श्रमाचे महत्त्व मराठी निबंध | Shramache Mahatva Nibandh in Marathi 

आज या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी आणला आहे श्रमाचे महत्त्व मराठी निबंध (Shramache Mahatva Nibandh in Marathi). हा निबंध मजदूर आणि श्रम वर आधारित आहे. तर हा आहे श्रमाचे महत्तव.

Shramache Mahatva Nibandh in Marathi

श्रमाचे महत्त्व मराठी निबंध

महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे आर्थिक घडामोडीचे प्रसिद्ध केंद्र. या मुंबापुरीत अगदी महत्त्वाच्या ठिकाणी ' हुतात्मा चौकात ' कामगार व शेतकरी यांचा पुतळा आम्ही उभारला आहे. कशासाठी ? आम्हांला साऱ्या जगाला सांगायचे आहे को, आमच्या राज्यात श्रमालाच प्रतिष्ठा आहे. या श्रमिकांच्या श्रमावरच या राज्याचे वैभव आहे. शेतकरी शेतात राबतो. कामगार यंत्रावर कष्ट करतो म्हणूनच देशाची प्रगती होते. मग अशा श्रमिकांना कमी का लेखायचे ?

कवी बा. सी. मर्ढेकरांनी या कामगाराचा उल्लेख * नव्या मनूचा गिरिधर पुतळा ' असा केला. सुप्रसिद्ध लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ठणकावून सांगितले आहे कौ, जगाचा डोलारा शेषनागाच्या मस्तकी नसून तो कामगारांच्या बाहूबरच सांभाळला गेला आहे. हे असे श्रमशक्‍तीला गौरवले गेले तरी आपल्या समाजात श्रमाला प्रतिष्ठा आहे का? आपल्या घरी एखादा अधिकारी वा एखादा धनिक माणूस आला, तर आपण त्याचा सन्मान करतो, त्याला आसन देतो. पण वर्षानुवर्षे आपली सेवा करणारे कामगार, सफाई कामगार, घरातील कामवाली, आपल्याला वर्तमानपत्रे आणून देणारे अशा मंडळींचे आपण कधी स्वागत करतो का ? म्हणजे खरोखरच आपल्याला श्रमाचे माहात्म्य उमगले आहे का?

आपल्या समाजात चातुर्वर्ण्य पद्धती निर्माण झाली ती कामाची विभागणी करण्याकरिता. असे करताना कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ मानले गेले नव्हते. पण कसे, केव्हा नकळे, समाजात अध्ययन, अध्यापन करणाऱ्यांना, संरक्षण करणाऱ्यांना, व्यापार करणाऱ्यांना महत्त्व आले आणि चातुर्वर्ण्यातील चोथ्या वर्गातील श्रमिकांना कमी लेखण्यात येऊ लागले. शेती करणाऱ्याला कुणबी ' ठरवले गेले. 'समाज, ग्राम यांची स्वच्छता करणाऱ्यांना शूद्र लेखण्यात येऊ लागले. त्यांतेन सामाजिक विषमता निर्माण झाली. समाजातील मूठभर स्वार्थी लोकांनी या कष्टकर्‍यांवर कडक, कठोर नियम लादून त्यांचे जगणे कठीण, भीषण करून टाकले. पण जेव्हा जुलमाचा कडेलोट झाला, तेव्हा बंडाचा झेंडा उभारला गेला.

खरे म्हणजे कष्टाची कामे करणे हे प्रत्येकाला उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतेच. शारीरिक श्रम न केल्यास नाना व्याधी आपल्या जीवनात उद्‌भवतात. म्हणून बुद्धिजीवी कामे करणाऱ्यांनीही दररोज काही वेळ शारीरिक श्रम केले पाहिजेत, तरच त्यांना श्रमाचा महिमा कळेल.

तुम्हाला हा  श्रमाचे महत्त्व मराठी निबंध (Shramache Mahatva Nibandh in Marathi) कसा वाटलं आम्हाला सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

माझी सहल मराठी निबंध

लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध

स्त्री पूरूष समानता निबंध मराठी

झाडाची आत्मकथा निबंध मराठी

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post