महाभारत कथा मराठीत | Mahabharat Stories in Marathi | Mahabharat Katha in Marathi
आम्हाला माहित आहे तुम्ही सगड्यांना महाभारत च्या कथा (Mahabharat Stories in Marathi) वाचायचे वाचायचे आहे. खाली तुम्हा सगड्यां साठी काही महाभारत च्या गोष्टी लिहिल्या आहे.
तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल.
1. हस्तिनापुरात पांडवांचे आगमन
mahabharat katha in marathi: हस्तिनापुरात पांडवांचे पर्दापण होत आहे, ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.
हस्तिनापुर मध्ये चर्चा चालू होती की, “पांडव हे कौरवेश्वर पंडू राजाचे पुत्र आहेत. ते सगळेजण अतिशय चांगले आहेत. त्यांच्यातील मोठा युधिष्ठिर हा आपला राजा होणार आहे. आता आपण त्यांच्या स्वागताची तयारी करू या.”
असे म्हणत सर्व लोकांनी रस्त्यावर कमानी उभारल्या, रस्ते सजवले, रांगोळया काढल्या. ते सर्वजण येताच नगारे वाजवले. तुताऱ्या फुंकल्या गेल्या. त्यांच्यावर त्यांनी फुलांचा व लाहयांचा वर्षाव केला. काही स्त्रियांनी त्या राजपुत्रांना ओवाळले. अशा रीतीने सर्व लोकांनी त्यांचे अतिशय उत्तम प्रकारे स्वागत केले.
त्या लोकांमधील एक म्हातारी त्या मुलांना पाहून म्हणाली, “ही मुले किती छान आहेत जशी ती कमळाची फुलेच जणू!”
त्यावर दुसरी म्हणाली, “खरोखरेच हे शूर असून पंडूचे पुत्र शोभत आहेत.
तेवढयात तेथे त्यांच्या आईचे म्हणजे कुंतीचे आगमन झाले. तेव्हा तिसरी म्हणाली, “ती बघा, यांची आई कुंती देखील आली.
कुंतीला बघून एक म्हातारी तिला म्हणाली, “तुझ्या पतीचा मृत्यू झाला असे समजल्यावर आम्हाला फार वाईट वाटले. पण तू येथे आलीस, हे फार बरे केलेस. कारण आता त्यामुळे आम्ही सुखी होऊ.”
तेव्हा कुंतीने तिला विचारले - “बाई, तुम्हाला काही दुःख आहे का?”
त्यावर ती बाई हळू आवाजात कुंतीला म्हणाली, “महाराणी कुंती, आता मी तुम्हाला कसे सांगू, तुमचे दीर आंधळे आहेत, आणि त्यातून ते त्यांच्या मुलाच्या सांगण्याप्रमाणेच वागतात. त्यांचा मुलगा स्वभावाने अतिशय अहंकारी व स्वार्थी आहे. आणि त्यांच्या ताब्यात आम्ही सापडलो आहोत.”
पंडुपुत्र पुढे चालत होते. त्यांच्याच मागे कुंती होती व त्यामागे ऋषिमुनी चालले होते. मागून हस्तिनापूरचे असंख्य नागरिक येत होते. सर्वजण ओरडून घोषणा देत होते, “महाराणी कुंतीदेवी आणि पंडुपुत्रांचे स्वागत असो. कौरवेश्वर युधिष्ठिराचा विजय असो!”
या सर्वांची मिरवणूक धृतराष्ट्राच्या महालाजवळ आली. त्यांचा आवाज ऐकून धृतराष्ट्र व गांधारी हे दोघेही बाहेर आले. गांधारीच्या डोळयावर पट्टी बांधलेली होती. त्यांनी ऋषिमुनींचे, कुंतीचे व पंडुपुत्रांचे सर्वांचे स्वागत केले.
त्यांच्याकडे बघून कुंती व तिच्या पुत्रांनी त्यांना प्रणाम केला.
कुंतीला गांधारीने जवळ घेऊन आपल्या हृदयाशी धरले. तेव्हा त्या दोघींच्याही डोळयातून अश्रू वाहत होते.
नंतर ऋषिंमधील सगळयात मोठे जे ऋषि होते ते धृतराष्ट्राला म्हणाले, “हे धृतराष्ट्रा, हे पांडव पुत्र अतिशय सज्जन व चांगले असून ते आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहोत. पंडू आणि विदुर हे दोघे तुझे भाऊ. त्या सर्वांमध्ये तू मोठा आहेस, परंतु तू अंध असल्यामुळे पंडु हा गादीवर बसला. पंडु राजाने मात्र मोठे मोठे पराक्रम करून अनेक देश-विदेश जिंकले. सगळीकडे नाव कमावले व कीर्ती मिळविली. जसे तुमचे थोर पूर्वज कुरू, भरत, नहुष यांनी मोठे नाव कमावले तसेच पंडुने देखील कमावले. पंडुला वनात राहण्याची इच्छा झाल्यामुळे तो कुंती व माद्री या त्याच्या दोन बायकांना घेऊन हिमालयात आमच्या आश्रमाजवळ येऊन राहू लागला.
तेथे त्याला कुंतीपासून युधिष्ठिर, भीम व अर्जुन; व माद्रीपासून नकुल व सहदेव ही मुले झाली. त्यातील युधिष्ठिर हा बारा वर्षाचा असून अत्यंत शांत व विचारी आहे. दुसरा भीम हा अकरा वर्षाचा असून तो बलवान आहे. तसेच अर्जुन हा दहा वर्षाचा असून तो धनुर्विद्या, गायन आणि नृत्य जाणतो. आणि नकुल व सहदेव हे जुळे भाऊ असून ते नऊ वर्षाचे आहेत. ते दोघे तलवार अतिशय चांगल्या पध्दतीने चालवतात. त्या दोघांचे वैशिष्ट म्हणजे त्या दोघांना पशुवैद्यक आणि वनस्पतीचे विशेष असे ज्ञान आहे.
परंतु एक महिन्यापूर्वी पंडू राजा अचानक मृत्यू पावला. त्याबरोबर माद्री सती गेली. त्यामुळे आता कुंती व पाच पंडुपुत्रांना आम्ही तुमच्या स्वाधीन करत आहोत. तरी तुम्ही त्यांना नीट सांभाळा. आता आम्ही निघतो.”
एवढे सांगून ते सर्वजण तेथून निघून गेले.
Read लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral
2. धृतराष्ट्राच्या पुत्रांची वागणूक
mahabharat full story in marathi: पंडुपुत्रांना हस्तिनापुरात सोडून ऋषिमुनी निघून गेले. पंडुपुत्रांना पाहून तेथील सर्व लोकांना खूप आनंद झाला, परंतु धृतराष्ट्राच्या पुत्रांना मात्र ते आलेले अजिबात आवडले नाही व खूप वाईट वाटले.
त्यांच्यामध्ये सर्वात मोठा पुत्र दुर्योधन हा होता. तो स्वतःला तेथील भावी राजा समजत असे. त्यामुळे त्याला नागरिकांनी पंडुपुत्रांचे स्वागत केलेले अजिबात आवडले नाही. लोकांनी ‘कौरवेश्वर युधिष्ठिराचा विजय असो’ हि घोषणा दिली. त्या घोषणेचा त्याला खूपच राग आला. तो खूपच चिडला आणि वडिलांकडे जाऊन त्यांना म्हणाला, “हया मुलांना तुम्ही घरात कशाला घेतले. त्या ऋषिमुनींना हे नसते उद्योग कोणी सांगितले होते. तुम्ही त्यांना आत्ता ताबोडतोब हाकलून द्या. कोण कुठले म्हणे ‘कौरवेश्वर’ तुम्ही त्यांचे जर कौतुक करणार असाल तर आम्हाला विहिरीत ढकला.”
धुतराष्ट्राला दुर्योधन बोलला ते ऐकून अतिशय वाईट वाटले. तो मुलाला म्हणाला, “तू असे बोलू नकोस. माझे तुझ्यावरील प्रेम हे कधीही कमी होणार नाही. मी तुझ्यासाठी सर्व काही करीन. पण असे काही बोलू नकोस आणि आजोबा भीष्माचार्यांना व काका विदुरांना तुझ्या मनातले हे विचार अजिबात कळू देऊ नकोस. सगळयाच मनातील गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. हे लक्षात ठेव.”
तेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला, “मी त्यांना कुरू वंशाच्या सिंहासनावर बसू देणार नाही. त्यावर त्यांचा काहीही अधिकार नाही. आणि मी त्यांना कौरव कुळातले देखील मानणार नाही.”
ते ऐकून धृतराष्ट्र त्याला म्हणाला, “तु म्हणतोस तसेच सगळे होईल. पण तू थोडा धीर धर. आपण त्यांना पांडव असे म्हणू. त्यांचे तेच नाव रूढ करू. आता तू माझ्यावर रागावू नकोस.”
हे सर्व झाल्यावर धृतराष्ट्राला फार वाईट वाटले व त्याने आपले पुत्र दुर्योधन, दुःशासन, यांना सहानुभूतीने आपल्या छातीशी धरले व नंतर ते त्यांच्या महालात निघून गेले.
Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi
3. युधिष्ठिराने जगाला दिलेला सत्याचा धडा
Mahabharat marathi story: भीष्माचार्यांच्या सर्व काही लक्षात आले, म्हणून त्यांनी पांडवांची शिक्षणासाठी वेगळी व्यवस्था केली. सर्व राजपुत्रांसाठी त्यांनी शिक्षक ठेवले.
त्यांना सर्वांना एकदा धर्माचार्यांनी पाठ दिला- “सत्यं वद, धर्मं चर, स्वध्यायान्मा प्रमद।" म्हणजेच खरे बोला, धर्माने वागा, अभ्यासात कमतरता करू नका.
सर्वांचा तो दिलेला पाठ तयार झाला. परंतु युधिष्ठिराला मात्र तो पाठ करण्यासाठी तीन दिवस लागले. म्हणून गुरूजींनी त्याला विचारले, “तुला एवढयाशा साध्या धडयाला तीन दिवस लागले?”
युधिष्ठिर त्यांना म्हणाला, “तो धडा फारच कठीण आहे. मी मनाशी ठरवले असताना देखील खोटे बोललोच. पण कालपासून मात्र मी एकदाही खोटे बोललो नाही, आणि म्हणूनच मी माझा पाठ झाला आहे, असे आज म्हणू शकतो.”
गुरूजी त्याला म्हणाले, “युधिष्ठिरा! शाब्बास, मी तुझ्यावर फार खुश झालो आहे. तू आज मला व जगाला धडा शिकविला आहेस. शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नाही, तर त्याप्रमाणे वागले पाहिजे.”
कौरव-पांडव एकदा खेळत असताना तेथे अचानक एक मोठा बैल आला. सगळेजण घाबरले व पळाले. भीमाने त्या बैलाला अडविले व खाली पाडले. ते पाहून सर्वांनी त्याचे कौतुक करण्यासाठी टाळया वाजविल्या. परंतु दुर्योधन दुशाःसनाला म्हणाला, “एका बैलाने बैलाला पाडले, त्यात काय मोठे नवल? या भीमाला नांगराला जुंपले पाहिजे.”
द्रोणाचार्य हे धनुर्विद्या शिकवित होते. ते अर्जुनावर अतिशय प्रसन्न होते. कारण अर्जुन कोणतेही काम करताना अगदी मन लावून करत असे.
द्रोणाचार्यांनी एकदा एका उंच झाडावर पेंढा भरलेला भास पक्षी टांगला. सर्व शिष्यांना एका ओळीत उभे करून त्यांना आज्ञा केली. “सिध्द!”
असे म्हटल्याबरोबर सर्वजण धनुष्यबाण सरसावून तयार झाले.
द्रोणाचार्य त्यांना म्हणाले, “तुम्हाला तो पक्षी दिसत आहे ना. त्याच्या डोळयात बाण मारायचा आहे.”
त्यांनी एकेकाला विचारले, “तुला काय दिसते?”
सगळयांनी त्यांना ढग, आकाश, पलीकडचे झाड, झाडाच्या फांद्या, रस्ता, रस्त्यावरची माणसे, दिसत आहे, अशी उत्तरे दिली.
तेव्हा गुरूजींनी त्यांना बाण मारायला सांगितला. त्यांचा सर्वांचा नेम चुकला.
नंतर गुरूजींनी अर्जुनाला विचारले, “तुला काय दिसते?”
अर्जुन त्यांना म्हणाला, “मला पक्ष्याचा डोळा व माझ्या बाणाचे टोक दिसते आहे, याव्यतीरिक्त काहीच दिसत नाही.”
गुरूजी म्हणाले, “मार बाण!”
अर्जुनाने बाण बरोबर त्या पक्ष्याच्या डोळयावर सोडला व त्याचा डोळा फोडला.
गुरूजी प्रसन्न होऊन त्याला म्हणाले, “शाब्बास, यालाच एकाग्रता असे म्हणतात. ज्याला ही एकाग्रता साधते, त्यालाच जीवनात यश मिळते. तू सर्वश्रेष्ठ असा धनुर्धर होशील, असा मी तुला आशीर्वाद देतो.”
ते ऐकल्यावर सूतपुत्र कर्ण म्हणाला, “अर्जुनाला गुरूजींनी कारण नसताना लाडावून ठेवले आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त कुशल धनुर्धर आहे.”
कर्णाचे ते बोलणे दुर्योधनाला फार आवडले.
त्यामुळे लवकरच दुर्योधन, दुःशासन व कर्ण यांच्यात खूप घट्ट मैत्री झाली.
Read तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi
4. दुर्योधनाचे कपटी कारस्थान
Mahabharat story in marathi read online: दुःशासन एक दिवस रागाने म्हणाला, “या पांडवांचे प्रस्थ फारच वाढत चालले आहे. यांचा नाश केला पाहिजे.”
तेव्हा दुर्योधन म्हणाला, “भीमाला सर्व प्रथम ठार केले पाहिजे. आम्ही कितीही जण त्याच्या अंगावर धावलो, तरी तो आम्हाला सर्वांना पुरून उरतो. जर आम्ही झाडावर चढलो तर तो झाडाच्या फांद्या गदागदा हलवितो व आम्हांला खाली पाडतो. कधी पाण्यात बुडवून घाबरवतो. जर भीमालाच आपण मारले तर त्याचे सगळे भाऊ दुःखाने मरतील, नाहीतर कमजोर तरी होतील.”
त्यांच्यात दुष्ट कारस्थान शिजले.
एकदा त्यांची सर्वांची नदीकाठी सहल गेली. तेथे गेल्यावर सर्वजण खूप खेळले, पाण्यात पोहले. सगळयांनी खूप दंगा मस्ती केली. मग सगळेजण जेवायला बसले. तेव्हा दुर्योधन व दुःशासन भीमाला आग्रह करून वाढू लागले.
सर्वांची जेवणे झाली. प्रत्येक जण जिथे जागा मिळेल, तेथे झोपला. भीम एका झाडाखाली गेला. त्याला अचानक गुंगी आली व तो बेशुध्द पडला. कारण त्याने खाल्लेल्या जेवणात दुर्योधनाने विष मिसळले होते.
दुर्योधनाने पाहिले की, सर्वच जण दूर आहेत व गाढ झोपले आहेत, म्हणून त्याने व दुःशासनाने लांबलांब वेलींनी भीमाचे हातपाय बांधले व त्याला नदीत फेकले. आणि ते म्हणाले, “अन्नातल्या विषा, भीमाला मार. नदी, तू याला बूडव. मगरींनो, याला खा.”
परंतु भीमाला विषाने मारले नाही, नदीने बुडवले नाही आणि मगरींनी खाल्ले नाही.
तेथून भीम नागलोकी पोहोचला. नागांनी त्याचे स्वागत केले. त्यांनी त्याला औषधे खाऊ घातली. अनेक पौष्टिक पदार्थ त्याला खाऊ घातले. आता भीमाच्या अंगात पूर्वीपेक्षा जास्त शक्ति आली. तो अधिकच तेजस्वी दिसू लागला.
भीमाला नागांनी हस्तिनापूरला आणून पोहोचविले.
त्याला बघून दुर्योधनाने कपाळाला हात लावला व तो दुःखाने म्हणाला, “भीम आला. कर्दनकाळ भीम आला!
Read Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत
5. पांडवांवरील संकट
Mahabharat katha marathi: एकदा धृतराष्ट्राने युधिष्ठिराला सांगितले की, “एकदा तुम्ही वारणावतला जा. तेथे खूप मोठी यात्रा भरते. तेथे गेल्यावर फार मोठे पुण्य मिळते.”
धुतराष्ट्राने खूप आग्रह केला म्हणून एक दिवस कुंती व पाच पांडव वारणावतला जायला निघाले. ते जायला निघाले तेव्हा विदुरकाकांनी युधिष्ठिराला त्यांच्या पुढे येणाऱ्या संकटाची कल्पना दिली व सांगितले, “तुम्ही सर्वजण सावध रहा, आणि रात्रंदिवस सावध रहा.”
पांडव सर्व वारणावतला पोहोचले. तेथे त्यांच्यासाठी नवीन रंगकाम केलेले अतिशय सुंदर असे घर होते. तेथील थाटमाठ देखील चांगला होता. त्यांची तेथे उतरण्याची व्यवस्था देखील अतिशय उत्तम केलेली होती.
तेथे एक व्यवस्थापक होता. त्याचे नांव पुरोचन असे होते. त्याने पांडवाचा खूपच बडेजाव ठेवला. त्यांची खाण्यापिण्याची त्याने अतिशय चांगली व्यवस्था केली होती. त्याला दुर्योधनाने मुद्दामच नेमले होते.
पांडव रहात असलेल्या घराच्या भिंती सन, सनकाडया, लाख कापूर व तेल इत्यादी पदार्थांपासून बनविलेल्या होत्या. त्या वस्तुंमुळे त्यांच्या घराला अतिशय धोका होता. ते घर मुद्दामच पटकन पेट घेईल असे बनविले होते. पांडवांना झोप लागल्यावर पुरोचनाचा ते घर पेटवण्याचा बेत होता. पण त्याला तशी संधी अजिबात मिळाली नाही. कारण पांडवांमधील सतत कोणीतरी जागा रहात असे. आणि तो पुरोचनावर पाळत ठेवी. युधिष्ठिराने देखील गुपचुप त्या घरातून बाहेर नेणारे एक गुप्त असे भुयार बनवून घेतले होते.
एका रात्री पांडवांनीच डाव आखला.
पुरोचन गाढ झोपला होता. कुंती व चार भाऊ हळूच भुयारात शिरले. भीमाने एका खोलीली आग लावली आणि तोही त्यांच्या पाठोपाठ आला.
पुरोचन गाढ झोपला होता. ते घर चारीही बाजूंनी पेटले होते. त्यात पुरोचन जळून मरण पावला. तेथे एक भिल्लीण तिच्या पाच तरूण मुलांसह पडवीत येऊन झोपली होती. त्यांचा देखील त्या आगीत जळून मृत्यू झाला.
लगेचच दुसऱ्या दिवशी बातमी पसरली की, “कुंती व पांडव आगीत जळून मेले.”
ती बातमी ऐकून सर्व लोकांना अत्यंत वाईट वाटले. त्यांनी फार शोक केला. ते बघून मुद्दाम दुर्योधन, कर्ण, शकुनीमामा, धृतराष्ट्र इत्यादींनी दुःख झाल्याचे नाटक केले.
यानंतर कुंती व तिचे पाच पुत्र भुयारातून बाहेर पडले. तेथे खूप घनदाट जंगल होते. त्यांच्या मार्गात अनेक झाडाच्या फांद्या येत होत्या. भीम पुढे येऊन त्या बाजूला करून मार्ग काढीत होता. पुढे वाघ-सिंह आले, त्यांना देखील त्याने एकाच दणक्यात ठार मारले. भीमाने हिडिंब नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले. जर कुंती, नकुल, सहदेव थकले तर तो त्यांना स्वतःच्या खांद्यावर घेत असे.
Read भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi
6. बकासुराचा मृत्यू
bakasur story in marathi: पांडव काही दिवसांनी एकचक्रा नावाच्या नगरीत पोहोचले. ते सर्वजण तेथे त्यांचे नाव व गाव बदलून ब्राम्हण-वेषाने फिरू लागले.
एके दिवशी ते एका ब्राम्हणाच्या घरी आले. तेथे त्यांचे तीन दिवस चांगले गेले. पण चौथ्या दिवशी त्यांना अचानक कोणाची तरी रडारड ऐकू आली. तेव्हा कुंती काय झाले हे बघण्यासाठी घरमालकांकडे गेली. घरमालकिणीने तिला सर्व हकिगत सांगितली. गावाच्या बाहेर एक बकासुर नावाचा राक्षस रहात होता. तो रोज गावात येऊन प्रत्येकाला मारझोड करून काही माणसांना ठार मारायचा. त्यांच्याकडील सर्व अन्न घेऊन जायचा. म्हणून एक दिवस गावातल्या सगळया लोकांनी ठरविले की, त्या राक्षसाला रोज गाडाभर अन्न, दोन बैल व एक माणूस एवढे द्यायचे. म्हणजेच रोज एका घरातून माणूस जायचे असे ठरले. ती मालकीणबाई कुंतीला म्हणाली, “आज आमच्या घराची पाळी आहे, मी आता काय करू.” असे म्हणत ती मालकीणबाई खूप जोरात रडू लागली.
कुंतीने तिची समजूत घातली. भीमाला तिने राक्षसाकडे पाठविले. भीम बकासुराच्या गुंफेसमोर जाऊन उभा राहिला. आणि त्याने त्याला, “ए बक्या, बाहेर ये,” असे मोठयाने हाक मारले. भीमाने बैल पळवून लावले. त्याच्यासाठी आणलेले अन्न तो स्वतःच खाऊ लागला.
बकासुर राक्षस रागाने भीमाच्या अंगावर तुटून पडला. त्या दोघांची खूप वेळ मारामारी चालली होती.
अखेरीस भीमाने बकासुराला ठार मारले. आणि तो नदीवर स्नान करून परत घरी आला. कुंतीने कौतुकाने त्याच्या पाठीवर हात फिरवला व आशीर्वाद दिला, “भीम, तुझ्या शक्तिचा उपयोग दृष्टांना मारण्यासाठी होवो.
Read Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये
7. पांडव व द्रौपदी विवाह
pandav draupati vivah: पांडव पांचाल देशाच्या छत्रवती नावाच्या राजधानीत आले. तेथे द्रुपद याज्ञसेनी नावाचा राजा होता. त्याने आपल्या मुलीच्या विवाहासाठी मत्स्यवेधाचा कठीण पण लावला होता. त्यासाठी अनेक देशाचे शेकडो राजे व राजकुमार तेथे मंडपात जमले होते.
मंडपातील कोणालाही मत्स्यवेध करता आला नाही. परंतु तो अर्जुनाने केला.
पांडव द्रौपदीला घेऊन निघाले. इतर देशाचे राजे त्यांना अडवू लागले. परंतु पांडवांनी त्यांना मारून पळवून लावले.
घरी गेल्यावर अर्जुन म्हणाला, “आई, भिक्षा आणली आहे.”
तेव्हा कुंती आतून म्हणाली, “पाच जण वाटून घ्या.”
द्रुपद राजा त्यांच्या मागोमाग आला. तेव्हा कुंतीने त्याला सांगितले, “द्रौपदी ही पाच भावांची बायको होईल.”
द्रुपदाल ते विचित्र वाटले.
तेव्हा तेथे धर्माचे महान ज्ञाते व्यासमहामुनी आले व त्यांनी द्रुपदाला समजावले.
अशा प्रकारे पाच भावांचा द्रौपदीशी थाटामाटाने विवाह झाला.
तेव्हा पांडव व श्रीकृष्ण यांची मैत्री झाली.
पांडव हस्तिनापुरात आले तेव्हा मोठे भांडण होणार असे वाटू लागले. परंतु भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर, गांधारी, व्यास इत्यादींनी मार्ग काढला.
पांडवांना खांडववन आणि त्यापलीकडील भाग देण्यात आला. तेथे त्यांनी हिस्त्र पशू मारले आणि मयासुराच्या मदतीने इंद्रप्रस्थ नावाचे एक उत्तम नगर वसवले.
तेथे शेती सुरू झाली, बाग-बगीचे तयार झाले, अनेक उद्योग वाढले, व्यापार चालू झाला, प्रजा सुखाने राहू लागली.
पांडवांनी श्रीकृष्णाचा विचार घेऊन राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले.
Read Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा
8. जरासंधाचा वध
पांडवांनी यज्ञ करण्याचे ठरविले तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, “आपला यज्ञ यशस्वी होण्यासाठी आधी आपल्याला दुष्ट जरासंधाचा वध करावा लागेल.”
त्यानंतर श्रीकृष्ण, भीम, व अर्जुन मगध देशात पोहोचले. गिरिव्रज येथे जरासंधाची राजधानी होती. तेथे जाऊन त्यांनी जरासंधाला मल्लयुध्दाचे आव्हान दिले.
भीम आणि जरासंध यांची कुस्ती झाली. ती जवळ जवळ सत्तावीस दिवस चालू होती. श्रीकृष्णाने शेवटी हातात काडी घेऊन भीमाला खूण केली, “त्याला उभा चीर आणि उलटीकडे फेक.”
त्याप्रमाणे भीमाने त्याला खाली पाडून त्याच्या एका पायावर पाय ठेवला व दुसरा पाय धरून वर उचलला आणि त्याच्या देहाचे दोन तुकडे करून उलटीकडे फेकले.
अशा रीतीने जरासंधाचा वध केला व त्यामुळे त्याने कैदेत टाकलेल्या एक हजार आठ राजांची सुटका झाली. सगळयांनी पांडवाचा जयजयकार केला.
राजसूय यज्ञ सुरू झाला. तेव्हा अग्रपूजा करायची असते, म्हणून पांडवांनी इतरांचा विचार घेऊन हा मान श्रीकृष्णाला द्यावा, असे ठरविले.
श्रीकृष्णाला मोठया आदराने व सन्मानाने चौरंगावर बसवण्यात आले.
ते पाहून चेदिदेशाचा राजा शिशुपाल हा खूप संतापला व श्रीकृष्णाला, ‘गवळयाचा पोर’, ‘खुनी’, ‘चोरटा’ वगैरे शिव्या देऊ लागला.
तो युधिष्ठिराला म्हणाला, “जगात किती वृध्द, ज्ञानी, तपस्वी आहेत त्या सगळयांना सोडून तू या नाटक्याला का निवडलेस? आता आम्ही हा यज्ञ होऊ देणार नाही.”
ते ऐकून श्रीकृष्णाने रौद्र रूप धारण केले व आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाला तेथल्या तेथे ठार केले.
नंतर काही गडबड झाली नाही. शांततेत यज्ञ पार पडला. राजांनी युधिष्ठिरासमोर मोठमोठे नजराणे ठेवले, हिऱ्या-माणकांच्या राशी ओतल्या.
युधिष्ठिराने देखील अनेक दाने दिली, लाखो लोकांना भोजन दिले. संगळयांचा सन्मान केला. सगळेजण पांडवांची स्तुती करू लागले. त्यामुळे पांडवांच ऐश्वर्य पाहून दुर्योधनाच्या मनात ईर्ष्या, व्देष, आणि मत्सर निर्माण झाले.
Read Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत
9. दुष्ट दुर्योधन
Mahabharat Stories in marathi: मयासुराने बांधलेली जी मयसभा होती, त्यात सर्व गोष्टी विचित्र अशा होत्या. सर्वजण मयसभा पाहू लागले. दर्योधनही तेथे गेला. तेथे त्याची फार फजिती झाली. त्याला जेथे पाणी आहे असे वाटले तेथे तो आपले कपडे खोचून चालू लागला, तर तेथे अजिबात पाणी नसून कोरडी जमीन होती. जेथे पाणी नाही असे त्याला वाटले तेथे गेल्यावर तो पाण्यात पडला. एका ठिकाणी त्याला वाटले की, येथे दरवाजा आहे, असे समजून तो चालू लागला, तर त्याचे डोके भिंतीवर आपटले.
दुर्योधनाची हि झालेली फजिती वर उभी असलेली द्रौपदी पहात होती. ते पाहून ती हसली व म्हणाली, “आंधळयाचे पोर आंधळेच असणार.”
तिचे ते शब्द दुर्योधनाच्या मनाला खूप लागले. तो खूप निराश झाला व आपल्या भावांना म्हणाला, “मला आता जगायची इच्छा उरली नाही. मला पांडवांचे वैभव पहावत नाही. आपण त्यांना हस्तिनापूरातून नेसत्या कपडयांनिशी हाकलले होते. तरी देखील त्यांनी एवढया कमी वेळात अपार संपत्ती व कीर्ती कशी मिळविली. मला हा पांडवांचा उत्कर्ष झालेला सहन होत नाही. मी आत्महत्या करणार.”
एवढे बोलून तो रानात निघून गेला व एका गुफेत गेला.
त्याचे भाऊ त्याच्या मागे जाऊन त्याची समजूत काढू लागले. ते म्हणाले, “आपण त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना ठार मारू.”
तेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला, “त्यांना मारणे शक्य नाही, हे अनेकदा सिध्द झाले आहे. कारण त्यांची सेना मोठी आहे व पृथ्वीवरचे सगळे राजे त्यांच्या बाजूचे आहेत.”
शकुनी दुर्योधनाला म्हणाला, “मी अशी युक्ती करेन की, येत्या वर्षभरात त्यांचे सगळे वैभव तुझ्या पायाशी लोळण घेईल.”
अशा प्रकारे सर्वांनी दुर्योधनाची समजूत घातली व त्याला परत हस्तिनापुरात आणले.
Read Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा
10. पांडवांचा पराभव
शकुनीने पांडवांचे सर्व वैभव घेऊन त्यांना परत नेस्त नाबूत करायचे असे ठरवून धृतराष्ट्राशी संगनमत केले.
लगेचच धृतराष्ट्राने युधिष्ठिराकडे निरोप पाठविला. ‘तुम्ही केलेला यज्ञ उत्तम रितीने पार पडल्याचे ऐकून फार आनंद झाला. तुम्ही सगळे आता खूप थकले असाल. काही दिवस आमच्याकडे या. गप्पागोष्टी करू. द्यूत खेळू. आणि मौजमजा करू.”
युधिष्ठिर सर्व गुणांनी खूप चांगला होता; परंतु द्यूत म्हटले, की त्याला एक प्रकारची भुरळ पडत असे.
पांडव हस्तिनापुरात आले व लगेचच द्यूत सुरू झाला. पांडवांतर्फे युधिष्ठिर व कौरवांतर्फे शकुनी खेळू लागले. तेथील थाट काही वेगळाच होता. जरी-मखमलीचा पट होता. सोन्या-चांदीच्या सोंगटया होत्या. हस्तिदंताचे फासे होते. कोणी असे म्हणतात की, त्यांवर लोखंडी खिळे होते आणि शकुनीच्या बोटांत लोहचुंबकाच्या अंगठया होत्या. आणि असेही म्हटले जाते की, ते फासे देखील जादूचे होते.
खेळायला सुरूवात झाल्यावर सुरवातीचे एक-दोन डाव युधिष्ठिर जिंकला. पण नंतर तो हरू लागला. त्याच्याकडचे सोने-नाणे, रत्ने, मोती, हत्ती, घोडे, एवढेच नाही तर त्याचे राज्य सगळे काही तो त्यात हरला.
नंतर त्याने आपले भाऊ पणाला लावले. स्ततःला पणाला लावले. युधिष्ठिर खेळत असताना त्याला जशी द्यूताची नशा चढली होती. त्यामुळे तो वेडाच झाला होता. त्याने शेवटी द्रौपदीला पणाला लावले.
ते बघून शकुनीने फासे टाकले व तो ओरडला, “ही जिंकली!”
ते पाहून दुःशासन आनंदाने नाचू लागला. तो म्हणाला, “आता पांडव आमचे दास आणि द्रौपदी आमची दासी!”
दुर्योधन आनंदाने ओरडला, “दुःशासना, अरे, नुसता नाचतोस काय? त्या दासीला येथे ताबोडतोब घेऊन ये.
Read Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi
11. द्रौपदी हरण
युधिष्ठिर द्यूत खेळताना सर्व काही हरला व त्यातच त्याने द्रौपदीलाही पणाला लावले व त्यातही तो हरला आणि म्हणून दुःशासनाने द्रौपदीची वेणी धरली व तिला ओढत सभेत घेऊन आला. ते बघून भीमाला खूप राग आला व तो ताडकन उठला व जोरात ओरडला, “हे दुष्ट दुःशासना, जो हात तू द्रौपदीला लावला आहेस, तो कुकर्मी हात मी उपटून टाकीन! तुझ्या रक्ताने माखलेल्या हाताने मी द्रौपदीची वेणी घालीन.”
भीमाची ही गर्जना ऐकून सर्व सभा हादरली.
दुर्योधनाने आपल्या मांडीवर थाप मारून म्हटले, “द्रौपदी, तू माझ्या मांडीवर बैस, माझी बायको हो.”
भीम परत चिडून म्हणाला, “दुर्योधना, मी माझ्या गदेने तुझ्या मांडीचे चूर्ण करीन!”
हे सर्व ऐकून द्रौपदी अतिशय व्याकूळ झाली व दुःखाने आक्रोश करत म्हणाली, “येथे सर्व जण जेष्ठ बसले आहेत.
त्यांना माझी ही केलेली विटंबना मान्य आहे का? आधी जे स्वतः जिंकले ते, त्या माझ्या पतिदेवांना मला पणाला लावण्याचा अधिकार होता का? स्त्री ही पणाला लावण्यासारखी जड वस्तू आहे का? माझे केस धरून मला येथे सर्वांच्या असे समोर आणणे, माझे नेसलेले वस्त्र ओढणे, मला दासी म्हणून संबोधणे, हयात सगळया कुलाचा अपमान नाही का? तुम्ही कानांत बोळे घालून बसू नका, डोळे मिटू नका. मला न्याय द्या. मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते की, मला न्याय द्या.”
द्रौपदीची ही केलेली केविलवाणी अवस्था पाहून गांधारी रडू लागली. भीमाची प्रतिज्ञा ऐकून धुतराष्ट्र घाबरला. तेव्हा विदुराने त्यांना समजावले. धुतराष्ट्राने पांडवांना त्यातून मुक्त केले आणि त्यांचे पूर्वीचे सर्व वैभव त्यांना परत केले. त्यानंतर ते सर्वजण रथात बसून इंद्रप्रस्थाला गेले.
हे सर्व घडल्यावर दुर्योधन, दुःशासन हयांनी धृतराष्ट्राला घेरले व तुम्ही आमच्या मिळवलेल्या विजयावर पाणी फिरवले, म्हणून ते धुतराष्ट्राला दोष देऊ लागले. दुर्योधनाने तर मोठे आकांडतांडवच केले.
शेवटी धृतराष्ट्र त्यांच्यापुढे नमला.
धुतराष्ट्राने “पुन्हा द्यूत खेळण्यासाठी या,” असा परत निरोप पांडवांना पाठविला.
पांडव परत आले. आणि द्यूत परत सुरू झाला. पण यावेळी पण एकच ठरला होता की, ‘यात जो पक्ष हरेल, त्याने बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगायचा. आणि अज्ञातवासात ओळखले गेल्यास पुन्हा बारा वर्षे वनवासात व एक वर्ष अज्ञातवासात जायचे.’
आणि शेवटी पांडव हरले व सगळे काही सोडून ते द्रौपदीसह वनात गेले.
मग कौरवांनी अगदी आनंदाने दिवाळी साजरी केली.
कुंती तिच्या लहान दिराकडे विदुराघरी रहायला गेली.
तर ह्या होत्या काही महाभारतातील कथा (Mahabharat Stories in Marathi) तुम्हाला या गोष्टी कसे वाटले आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि आपल्या मित्रां सोबत या गोष्टी share करा.
khupach chhan
ReplyDeletePost a Comment