Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा | Marathi Isapniti Stories
जर तुम्हाला इसापनीती च्या गोष्ट्या (Isapniti Stories in Marathi) वाचायच्या असेल तर तुम्ही एक्दम सही ठिकाणी आले आहेत. आमी तुमच्या सगड्यांचा साठी २० मराठी इसापनीतच्या कथा आणल्या आहे.
अशा करतो तुम्हाला या इसापनीतीच्या गोष्टी (Isapniti Stories in Marathi With Moral) नक्की आवडेल.
-
20 Isapniti Stories in Marathi
- मूर्ख डोमकावळा
- सिंह आणि गाढव
- कावळा आणि कालव
- उंदीर आणी चिचुंद्री
- झाड आणी कुर्हाडीचा दांडा
- पशु, पक्षी आणि शहामृग
- गरुड व घुबड
- गाढव आणी निर्दय मालक
- गाढव, माकड आणि चिचुंद्री
- डुक्कर आणि लांडगा
- पाणी गढूळ करणारा कोळी
- पाणबुडा पक्षी
- पाकोळी आणि कावळा
- मूर्ख गवई
- मुंगीची उत्पत्ती
- मुलगा आणि चणे
- माकड आणि मासा
- लांडगा आणि कोकरू
- कोल्हा आणि खेकडा
- कावळा आणि कुत्रा
1. मूर्ख डोमकावळा
Murkh domkavla Isapniti katha: एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.
त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले.
मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''
तात्पर्य :- काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.
2. सिंह आणि गाढव
sinh ani gadhav isapniti story: एकदा एका गाढवाने एका सिंहाला उगाचच शिव्या दिल्या.
त्या ऐकून सिंहाला खूप राग आला.
परंतु शिव्या देणारा गाढव आहे हे पाहाताच त्याने आपला राग आवरला आणि त्या गाढवाकडे किंचितही लक्ष न देता तो सिंह निघून गेला.
तात्पर्य - जे थोर असतात ते कधीही क्षूद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.
Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi
3. कावळा आणि कालव
kavla ani kalav isapniti goshta: एक कावळा समुद्राकाठी फिरत असताना त्याला एक कालव सापडले. त्यातील मांस काढून खावे म्हणून तो ते दगडावर आपटू लागला. जवळच एक लबाड डोमकावळा बसला होता.
तो त्याला म्हणाला, 'मित्रा, दगडावर आपटून हे कालव काही फुटणार नाही, तेव्हा तू हे तोंडात धरून उंच उंच जा आणि तिथून ते खाली टाकून दे. म्हणजे ते फुटेल.'
कावळा बिचारा भोळा होता. त्याने कालव तोंडात धरून एक उंच भरारी मारली आणि तिथून ते खाली टाकून दिले. जमिनीवर पडताच लबाड डोमकावळ्याने ते पळवले आणि तो उडून गेला.
तात्पर्य - लबाड मनुष्याच्या सांगण्यावर कधीही विश्वास ठेवू नये.
4. उंदीर आणी चिचुंद्री
undir aani chichundri isapniti story: एक खूप अशक्त उंदीर होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या कणगीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून त्याने मनसोक्त खाऊन घेतले.
खाऊन खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्याला त्या भोकातून बाहेर येता येईना. तो तेथेच धडपडत होता.
ते पाहून एक चिचुंद्री त्याला म्हणाली, "मित्रा, ह्या भोकातून बाहेर पडायचं असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे.
तात्पर्य - अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो.
Read लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी
5. झाड आणी कुर्हाडीचा दांडा
jhad ani kurhadicha danda: एक लाकूडतोड्या रानातले एक मोठे झाड कुर्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या.
तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, 'काय ही माझी स्थिती! हा माणूस किंवा ही कुर्हाड करते आहे ते काही चूक नाही.
पण माझ्याच शरीरापासून बनवलेला हा कुर्हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला मदत करतो आहे, याचं फार वाईट वाटतं.'
तात्पर्य - आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.
6. पशु, पक्षी आणि शहामृग
एकदा पशु आणि पक्षी यांच्यात मोठी लढाई चालली होती. तेव्हा पक्ष्यांनी शहामृगाला पकडून नेले व त्याला शिक्षा करू लागले.
तेव्हा शहामृग म्हणाले, 'मित्रांनो, मी पशु नाही. मी पक्षीच आहे. हे पहा माझे पंख आणि ही पहा चोच.' पक्ष्यांना वाटले, खरेच हा तर पक्षी आहे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिले.
यानंतर पशूंनी त्याला पकडून नेले आणि त्याला काय शिक्षा करावी त्याचा विचार करू लागले. तेव्हा शहामृग म्हणाला, 'मित्रांनो, मी पक्षी नाही, पशूच आहे.
हे पहा, माझे पाय तुमच्याच पायांसारखे आहेत!'
पशूंना ते खरे वाटले आणि त्यांनीही त्याला सोडून दिले.
तात्पर्य - आपण दोन्ही बाजूंचे आहोत असे भासविणे कधी कधी फायदेशीर ठरते.
Read तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi
7. गरुड व घुबड
एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले.
तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, 'मित्रा ! परंतु, माझी पिल्लं कशी आहेत ते तुला माहित आहे का ? नाहीतर दुसर्याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.'
गरुड म्हणाला, 'माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसं, आवाज सगळंच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता ?'
पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, 'किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही.
घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्लं नसणार. यांना मारून टाकावं.
असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला.
नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, 'मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस.'
गरुड म्हणाला, ' हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून ?
तू तर म्हणालास की, माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. मला वाटलं ती दुसर्याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक ?
तात्पर्य - स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो.
8. गाढव आणी निर्दय मालक
एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे.
असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता.
त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला.
तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, 'अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं.
तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.'
तात्पर्य - काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत.
Read Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत
9. गाढव, माकड आणि चिचुंद्री
एके दिवशी एक गाढव आणि एक माकड बोलत बसले होते.
गाढव म्हणाले, 'माझे कान इतके लांब आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत.
माकड म्हणाले, 'माझ्या या लांबच लांब शेपटाची तर मला फारच लाज वाटते.
त्याऐवजी मला कोल्ह्यासारखी गोंडेदार शेपूट असतं तर किती मजा आली असती.
'हे सर्व ऐकून एक चिचुंद्री हळूच पुढे आली आणि म्हणाली, 'तुम्ही उगाच का रडत बसता?
मला तर शिंग नाहीतच, शेपूटही इतकं आखूड आणि डोळ्यांनी सुद्धा नीट दिसत नाही.
मग माझ्यापेक्षा तुमची स्थिती जास्त चांगली नाही कां ?'
तात्पर्य - देवाने आपणास काय दिले आहे, त्यात समाधानी रहावे.
10. डुक्कर आणि लांडगा
एकदा एक डुकरी आपल्या पिलांना जवळ घेऊन गवतात बसली होती. त्यांपैकी एखादे पिलू पळवावे, असा विचार करून एक लांडगा तेथे आला आणि म्हणाला,
'ताई, तुला बरं वाटत नाही असं दिसतं. तेव्हा तू थोडी मोकळ्या हवेत फिरून ये. तोपर्यंत मी तुझ्या पिलांना सांभाळायला तयार आहे.'
डुकरी म्हणाली, 'काही नको. मी गेल्यावर तू माझ्या पिलांना सांभाळण्याऐवजी खाऊन टाकशील हे मला माहीत आहे ! '
तेव्हा लांडगा मान खाली घालून निघून गेला.
तात्पर्य - काही माणसे दयाळूपणा दाखवून दुसर्याचा नाश करतात. त्यांच्यापासून सावध रहावे.
Read भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi
11. पाणी गढूळ करणारा कोळी
एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला.
शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?'
तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'
तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.
12. पाणबुडा पक्षी
panbuda pakshi isapniti story: पाणबुडा नावाचा पक्षी पाण्यात उड्या मारून मासे पकडून खातो. एका पाणबुड्याने आपण पारध्याच्या हाती सापडू नये म्हणून आपले घरटे नदीकाठच्या झाडावर बांधले होते.
एके दिवशी तो पक्षी बाहेर गेला असता नदीला पूर आला आणि पाणि चढून घरटे पिलांसकट वाहून गेले.
परत आल्यावर पक्षी पाहातो तर घरटे व पिले दोन्ही नाहीशी झालेली.
ते पाहून तो म्हणाला, "एका शत्रूला वाचविण्यासाठी मी येथे येऊन राहिलो, तोच दुसर्या शत्रूच्या तडाख्यात सापडलो.
तात्पर्य - एका संकटातून सुटण्याच्या प्रयत्नात कधी दुसरेच संकट उभे राहाते.
Read Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये
13. पाकोळी आणि कावळा
Pakodi ani kavda: एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून भांडत होते.
बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,'
तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे.
14. मूर्ख गवई
एका मनुष्याचा आवाज अगदी खराब होता. परंतु त्याची गाणे शिकण्याची जागा चांगली सजवलेली होती.
तेथे बसून तो आपला गाण्याचा अभ्यास करीत असे. एकदा त्याला वाटले की आपण आता छान गातो तेव्हा आपल्या गाण्याचा जाहीर कार्यक्रम करावा.
त्याने जाहिरात देऊन आपले गाणे नाटकगृहात ठरविले. जाहिरात वाचून पुष्कळ लोक नाटकगृहात आले.
परंतु, गाणे इतके भिकार झाले की लोकांनी टाळ्या पिटून आणि काठ्या बडवून त्याची हुर्यो केली व त्यास हाकलून लावले.
तात्पर्य - आपल्या गुणांची किंमत आपणच ठरविणे हा मूर्खपणा होय. लोक जेव्हा त्या गुणांची तारीफ करतील तेव्हाच तो गुण खरा आहे असे समजावे.
Read Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा
15. मुंगीची उत्पत्ती
एक शेतकरी नेहमी शेजार्याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे.
त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे स्वरूप दिले.
त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसर्याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची त्याची सवय मात्र बदलली नाही.
तात्पर्य - कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही.
16. मुलगा आणि चणे
एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले.
ते पाहून तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, 'काय मूर्ख आहेत ते चणे.
यांचं अंग भाजतं आहे आणि त्यांना गाणं सुचतं आहे.'
तात्पर्य - अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.
Read Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत
17. माकड आणि मासा
एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले. तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे. म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले, 'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?'
माकडाने सांगितले, 'मी मुंबईचा?'
माशाने पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे' आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले, 'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'
या मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले. त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.
तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.
18. लांडगा आणि कोकरू
landga ani kokru isapniti story: एकदा एका मेंढ्यांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते. ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमागे लागला. याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच कोकरू लांडग्याला हसत म्हणाले, 'अरे, तू मला ठार मारणार हे मला माहितच आहे पण निदान आनंदानं तरी मरावं असं मला वाटतं. तेव्हा तू जर मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.' ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला. त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला.
मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकताच जवळच असलेले कुत्रे धावत आले. त्याला पाहताच लांडगा घाबरून पळू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला, 'आपला धंदा सोडून भलत्याच धंद्यात पडल्याने असं झालं.' 'माझा खाटकाचा धंदा सोडून मी वाजंत्र्याचं काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !'
तात्पर्य - नादी मनुष्याला, चतुर लोक सहज फसवू शकतात.
Read Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत
19. कोल्हा आणि खेकडा
समुद्रातील एक खेकडा एकदा सहज समुद्रकिनार्यावर आला. तेवढ्यात एका कोल्हाने त्याला पकडले आणि तो खेकड्याला मारून खाऊ लागला. तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला, 'मीच मूर्ख ! आरामात समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर यायची उठाउठेव कोणी सांगितली होती ? नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे !'
तात्पर्य - ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो.
20. कावळा आणि कुत्रा
एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. कुत्रा म्हणाला, 'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.'
यावर कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे. तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.'
तात्पर्य - देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच.
Read Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi
तर या होत्या काही इसापनीतीच्या गोष्टी (Isapniti Stories in Marathi With Moral) तुम्हाला या इसापनीती च्या मराठी कथा कसे वाटले आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या कथा आपल्या मित्रां बरोबर share करा.
Post a Comment