Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत | Sanskar Stories in Marathi

जर तुम्हाला लहान मुलांसाठी संस्कार कथा वाचायचे असेल तर तुम्ही सही ठिकाणी आले आहेत. लहान मुलानं मध्ये संस्कार टाकणे खूपच गर्जे चे असते मंहून त्या साठी हे १५ संस्कार कथा (Sanskar Katha in Marathi) आम्ही शोधून आणले आहे.

Sanskar Katha in Marathi

अशा करतो तुम्हाला या संस्कार गोष्टी (Sanskar stories in marathi with moral) नक्की आवडेल.


1. सदाचारी असेल तरचं लक्ष्मी, दान यांचा वास असतो

Sanskar stories in marathi

Sanskar stories in marathi: महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, 

‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला.

 त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही.

 तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’ राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही.

Read Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

2. राजा आणि पुजारी

Sanskar goshta in marathi

Sanskar goshta in marathi: एका गावात एक राजा राहत होता. तो देवभक्त होता. त्या गावात एक शंकराची पिंडी होती. त्याचा एक पुजारी होता. तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. त्याला अधून मधून देवदर्शन होत असे. राजा रोज देवळात जायचा. देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा. देवासाठी दानधर्म करायचा.

राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही ? पुजारी तर देवाला काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो ? एके दिवशी राजा देवळात गेला असताना पुजारी पूजा करत होता. तेवढ्यात थोडा भूकंप झाला. देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले. पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये. राजा लगेच पळून गेला. त्या वेळी पुजार्‍याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले.

Read Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत 

3. भगवंताच्या नामातच खरे सुख आहे

bhagvantachya navat khare sukh aahe

Sanskar Katha: एकदा एक साधू तीर्थाटन करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते राहू लागले. एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी साधूमहाराजांकडे येऊ लागली. प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले. प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. काही वेळा ते एखाद्या विषयावर प्रवचनही करत.

 एके दिवशी गावातील मंडळी जमली असता साधू त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून साधू महाराजांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते; पण ते शक्य आहे का ? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषधपाणी करावे लागते. या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते. अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू ?”

साधू महाराजांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते हसून त्यांना म्हणाले, ”काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का ? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही. हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की, आतापर्यंत केली तेवढी काळजी पुरे. काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले, तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते. भगवंत सर्वशक्तीमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. यासाठी जास्तीतजास्त वेळ भगवंताचे स्मरण करण्यात घालवावा.” हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली.

तात्पर्य :- मनाचे समाधान जर टिकवायचे असेल, तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी जास्तीतजास्त वेळ नामस्मरणात घालवावा.

Read Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

4. गुरुपदेश

gurupdesh sanskar story

एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. 

कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल.

तात्पर्य :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो.

Read Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा

5. सत्संगाचा महिमा 

santangachya mahima sanskar story

एकदा राहूगण राजा पालखीत बसून कपील मुनींच्या आश्रमात जात होता. पालखीचा एक सेवक आजारी पडला. त्यामुळे राजाने सांगितले, ‘‘जो कोणी दिसेल त्याला पालखी उचलण्यासाठी घेऊन या.’’ सेवकांनी भरताला पाहिले. ‘हा चांगला तगडा जवान आहे’, असे वाटून त्यांनी त्यालाच पकडून आणले. पालखी घेऊन जात असतांना राजाने भरताचा अपमान केला. तो म्हणाला, ‘‘तू नीट चालत नाहीस. वाकडा-तिकडा चालतोस, त्यामुळे मला पालखीत पुष्कळ त्रास होतो.’’ एकदा राजाचे डोके पालखीच्या लाकडावर आपटले. त्या वेळी राजाने भरताला सांगितले, ‘‘तुला मी दंड करीन.’’

 वास्तविक राजाकडून भरताने एक दमडीसुद्धा घेतली नव्हती किंवा अन्नसुद्धा सेवन केले नव्हते, तरीपण राजाच्या अहंकारी वृत्तीने भरताला मारायला राजा प्रवृत्त झाला. भरताने विचार केला की, राजा आपल्या शरिराला मारतो, आत्म्याला काहीच होत नाही; म्हणून मी मौनच धरीन.भरताने विचार केला, 

‘राहूगण राजाला मी उचलले आहे. जर राजाचा अहंकार नष्ट न झाल्यामुळे तो नरकवासी झाला, तर सत्संगाचा महिमा नष्ट होऊन जाईल.’ लोक म्हणतील, ‘‘जडभरताच्या संगतीत राहूनसुद्धा राजाला नरकवास घडला.’’ सत्संगाचा महिमा कायम राखण्यासाठी भरताने मौन सोडले आणि राजाशी बोलायला प्रारंभ केला. भरताने राजाला उपदेश केला, ‘‘राजा कल्याण होवो. तू कपील मुनींच्या आश्रमात उपदेश घेण्यासाठी जात आहेस; पण तुझा अहंभाव सोडून जा.’’ त्या वेळी राहूगण राजाने भरताची क्षमा मागितली; म्हणून भरताने राजाला आत्मज्ञानाची अनुभूती दिली.’

Read Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये

6. चाणक्य कौटिल्य

Sankar stories in marathi:

Sankar stories in marathi: आचार्य चाणक्याकडे म्हणे कोणीतरी एक चिनी प्रवासी आला होता. ज्यावेळी तो भेटायला आला त्यावेळी हा विष्णुगुप्त (चाणक्य कौटिल्य) लिहित बसलेला होता. त्याकाळी मोठे दिवे नव्हते, वीज नव्हती, आपल्याला ज्ञात आहे. तेलाचे दिवे लावलेले असत. त्या तेलाच्या दिव्यामध्ये विष्णुगुप्त लिहित बसलेला होता. संध्याकाळचा समय होऊन गेलेला होता. काही महत्वाची कागदपत्रे लिहित होता. लिहित असताना तो चिनी आला, त्याचेआचार्य चाणक्यानेस्वागत केले, त्याला बसवले, आणि मग आपल्या हातातले लेखन कार्य विष्णुगुप्ताने पूर्ण केले. पूर्ण केल्यानंतर त्याने काय केले? त्याच्यासमोर दोन दिवे होते. एक प्रज्वलित झालेला होता व एक तसाच होता.

 चाणक्याने प्रथम आपल्या समोरचा दिवा विझवला आणि दुसरा दिवा प्रज्वलित केला. त्यावेळी तो चिनी प्रवासी कुतुहलाने पाहू लागला. हे असे कशासाठी करतो आहे चाणक्य? त्याला असे वाटले की बहुधा भारतातील ही प्रथा असावी. पाहुणा आला की बहुधा असे करत असावेत. मग कुतुहलाने त्याने प्रश्न विचारला चाणक्याला, 'आपल्याकडे प्रथा आहे का की पाहुणा आला की असे करावे?' एक दिवा विझवायचा आणि दुसरा लावायचा?.

तेव्हा चाणक्य म्हणाला, 'असे नाही. मी ज्या दिव्याच्या प्रकाशात आत्ता काम करत होतो ते माझ्या राज्याचे काम होते, माझ्या राष्ट्राचे काम होते आणि त्या दिव्यामध्ये जे तेल भरलेले होते ते राष्ट्राच्या पैशातून भरलेले आहे. आता मी तुमच्याशी संवाद करणार हा माझा व्यक्तिगत संवाद असेल. हा संवाद राष्ट्राचा नाही! ते राष्ट्राचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझवला, आणि दुसऱ्यात माझ्या स्वकष्टाचे तेल घातले आहे. म्हणून तो दुसरा दिवा पेटविला.'

आमचे आचार्य एवढ्या उंचीवर होते हे पाहून मन थक्क होऊन जाते. इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलेली ही माणसे पाहिली की काही वेळेला असे वाटते की आम्ही त्यांना अंशतः का होईना अनुसरले पाहिजेच. किती शुध्द वागणे, किती शुध्द आचार, किती शुध्द मन, किती शुध्द चित्त आणि अंतःकरण असेल ! आपल्या मनाशी आपण जरा कल्पना करून पाहा. या आचार्यांना कोणती पदवी द्यावी? कोणत्या स्तराला आणि कोणत्या अत्युच्च वैचारिक बैठकीवर हे आरूढ झालेले आहेत, त्याला काय म्हणावे? आमची माणसे केव्हा शिकतील? राज्यकर्त्यांनी खरे तर यातून शिकले पाहिजे ! पण दुर्दैवाने कोणी शिकत नाही.

Read भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

7. साधनेने संचित आणि इच्छा यांचाही नाश होणे

Marathi Madhe Sanskar Katha

Marathi Madhe Sanskar Katha: विद्यारण्य स्वामींची परिस्थिती गरिबीची होती; म्हणून अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्राची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. त्या वेळी त्यांनी थकून संन्यास घेतला आणि त्यांना गायत्रीमातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे.

काय पाहिजे ते मागून घे.’’ स्वामी म्हणाले, ‘‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू प्रसन्न झाली नाहीस. असे कशासाठी झाले ? आता मला काही नको आहे आणि तू तर वर द्यायला आली आहेस.’’ देवी म्हणाली, ‘‘कित्येक पूर्वजन्मांची पापे तुझ्या तपश्चर्येने जळून गेली. मागे वळून पहा. चोवीस पर्वत जे जळत आहेत, ती तुझी पापे होती. ती जळून नष्ट झाली. तुझ्या पापांचा क्षय झाल्यावर लगेचच मी आले.’

Read Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत

8. वासनेत अडकल्यावर प्रगती न होणे

Sanskar stories in marathi with moral

Sanskar stories in marathi with moral: एक जण स्वतःहून गोकुळात जायला निघाला. त्याला नावेत बसून यमुना पार करायची होती; पण तो भांगेच्या नशेत होता. नावेत बसला आणि वल्ही मारायला लागला. संपूर्ण रात्र नाव चालवली, सकाळ झाली. मथुरेसारखे दुसरे कोणते गाव आले; म्हणून त्याने एकाला विचारले, तर ती मथुराच होती. मग त्याच्या लक्षात आले की, त्याने नावेचा दोरखंड सोडलाच नव्हता. नशेत असल्यामुळे तो दोरखंड सोडायचा विसरला होता. सर्व रात्र वल्ही मारूनही तिथेच होता. 

तात्पर्य :- आपण सुद्धा जीवन नौकेतून प्रवास करतांना वासना रूपी दोर न सोडल्यास भगवंतापर्यंत पोहोचणार नाही.

Read Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत

9. जगाला सुधारू शकत नसल्याने स्वतःला सुधारणे आवश्यक !

marathi madhe sanskar goshti

marathi madhe sanskar goshti: एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोडा युवराज्ञीला दिला.

तात्पर्य : जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे, त्याला काटे बोचत नाहीत; म्हणूनच स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही.

Read तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

10. साधू आणि जिज्ञासू तरुण

marathi sanskar katha

‘एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ साधू म्हणाला, ‘‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनक राजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्या वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. 

त्याने त्याला तोच प्रश्न विचारला, ‘‘योगीराज, मुक्ती मिळवण्यासाठी घरादाराचा त्याग करून वनातच तपश्चर्येला गेले पाहिजे का ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘अर्थातच ! नाहीतर घरादाराचा त्याग करून शुक-सनकादी सारखे मोठमोठे साधक मुक्तीसाठी वनात गेले, ते काय मूर्ख होते ? ’’एकाच प्रश्नाला त्या साधूने दिलेली परस्पर विरोधी अशी उत्तरे ऐकून त्या साधूच्या सहवासात रहाणारा त्याचा शिष्य गोंधळात पडला.

तो दुसरा तरुण तेथून निघून जाताच त्या शिष्याने त्या साधूला विचारले, ‘‘गुरुदेव, आपल्याकडे एका पाठोपाठ एक आलेल्या त्या दोन साधकांचा प्रश्न एकच असतांना आपण त्यांना परस्परविरोधी अशी दोन उत्तरे का दिलीत ? त्यातले सत्य उत्तर कोणते समजायचे ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘बाळ, मी दिलेली दोन्ही उत्तरे सत्य आहेत.

 माझ्याकडे जो पहिला प्रश्नार्थी आला होता तो एकीकडे प्रपंच करता करता जीवनमुक्तीसाठी आवश्यक असलेली साधना करू शकेल, अशा कुवतीचा होता; पण नंतर जो तरुण आला त्याला घरात राहून जीवनमुक्तीसाठी करावी लागणारी आवश्यक ती साधना करणे कठीण गेले असते; म्हणून मी त्या त्या प्रमाणे उदाहरणे देऊन त्यांना पटवून दिले.’

Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

11. वीर अभिमन्यू

veer abhimanyu sanskar katha

कुरुक्षेत्रावर कौरवपक्षाकडील रथी-महारथींशी प्राणपणाने झुंज देऊन वीरमरण पत्करणारा अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा होता. तो अर्जुनासारखाच शूर होता. त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे सखोल ज्ञान होते. त्या बालवीराने दाखवलेल्या शौर्याची तुलनाच होऊ शकत नाही.

कौरव-पांडवांचे युद्ध झाले, त्या वेळी द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती होते. पांडवांच्या सेनेकडून सतत पराभव पत्करावा लागल्यामुळे ते दु:खी होते. पांडवांचा पराभव करण्यासाठी द्रोणाचार्यांनी आपल्या सैन्याची चक्रव्यूह रचना केली. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांविना कोणालाही हा चक्रव्यूह भेदून जाता येणार नाही, हे द्रोणाचार्यांना ठाऊक होते. श्रीकृष्णाने हाती शस्त्र धरणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती आणि अर्जुन युद्धभूमीपासून दूर लढाईत गुंतला होता. आता काय करावे ? पांडव चिंतेत पडले. एवढ्यात अभिमन्यू पुढे आला नि धर्मराजांना म्हणाला, ”काका, मला आज्ञा द्या, मी हा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश करीन. आपण काळजी करू नये.”

 धर्मराजांना अभिमन्यूचा पराक्रम ठाऊक होता; पण लहान मुलाला कशी परवानगी द्यावी, हे कळेना. अभिमन्यूच्या हट्टापायी मोठ्या नाईलाजाने त्यांनी त्याला परवानगी दिली. त्या वेळेला अभिमन्यू केवळ सोळा वर्षांचा होता.

धर्मराज आणि अन्य पांडव यांचा आशीर्वाद घेऊन अभिमन्यू कौरव सेनेने रचलेल्या त्या चक्रव्यूहात शिरला. त्याच्यासमवेत त्याचे सैन्य होते. लढत लढत तो फार पुढे गेला. त्याची आणि सैन्याची चुकामुक झाली, तरी तो सारखा पुढे पुढे जात राहिला. अभिमन्यूने हत्ती, घोडे, सैन्य यांचा नाश चालवला. त्याने द्रोणाचार्य आणि इतर वीरांना फार त्रासवून सोडले. त्याचे शौर्य पाहून कौरवही आश्चर्यचकित झाले. अभिमन्यू लढता लढता बेशुद्ध पडला. तशा अवस्थेत असतांना दु:शासनाने त्याच्यावर गदेचा प्रहार केला. तेव्हा अभिमन्यूचा अंत झाला.

अभिमन्यू मरण पावला असतांना जयद्रथाने त्याच्या डोक्यावर लाथ मारली. मोठमोठ्या वीरांना भारी पडणारा चिमुकला वीर अभिमन्यूच्या शवाला अनादराने लाथ मारल्यामुळे पांडवांना राग आला. त्याच क्षणी अर्जुनाने जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे प्रतिज्ञा पूर्ण करून अर्जुनाने आपल्या पुत्राच्या वधाचा सूड घेतला.

तात्पर्य :- शौर्य आणि धैर्य असावे, तर असे. अभिमन्यूने लहान वयातच अतुलनीय पराक्रम गाजवला. कुठलीही गोष्ट शौर्यानेच प्राप्त होते.

Read लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी

12. एकीचे बळ

ekiche bal sanskar katha

एकेकाळी इंग्रजांचे राज्य होते. एके ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर पुरुषमंडळी बाहेर पडली. स्त्रियाही बाहेर पडत होत्या. तेवढ्यात दोन गोरे आरक्षक दारू प्यालेल्या अवस्थेत स्त्रियांच्या द्वारासमोर येऊन उभे राहिले. वायफळ बडबड करत त्यांनी स्त्रियांचा मार्ग अडवला. त्यामुळे त्या स्त्रियांना बाहेर पडता येईना. त्यांच्या घरची मंडळी त्यांची वाट पहात त्याच द्वारासमोर उभी होती; परंतु त्या गोऱ्या आरक्षकांना वाट सोडून देण्यास सांगण्याचे कोणी धाडसही केले नाही. बराच वेळ असाच गेला.

त्याच वेळी मार्गाने दोन मराठी युवक जात होते. द्वाराबाहेर असलेली दाटी पाहून त्यांनी काय प्रकार आहे, याची चौकशी केली. जेव्हा त्यांना सर्व परिस्थिती कळली, तेव्हा त्यातला एक तरुण आपल्या मित्राला म्हणाला, ”चल, आपण त्या महिलांना साहाय्य करू.” त्यावर मित्र म्हणाला, ”माधव, कशाला नसती कटकट मागे लावून घेतोस ?” एवढे बोलून तो मित्र निघूनही गेला. माधवला मात्र रहावले नाही.

 तो पुरुषांच्या दाटीत जाऊन सर्वांना उद्देशून म्हणाला, ”हटवा ना त्या गोऱ्या आरक्षकांना!” सगळयांना त्याचे म्हणणे पटत होते; परंतु त्यासाठी पुढाकार घेणार कोण, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे सगळेच गप्प होते, हे माधवच्या लक्षात आले. ‘चला मी होतो पुढे’, असे म्हणून माधव त्या आरक्षकांच्या जवळ जाऊ लागला. हळूहळू लोकही पुढे सरकू लागले. आरक्षकांच्या जवळ जाऊन माधवने त्या आरक्षकांना दरडावून सांगितले, ”येथून निघून जा. नाही गेलात, तर आमचा चमू पहात आहात ना ?” त्याचा कणखर आवाज आणि त्वेष पाहून ते आरक्षक घाबरले आणि तेथून पळाले.

लोकांनी माधवला धन्यवाद दिले. माधव म्हणाला, ”तुम्ही इतके जण असूनही त्या दोघांना घाबरलात ? आपण संघटित शक्ती दाखवली नाही, तर ते आपल्या दुबळेपणाचा लाभच घेतील. जर एकीचे बळ दाखवले, तर त्यांचे काय सामर्थ्य आहे ? समोरच्यांच्या शक्तीला घाबरण्यापेक्षा आपली शक्ती त्यांना दाखवा.”

 हाच तरुण माधव पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा अनेक वर्षे सरसंचालक होता.

तात्पर्य :- आपण एकटे काही करू शकत नाही; परंतु आपण संघटित झालो, तर नक्कीच विजयी होतो. कुठलाही लढा द्यायचा असेल, तर संघटित होणे आवश्यक आहे.

13. दशरथ कौसल्या विवाह

dashrath kaushalya vivah katha

लंकेचा राजा रावण याला भेटण्यासाठी एकदा नारद गेले होते. तेव्हा मोठ्या गर्वाने रावणाने आपल्या सामर्थ्याचे वर्णन केले; परंतु नारदांनी त्याला सूर्यवंशातील दशरथ- कौसल्या यांचा पुत्र श्रीरामचंद्र यांच्या हातून तुझा मृत्यू आहे असे सांगून सावध केले. या भविष्याची सत्यता पडताळण्यासाठी रावण ब्रह्मदेवांना भेटला. त्यांनी हे खरे असल्याचे सांगून आजपासून तिसर्‍या दिवशी दशरथ कौसल्येचा विवाह कोसल देशाच्या राजधानीत होणार असल्याचे सांगितले. हा विवाह होऊच नये म्हणून रावणाने सैन्य पाठवून कौसल्येला पळवून आणले; पण स्त्री हत्येचे पातक नको म्हणून एका पेटीत तिला बंद करून समुद्रात सोडले. 

त्या पेटीवरून दोन माशांत भांडण सुरू झाले व युद्धात जो जिंकेल तो पेटीचा मालक होईल असे ठरले. त्यांनी ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. इकडे अजपुत्र दशरथ कोसल देशाला जाण्यासाठी आप्तेष्ट व सैन्य यांच्यासह जहाजातून समुद्रमार्गे निघाला. रावणाला हे कळताच आकाशातून शस्त्रवृष्टी करून त्याने जहाजे फोडून पाण्यात बुडवली. एका फळीच्या आधारे दशरथ पोहत एका बेटावर पोचला. तेथे त्याने ती पेटी पाहिली. 

ती उघडताच आत कौसल्या दिसली. दोघांनी एकमेकांना सर्व हकिकत सांगितली. विवाहाच्या ठरलेल्या दिवशीच दोघांची योगायोगाने गाठ पडली. अत्यंत आनंदाने पंचमहाभूतांच्या साक्षीने दोघांनी विवाह केला. दिवसा त्या बेटावर फिरावे व रात्री पेटीत राहावे, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. एके रात्री युद्धात जिंकलेला तो मासा पेटीपाशी आला व त्याने ती पेटी दाढेत धरून लंकेच्या किनार्‍यावर आणली.

ब्रह्मदेवाची वाणी असत्य झाली हे त्याला कळवावे म्हणून मोठ्या प्रौढीने तो ब्रह्मदेवाकडे गेला, तर दशरथ कौसल्येचा विवाह झाल्याचे त्याला कळले. तसेच त्यांचा ठावठिकाणाही त्याला कळला. रावणाने परत जाऊन ती पेटी आणवली व त्या दोघांस मारून टाकण्यासाठी तलवार उपसली. दशरथही क्षात्रधर्माला जागून युद्धास तयार झाला; पण रावणाची पत्नी साध्वी मंदोदरी हिने परोपरीने रावणाची समजून घालून अनर्थ टाळला. आपल्या अविचाराने राम आताच अवतार घेईल या भीतीने रावणाने हात आवरला व दशरथ कौसल्या यांना विमानाने अयोध्येस पाठवले. दोघे सुखरूप परत आलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला.

14. जीवटाख्यान

Sacraments stories in marathi:

Sacraments stories in marathi: श्रीरामांनी वसिष्ठांना विचारले, "प्रपंच मिथ्या असूनही सत्य कसा भासतो?" यावर वसिष्ठ उत्तरले, "जीव भ्रमांच्या परंपरेत पडतो, त्यामुळे असे होते." उदाहरण म्हणून त्यांनी पुढील आख्यान ऐकवले- समाधी अभ्यासलेला एक भिक्षू असाच चिंतन करीत असता त्याच्या मनात सामान्य जनांप्रमाणे जगावे असे आले.

 लगेचच तो तसा झाला. त्याने ‘जीवट’ असे नाव घेतले. असाच एकदा तो स्वप्नात रममाण झाला होता. त्या स्वप्नातील नगरीत मद्यपान करून तो निजला असता त्याला स्वप्न पडले. त्यात तो वेदसंपन्न, प्रतिभावान ब्राह्मण झाला. दमून तो ब्राह्मण एकदा झोपला असता त्याच्या स्वप्नात तो एक मंडलीक राजा झाला. तो राजाही गाढ झोपला असता स्वप्नात तो एक चक्रवर्ती सम्राट झाला.

 याप्रमाणे स्वप्नांचा क्रम चालू राहून तो पुढे स्वप्नातच अप्सरा, हरिणी, वेल, भ्रमर व पुढे हत्ती झाला. तो हत्तींना धरण्यासाठी बनवलेल्या खड्ड्यात पडला असता सैनिकांनी त्याला साखळीने बांधून राजाकडे नेले. एकदा युद्धात तो हत्ती मारला गेला. मृत्युसमयीच्या भ्रमविषयक विचारांमुळे तो पुन्हा भ्रमर होऊन हत्तीच्या पायाखाली चुरडला गेला. अनेक योनींतून जाऊन तो ब्रह्मदेवाचा हंस झाला. ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाने केलेल्या विवेक, वैराग्य यांच्या उपदेशांनी तो ज्ञानी होऊन लौकिक जग असार आहे असे त्याला वाटू लागले.

एकदा तो हंस ब्रह्मदेवाबरोबर रुद्रपुरास गेला असता अनायासे त्याला रुद्रदर्शन झाले. रुद्राचे ज्ञान पाहून हंसाला ’मी रुद्रच आहे’ अशी भावना झाली. रुद्ररूपी होऊन त्याने हंस शरीराचा त्याग केला. आपली बुद्धी व ज्ञानाच्या साह्याने तो रुद्र आपला मागील सर्व वृत्तांत पाहू लागला. आपल्या शेकडो स्वप्नांनी स्तिमित झालेला तो भिक्षू स्वतःशीच म्हणू लागला, खरोखर विश्‍वाला मोह पाडणारी ही सर्व माया पसरलेली आहे. ती असत्यच आहे. पण मृगजळाप्रमाणे ती सत्य भासते. 

परंतु जन्ममरण परंपरेने आपला शेवटी रुद्राशी संगम होताच आपले शास्त्राचे अध्ययन तत्त्वज्ञानाने फलित झाले. म्हणजेच शास्त्रीय साधनाभ्यास श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे या भिक्षूला आपल्या स्वरूपाचे ज्ञान झाले व त्याला आपला भ्रम कळला. रुद्र, भिक्षू, जीवट हे शरीरांनी जरी त्रिरूप होते, तरी आतून एकरूप झाले. त्या भिक्षूच्या सर्व स्वप्नशरीरांनी रुद्राशी एकरूप होऊन रुद्राशी एकरूप होऊन परस्परांचे पूर्वोत्तर संसार पाहिले व कृतकृत्य होऊन ते सुखी झाले.

15. समर्पण

samarpan marathi sanskar story

एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. 

हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.


तर ह्या होत्या काही संस्कार कथा मराठी मध्ये (Sanskar Katha in Marathi) जर या संस्कार कथा वाचून तुम्हाला काही शिकाला भेटले असेल तर आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत share जरूर करा

Post a Comment

Previous Post Next Post