गणपती मराठी भाषण - Ganpati Speech in Marathi 

आज मी तुमच्या करीता सम्पुर्ण गणपती भाषण मराठी भाषेत (Ganpati Speech in Marathi)  तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.

Ganpati Speech in Marathi

गणपती वर मराठी भाषण 

अध्यक्ष महोदय व उपस्थित गुरुजनांना माझा सविनय नमस्कार !
मित्रांनो...

' आरंभी विनती करु गणपती-विद्या दया सागरा ।
अज्ञानत्व हरोनि बुद्धि मति दे आराध्य मोरेश्वरा ।।
चिता क्लेष दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवी ॥

आईनं बालपणी शिकवलेला पहिला श्लोक '... लिहायला शिकवलेलं पहिलं अक्षर... ' श्री. ' पुढे मोठा झालो... कोणत्याही कामाची शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशापासूनच... ' म्हणजेच प्रत्येक चांगल्या कार्याचा आरंभ श्रीगणेशाय नम: । ' नेच !

ॐ गणांनां त्वां गणपति... ' या क्रचेतून वेदकाळातही कोणत्याही शुभकार्याची सुरुवात विघ्नहर्त्या गणपतीच्या पूजेनेच केली जायची याचा दाखला मिळतो.

आणि म्हणूनच कोणत्याही कार्याची सुरुवात झाली... ' त्याचा श्रीगणेशा केला ' असं म्हणण्याची पद्धत निर्माण झाली असावी.

असो !... मंडळी ' गणपती ' हे आपलं सर्वांचं आवडत आराध्य दैवत !... आपली संस्कृती प्रतिकांची पूजा करणारी आहे... आणि श्रीगणेश' हे तिचं मंगलमय प्रतीक !

या श्रीगणेशाचं रुप ही वेगळंच...
लंबोदर, पितांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना 

डोकं हत्तीचं... धड मानवाचं... भलंमोठं पोट सावरीत ही गजाननाची स्वारी हातात मोदक घेऊन दुसऱ्या हातानं आशीर्वाद देतं बसलेली असते... वाहन असतं ' उंदीर मामा ! '

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीबाप्पा घरोघरी मुक्कामाला येतात. उकत्याच परीक्षा संपलेल्या असतात.शाळेलाही स॒ट्या लागलेल्या असतात. पावसाळा असल्याने उत्साह भरलेला असतो... नि सलि हिरवळ दाटलेली असते. वातावरणात स्वागतासाठी मग घराची न अगातही !... गणपती बाप्पाच्या साफसफाई, रग-रंगोटी, मखर बनविण आरास करणं यासाठी एकच गडबड उडते बायकामंडळीची ? मखर बनावेण, आरास टेण्यासाठी चिवडा बायकामंडळीची येणाऱ्या पाहुण्यांना प्रत्यक्ष ह्यो बनविण्याची तारांबळ उडते.

काहीजणांकडे दीड दिवस, काही हमा ... नि साक्षात बाप्पांचं आगमन होतं. दहा दिवस अनंतचतुर्दशी स्या काणी पाच दिवस, सात दिवस,

श्रीगणेशाच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते... मखराला खरी शोभा येते. गणपतीला वहायला पत्री-फुलं-दुर्वा गोळा करण्यासाठी आम्हा मुलांची नेमणूक केलेली असते... येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रसाद देण्याची जबाबादारी देखील आमचीच !

अंडळी गणपतीला लागणारं जास्वंदीच लाल फूल आणि दुर्वा यांना फारमहत्त्व आहे बरं! --. जास्वंद मुळातच औषधी आणि दुर्वादेखील! आणि “ २१ सच ' दुर्वा वाहण्यामागच कारण म्हणजे सूर्योपासनेतल्या सप्तासामाची.

२१ अक्षरं... त्यांच त्या प्रतीक आहेत. त्याला वाहण्यात येणाऱ्या पत्रींमध्ये दुर्वापासून-पिंपळासारख्या मोठ्या वृक्षांचा समावेश आहे. एकपरीनं त्यानं सुचवलंय... ' मी दरवर्षी तुमच्याकडे येणार, दरवर्षी पूजेला हीन्व पत्री लागणार !... तेव्हा या झाडाचं संवर्धन करा... ' दुसरं असं की गरीबातल्या- गरीब भक्ताला सुद्धा ही पत्री वाहणं सहज शक्‍य होतं.

बाप्पाला नैवेद्य लागतो तो एकवीस मोदकांचा !... आरती करुन मोदकांचा प्रसाद आम्हाला मिळणारं असतो. दुपारी चढ्या आवाजात झांजांच्या तालावर आरत्या म्हणायला खूप मजा ( खरं ऊत ) येतो. नाकात मोदकांचा घमघमाट गेलेला असतो. पोटात उंदीर नाचायला लागलेले असतात. पण तरीही आरत्या थांबूच नयेत अस वाटत असतं !

दुपारी-संध्याकाळी घुमणाऱ्या आरत्यांचे स्वर, एकमेकांकडच्या गणपर्तीचं दर्शन घेण्यासाठी होणारी धावपळ... त्यातच कोसळणारा पाऊस. मातीच्या वासात मिसळलेल्या धुपाचा -उदवत्त्यांचा घमघमाट... रात्री चालणारी कीर्तन... भजनं... भारुड. क्चितच चालणाऱ्या गाण्याच्या भेंड्या ( ह्या हल्ली हछी ! ) कधीच थांबु नयेत. असं वाटणारं सारं काही. त्यात नसते अभ्यासाची घाट.

गणपती विद्येची देवता; सैन्याचा अधिपती, एका हातात परशू धारण केलेला, अनेक कलांच तो प्रेरणास्थान आहे, त्याचे चार हात म्हणजे चार दिशा आहेत, या विश्वाचं रंगरूप कुरतडून टाकणारा अंध:कार त्याचं प्रतीक निशाचर उंदीर हे त्याच बाहन आहे.

पण मंडळी हल्ली काही ठिकाणी बाप्पांचं हे रुप बदलूनच टाकलं जातं. वेगवेगळ्या ' पोजेस्‌ ' मध्ये वेगवेगळ्या ( आपल्याला आवडणाऱ्या) रुपात त्याला बनवल जातं. त्याच्या समार आरत्या. त्याही ' रिमिक्स ' करुन वाजवल्या जातात. टिळकांनी गणेशोत्सवाला दिलेलं सार्वजनिक रुप विधायक होतं. याचा विसर पडत चाललेला काही ठिकाणी दिसतो. कसली कसली गाणी ऐकावी लागतात त्या गणरायाला ! नि काय काय पाहव लागतं... ते ही उघड्या डोळ्यांनी

त्याचे बारीक डोळे कोणत्याही गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करणारे आहेत.. नि सुपासारखे त्याचे कान... तो बहुश्रुत असल्याचं सांगतात. तर मोठ्ठं डोकं हे बुद्धिचा सागर ! बुद्धिचा अपार ठेवा ! असलेलं दर्शवतं ! त्याच्याकडून शुभाशीर्वाद मिळावेत. सर्व काही मंगल घडावं.

धन्यवाद

तुम्हाला गणपती मराठी भाषण कस वाटलं (ganesh utsav speech in marathi) हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

निरोप समारंभ मराठी भाषण

माझे आवडते शिक्षक मराठी भाषण

माझी शाळा मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

Post a Comment

Previous Post Next Post