मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध | Manavta Hach Khara Dharma Nibandh in Marathi
या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी आणला आहे मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध (manavta hach khara dharma nibandh in marathi). आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.
मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध
'सारी माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत,' असे आपल्या थोर साधुसंतांनी सांगितले आहे. पण तरीही आपण सतत आपापसांत झगडत असतो. माणसांमधील या संघर्षाला कधी धर्म कारणीभूत ठरत असतो, तर कधी धन; कधी जात, तर कधी भाषा. आपल्यातील काही लोकांना कमी दर्जाचे मानून स्वार्थी धर्ममार्तंडांनी त्यांना हजारो वर्षे आपल्यापासून दूर ठेवले. त्यांची सावलीदेखील अपवित्र, अपशकुनी मानली. त्यांना गावकुसाबाहेर ठेवले. ज्यांच्यावर अन्याय होतो तीदेखील माणसेच आणि अन्याय करणारीही माणसेच ! केवढा हा दैवदुर्विलास !
ज्या थोर महात्म्यांनी हे विदारक सत्य जाणले , त्यांनी विषमतेची ही दरी बुजवण्याचा अथक प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सर्वांना मानवधर्माची साद घातली. संत ज्ञानेश्वरांच्या काळी चातुर्वर्ण्याचे स्तोम माजले होते. स्वार्थी माणसांनी आपल्याभोवती रूढीचे अडथळे उभारले होते. संत ज्ञानदेवांनी ते अडथळे दूर केले. सर्व जातीजमातींच्या लोकांना त्यांनी पंढरीच्या वारीत सामील करून घेतले.
संत ज्ञानेश्वरांचे हे कार्य संत एकनाथांनी पुढे चालू ठेवले. रखरखीत वाळवंटात उन्हाचे चटके असह्य होऊन रडणाऱ्या बाळाला जातिपातीचा विचार न करता त्यांनी उचलून प्रेमभराने उराशी कवटाळले. वडिलांच्या श्रादधाला त्यांनी हरिजनांना स्वतःच्या पंक्तीला बसवून जेवू घातले आणि त्यांच्या आग्रहाखातर नाथ त्यांच्याकडे जाऊन जेवलेही. माणसाने माणसामाणसांत भेद करणे योग्य नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले.
आजही हजारो आदिवासींना वेठबिगाराचे जीवन जगावे लागते. त्यांना गुरांहूनही अधिक राबवून घेतले जाते. त्यांचे श्रम कवडीमोलाने विकत घेतले जातात. त्यांच्या स्त्रियांच्या शीलाची बूज राखली जात नाही. माणसे माणसांना गलामाप्रमाणे वागवतात. अशा तर्हेची आसुरी वागणूक अनेक देशांतून आजही आढळते. कुठे काळा-गोरा, कुठे स्पृश्य-अस्पृश्य अशा वेगवेगळ्या रूपांत ती आढळते. म्हणूनच साऱ्या जगात एकाच धर्माचे पालन व्हायला हवे व तो धर्म म्हणजे ' मानवताधर्म' होय.
आजच्या या विज्ञानयुगात हळूहळू का होईना, मानवताधर्माची पुनश्च चाहूल लागत आहे. गात्रदान, नेत्रदान, रक्तदान, मूत्रपिंडदान इत्यादी दानप्रकारांतून ही चाहूल व्यक्त होते. कुष्ठरोगी व अपंग यांच्याविषयी आज सर्वत्र दिसणारी ममत्वाची भावना ही देखील मानवताधर्माची द्योतक म्हणावी लागेल. या विज्ञानयुगात माणसाने 'हे विश्वचि माझे घर' ही भावना हृदयात सतत जोपासली पाहिजे. मग सर्वत्र मानवधर्माची दिव्य पताका डौलाने फडकताना दिसेल.
तुम्हाला हा मानवता वर चा निबंध (manavta haach khara dharm) कसा वाटलं आम्हाला सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा.
Read
माझा एक स्वरलिखित निबंध तुमच्या मार्फत प्रसिद्ध कराल का ? कृपया मला कळवावे .
ReplyDeleteवरील निबंध हा उत्तम लिखाणाचे उदाहरण आहे , धन्यवाद .
apla nibandh techstudy.in@gmail.com var send kara.
ReplyDeletePost a Comment