लोकमान्य टिळक मराठी भाषण- Lokmanya Tilak Speech in Marathi
तुम्हाला हे लोकमान्य टिळक मराठी भाषण (Lokmanya Tilak Speech in Marathi ) नक्की आवडेल.
लोकमान्य टिळक मराठी भाषण
सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय गुरुजनांना माझे वंदन. माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. हेच निमित्त साधून आपल्या गुरुजनांनी आपल्यासाठी हे व्यासपीठ खुलं केलयं... आणि लोकमान्यांच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांचे कार्य या विषयी आपल्याला बोलायला सांगितलंय. आपण लोकमान्य टिळकांविषयी बोलणं म्हणजे, ज्योतिने तेजाची आरती !
...पण तसं असलं तरी टिळकांचा (speech on lokmanya tilak in marathi) आदर्शवाद, सडेतोडपणा, हजरजबाबी वृत्ती, नीटनीटकेपणा, स्वयंशिस्त, संधटनकोशल्य एक ना अनेक सद्गुणांवर आज पुन्हा एकदा प्रकाश पडणार... आपल्या अंगी या निमित्ताने यातील एकतरी सद्गुण जोपासला जावा, अशी प्रार्थना करुन, मी आपणासमोर लोकमान्य टिळकांविषयी काही सांगू इच्छितो.
परतंत्र आणि परावलंबी भारतात रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुले १८५६ रोजी बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला. बळवंत हे त्यांचे पाळण्यातील नाव... पण ' बाळ ' नावानेच लोक त्यांना हाक मारीत. पुढे हेच नाव रुढ झाले.
बाळ हळूहळू मोठा होत होता: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते काही खोटे नाही.बाळचा स्वाभिमान लहानपणापासूनच जागृत होता. वृत्ती निर्भय होतीबोलण ठाम आणि हजरजबाबी होतं. याचचं उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या शिक्षकांना दिलेले उत्तर “ मी शेंगा खाल्या नाहीत, टरफले टाकली नाहीत म्हणूनच मी शिक्षाही घेणार नाही... आपणास ज्ञातच आहे.
य़ाच गुणांच्या आणि बुद्धिमत्तेच्या जीरावर टिळकांनी पुढे सिंहगर्जना केली. “ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! '... वास्तविक लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या इंग्रज सत्ताधीशांना लोकमान्यांनी त्यांच्याच भाषेत दिलेले हे उत्तर होय. .
टिळक प्रचंड बुद्धिमान होते. गणिते तर चुटकीसरशी अचूक सोडवीत. त्यामुळेच त्यांची समाजातील-व्यवहारातील गणिते कधीच चुकली नाहीत. वासुदेव बळवंत फडके हे त्यांचे आदर्श होते. पण हा झुंजार सेनानी हरला; तो केवळ त्याच्या पाठीशी लोकांचे बळ नव्हते, लोकशक्ती नव्हती म्हणूनच ! हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच जर इंग्रजांशी सामना करायचा तर तो केवळ बळाच्या नव्हे तर बुद्धिच्या जोरावर हे धोरण निश्चित करुन त्यांनी प्रथम सामान्य जनता संघटित करायला सुरुवात केली. त्यासाठी सार्वजनिक ' शिवजयंती उत्सव ' व सार्वजनिक ' गणेशोत्सव असे दोन उत्सव साजरे करायला त्यांनी सुरुवात केली. या उत्सवांमधून लोकमनात देशनिष्ठा, देशप्रेम, इंग्रजांविरुद्ध चीड, स्वदेशीचे प्रेम जागृत करण्यासाठी भाषणे-सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करुन या संघटित समाजाला ते विधायक वळण देऊ लागले.
हेचकार्यत्यांनी मराठा ' व ' केसरी ' या दोन वृतपत्रांच्या माध्यमा तूनही चालविले होते. ' केसरी ' चे संपादक म्हणून कार्यरत असताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काव ? या अग्रलेखासाठी... इंग्रज सरकार विरुद्ध लिहिलेल्या अग्रलेखासाठी टिळकांना शिक्षाही सोसावी लागली. असे म्हणतात की हा अग्रलेख मुळात टिळकांनी लिहिलाच नव्हता. पण संपादक या नात्याने संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अगदी शिक्षेपर्यंत!
पण असे हे टिळक कॉलेजमध्ये शिकत असताना फारच हडकुळे होते. देशप्रेम आणि स्वातंत्र्याचं वारं त्यावेळी डोक्यात शिरलेलं होतंच. त्यात प्रकृतीवरुन इतर मुले कुचेष्टा करायची. मुळातच जिही... ठरवले... तब्येत कमवायची ! मग काय जोर-बैठका, मलुखांब, पोहणे, धावणे इ. . व्यायामाचे प्रकार नित्य करुन वर्षभरात शरीर कमावले... पण त्यावेळी अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष देखील त्यांनी नंतर भरुन काढले. बी.ए, एल. एल. बी. झाले. पण या वकिलीच्या पदवीचा उपयोग स्वत: साठी न करता त्यांनी देशाची वकिली केली.
देशासाठी... स्वातंत्र्यप्राप्रीसाठी लढत असता त्यांना अनेकदा कारावास सोसावा लागला. परंतु आपल्या कारावासातील कालावधी देखील त्यांनी सत्कारणी लावला . मंडाले ' येथील कारावासाचे दरम्यान त्यांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. पुढे सात भाषांत त्याचे अनुवाद झाले. या शिवाय या गाढ्या संस्कृतच्या पंडिताने “ओरायन ' आर्टिक होम इन दी वेदाज ' हे ग्रंथ देखील लिहिले. ते पाहून सुविख्यात जर्मन पंडित जो आदर्शवादी तत्वज्ञ म्हणून देखील ओळखला जाई तो ही या संशोधनात्मक लेखनाने भारावून गेला.
असे हे टिळक मनाने अतिशय स्वच्छ व निष्कलंक होते. व्यसन फक्त सुपारीच्या खांडाचे. परंतु ताईमहाराजांच्या मालमत्तेचे विश्वस्त म्हणून काम करता असता तेथील एका सुपारीच्या खांडाला देखील त्यांनी स्पर्श केला नाही. स्वातंत्र्यासाठी तन-मन-धन वेचताना त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जोपासली. पुण्यात प्लेगच्या साथीत लोकांना वाचविण्यासाठी त्यांनी आपल्या जिवाचे रान केले. चांगल्या कार्याला कायम साथ दिली. त्याचेच उदाहरण म्हणून अनी बेझंट होमरुल चळवळीचे नेतृत्व करत असताना टिळकांनी त्यांना केलेल्या सहकार्याचा दाखला देता येईल. याशिवाय इतर अनेक क्रांतिकारकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. आणि म्हणूनच ते असंतोषाचे जनक ठरले ! परंतु सर्वांचाच त्यांच्यावर असलेला विश्वास ब लोकांचे प्रेम यांनी त्यांना लोकमान्य ' ही सर्वोच्च पदवी प्राप्त करुन दिली.
असा हा लोकमान्य नेता ' बाळ गंगाधर टिळक ' ३१ जुलै १९२० च्या रात्री आपला या जगाचा प्रवास संपवून निघून गेला. आमच्या समोर अनेक आदर्श ठेऊन !
झाले बहु... होतील बहु... परंतु या सम हाच !
प्रणाम... प्रणाम... शतश:
प्रणाम
तुम्हाला लोकमान्य टिळक मराठी भाषण (Lokmanya Tilak Speech in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.
Read
Post a Comment