माझी शाळा मराठी भाषण - My School Speech in Marathi
आज मी तुमच्या करीता सम्पुर्ण माझी शाळा मराठी भाषेत (My School Speech in Marathi) तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.
माझी शाळा मराठी भाषण
उपस्थित गुरुजन वर्गाला माझा सविनय नमस्कार !
माझ्या सगड्यांनो...
' मज आवडते ही मनापासूनी शाळा
लाविते लळा ही जसा'माऊली बाळा '
होय ना ! एक ही दिवस चुकवाबी बाटत नाही. अशी माझी शाळा! स्वच्छ आणि सुंदर शाळा. “ ज्ञानकला मंदिर ' ! ज्ञानाचं आणि कलेचं खरंखुरं मंदिर. नावाला साजेशी अशी माझी शाळा,
फाटकातून आता प्रवेश करताच आजुबाजूची अशोकाची झाडं वाकून आपलं स्वागत करतात... सोबतच मंद-गार वाऱ्याची झुळूक आपल्या अंगावर शिंपडतात... त्यांच्या आधारानं लावलेल्या मोगरा, जाई, जुई, शेवंती, गुलाब इत्यादि फुलांच्या सुगंधी अत्तराचा गंध ही त्यात असतो... मन कसं प्रसन्न होतं... पायऱ्या चढून जाताना; पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी शालादेवतेला वाकून नमस्कार करण्याची प्रथा आहे. कारण शाळा हे एक मंदिर आहे आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायरीजबवळ नतमस्तक होणं ही आपली संस्कृती ! माझी शाळा आम्हाला आपली 'संस्कृती' टिकवायला शिकवते. नंतर चौकातील सरस्वतीमातेच्या भव्य पुतळ्याला नमस्कार करुन; ध्वजस्तंभाला वंदन करुनच वर्गात प्रवेश होतो.
मराठी माध्यमाची आमची शाळा. मुलींनी कपाळाला कुकू लावलं पाहिजे. हातात बांगडी घातली पाहिजे असे मराठी संस्कार जपणारी ! तरीही आधुनिक चांगले विचारही स्वीकारणारी आहे. ज्यातून मुलांची प्रगती होईल असा नवा विचार आमची शाळा लगेच राबवते. उदाहरणार्थ पहा हं. साधारणत: दहा -बारा वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच कॅम्प्युटरचे ज्ञान असावं हा एक नवा विचारप्रवाह आला; नि तात्काळ आमच्या शाळेत“संगणक" विषय रुज् झाला. सुसज असं ग्रंथालय तर आमच्या शाळेत पूर्वीपासूनच आहे.
सर्व प्रकारचं साहित्य जे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गरजेचं आहे. ते सर्व ड्थे आहे. मुख्य गोष्ट ही; की ते सहजपणे आम्हा मुलांनाही उपलब्ध होतं ! पण एक नवा प्रवाह; मुख्यत्वेकरुन ज्यावेळी आमची इंग्रजीची नबी पुस्तके आली. इंग्रजी ' स्पीकींग कोर्स ' आला. त्यावेळी आमच्या ग्रंथालयात मुलांच्या मराठी मासिकांबरोबरच इंग्रजी मासिकांची, छोट्या छोट्या गोष्टींच्या पुस्तकांची लगेचच भर पडली.
मोठा चित्रकलेचा हॉल त्या शेजारी ' चित्रकला ! हा विषय शिकणाऱ्यांसाठी खास वर्ग. त्यांची खास टेबलं ! मोठ्ठा संगीताचा हॉल. सर्व संगीताच्या साधनांनी -वाद्यांनी-सुसज्जञ !... भिंतीवर टांगलेले संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे फोटो... प्रेरणा देणारे... असा ! शिवाय एक मोठ्ठा हॉल. जिथं छोटी छोटी मुलांची नाटकं चालायची. आज नावारुपाला आलेले कित्येक कलाकार आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या कल्पनेनं, त्यांच्याच पूर्वीच्या सहकाऱ्यांकडून जे आज प्रथितयश इंजिनियर्स, डॉक्टर्स, बिल्डर्स वा तत्सम उच्च पदस्थ आहेत. त्यांच्या सहकार्याने एक मोठं व्यावसायिक नाट्यगृह शाळेला बांधून मिळालयं. तेही शाळेच्या आवारात!
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहून सुंदर
हे..
असंच काहीसं म्हणावं वाटत मला माझ्या शाळेबद्दल. आम्हा मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, प्रत्येक विद्यार्थ्यांला अभ्यासातील विषय नीट समजावे; त्यांचे सामान्यज्ञानही बाढावं; यासाठी धडपडणारे; मनापासून काम करणारे शिक्षक माझ्या शाळेला लाभतातही तर शाळेची परंपराच आहे.
शाळेत चालणाऱ्या विविध विषयांवरील वक्तृत्व, निबंधस्पर्धा, चित्रकला, संगीत, नाटय स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, क्रीडास्पर्धा, म्हणजे तर आमचे आवडीचे विषय ! आम्ही हिरीरीने उतरतो प्रत्येक स्पर्धेत. अर्थात प्रत्येक स्पर्धेत निपुण असणारी मुलं-मुली वेगवेगळी बरं का ! ( पण आम्ही उत्साही मंडळी सर्कशीतल्या विदुषकासारखी ! ) एक मात्र खरं हं ! स्पर्धा मग ती कलाक्षेत्रातील , क्रीडाक्षेत्रातील असो वा अभ्यासातील असो, स्पर्धा आमच्यासाठी स्पर्धाच असते. अगदी निकोप. त्यात मा द्वेष ना ईर्षा.
आम्हा मुलांची फक्त एकच खंत आहे. एवढ्या नावाजलेल्या आपच्या शाळेत; जिथे फार पूर्वीपासून एक सुसज्ज अशी प्रयोगशाळा देखील आहे... त्या आमच्या शाळेच्या सुंदर नियोजनाबद्दल इमारतीला पुरेसे मैदान मात्र नाही. मधल्या चौकात पी.टी. च्या तासाला खेळताना खूपदा माझ्या मनातं येतं.
' अंगण हरवबलयं आमच अंगण हरवलयं. '
असो. पण याच शाळेनं मला दिलेत अनेक मित्र -मैत्रिणी. जिवाला जीव देणारे !... अनेक आदर्श विचार... आदर्श गुरु... मायेच्या ममतेने शिकविणारे शिक्षक... शाळेचा शिपाई सुद्धा बाहेर समाजात वावरताना अभिमानानं “ मी ज्ञानकलामंदिराचा शिपाई आहे ' म्हणून सांगतो. आमच्या शाळेच्या सहली असोत, स्नेहसंमेलन असो , क्रीडास्पर्धा असोत, वा राष्ट्रीय सण असोत; मुख्याध्यापकांपासून थेट शिपायापर्यंत... आमच्यासह एक आगळाच उत्साह असतो. प्रत्येक घटना घरच्या सणासारखी आम्ही एकत्रित साजरी करतो. अगदी सजावट करुन , रांगोळ्या घालून, मंगलवाद्ये... गाणी गाऊन !
मघाशी सांगताना मी म्हणालो नाही का ? आमच्या सर्वांगिण वैचारिक विकासाबद्दल !... तर मंडळी समाजात अशी कितीतरी ज्ञानी, आपापल्या क्षेत्रात कर्तबगार, नामवंत मंडळी आहेत. आमची शाळा त्यांना आमंत्रित करते. दर महिन्याला कुणाचे ना कुणाचे अनुभव त्याचमुळे तर आम्हाला ऐकायला मिळतात. यातूनच तर आमच्या जडण-घडणीचा पाया तयार झालायं !
गणवेषात वावरणारे आम्ही या छताखाली एकत्र असतो. म्हणतात ना ' शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे ' खरयं ! समाजाची आम्ही भावी पिढी ! या देशाचे नागरिक; आम्हाला खऱ्या अर्थानं सुजाण. सुशिक्षित ( साक्षर नव्हे ! ) सुविचारी, सदाचारी बनवण्याचं मोठ काम मझी शाळा- माझ्या शाळेतील शिक्षक करत आहेत...
सोबतच करत आहेत आपल्या संस्कृतीचं जतनसुद्धा ! आपले सगळे भारतीय सण आम्ही इथे साजरे करतो... हा वसा पुढे. चालविण्याकरीता... त्यावेळेस आमचे कित्येक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सुद्धा हजर असतात... अगदी आपल्या मुलाबाळांसह ! ' आम्ही चालवू हो पुढे वारसा ' ही साक्ष देत!
धन्यवाद !
तुम्हाला सावित्रीबाई फुले मराठी भाषण (speech on my school in marathi) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
Nice speech........
ReplyDeletePost a Comment