामा नये. संसारात स्त्री व पुरुष यांना समान हक्क, समान मान असतो का? फार पूर्वीपासून आपल्याकडे स्त्री घर सांभाळत असे आणि संपत्ती मिळवण्याचे काम पुरुष करीत असे. संसारगाडा चालवण्यासाठीच केलेली ही कामाची विभागणी होती. पण यांतूनच नकळत कमावणारा पुरुष प्रधान आणि अन्न शिजवणारी स्त्री ही गौण मानली जाऊ लागली. ' चूल-मूल ' सांभाळणाऱ्या स्त्रीला काय अक्कल असते, तिला काय कळतयं, हा विचारच मुळी स्त्रीला गुलाम बनवण्याच्या मनोभूमिकेतून पुढे आला. मग स्त्री झाली लाथा खाणारी पायाची दासी!

आज हे चित्र बदलले आहे. स्त्रीने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. शहरातील स्त्री कचेरीतील बौद्धिक काम लीलया करते. अगदी प्रमुख अधिकारपदही सांभाळते. विद्यालयांत, महाविद्यालयांत अध्यापनाचे कार्य करते. तिने वैद्यकीय क्षेत्राबरोबर स्थापत्य क्षेत्राहही नावलौकिक मिळवला आहे. आजच्या युगातील ' माहिती तंत्रज्ञान ' या क्षेत्राहही ती अग्रेर आहे. ती मोटारगाडी, आगगाडी, विमान चालवते. अंतराळात झेप घेते आणि समुद्राच्या तळाशीही संशोधनासाठी जाते. कोणतेही क्षेत्रतिला असाध्य नाही. खेड्यातही स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात; कष्टाची कामे करतात; गुरे सांभाळणे,

कुक्कुटपालन अशी कामे करतात; सरपंच, उपसरपंच अशी पदे सांभाळतात आणि गावाचे प्रश्‍न जिद्दीने सोडवतात. मग आतास्त्री व पुरुष यांत भेदभाव करणे योग्य आहे का?

दुर्दैवाची गोष्ट अशी की, अजूनही असा पक्षपात केला जातो. आजची स्त्री घरातील पत्नी, माता व सून या भूमिकांतील गृहिणीची जबाबदारी पार पाडतेच; शिवाय बाहेरची कामेही करते. मुलांचा अभ्यास, बँकादींशी संबंधित व्यवहार, आजारपण या जबाबदाऱ्याही ती पार पाडते. तरीपण काही घरांतून स्त्रियांच्या मताला किंमत दिली जात नाही.

काही खेड्यांत तालुक्‍याच्या ठिकाणी स्त्री सरपंच किंवा जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली, तरी काही मंडळी अजूनही तिला त्रास देतात; पण आजची सक्षम स्त्री त्यांना पुरून उरत आहे. आज ग्रामीण स्त्रिया आपले बचतगट स्थापन करून स्वावलंबी होत आहेत. तेव्हा आता स्त्रीला कमी लेखणे योग्य नाही. आईवडील हे दोघेही मुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, हे ओळखून आता विचारपूर्वक पावले टाकली जात आहेत. आता मुलांच्या सर्टिफिकेटस्‌, पदवी प्रमाणपत्रे यांत वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव छापले जाते. पुष्कळ वसाहतीत घरकुल हे घरातील स्त्रीच्या नावावर केले जाते. काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे, हे आता आपल्या समाजाने जाणले आहे. 


तुम्हाला हा स्त्री पुरुष समानते (Stri Purush Samanta Essay in marathi) वर चा निबंध कसा वाटलं आम्हाला सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा.

Share

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध

विज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध

झाडाची आत्मकथा निबंध मराठी

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post