बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण - Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi

हे मराठी भाषण मी बाबासाहेब आंबेडकर वर लिहला आहे. तुम्हाला हे बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण (Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi) नक्कीच आवडेल.

babasaheb ambedkar var marathi bhashan

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

सन्माननीय अध्यक्ष, परिक्षक व गुरुजनांना माझा सविनय सादर प्रणाम.

आकाशी स्वतेजाने तळपणारा सूर्य एक आणि एकच ( त्याच्या प्रकाशाने प्रकाशमान झाले ते चंद्र, चांदण्या... तसाच दलितवर्गात जन्माला आलेला सूर्य एक आणि एकच... त्याच्या बुद्धीच्या, प्रतिभेच्या, कणखर- पणाच्या आणि बाणेदारपणाच्या तसंच निर्भिडतेच्या वृत्तीमुळे तो सर्व जगात स्वतेजाने प्रकाशमान होऊन झळाळू लागला नि मग त्याने आपले कौशल्य पणाला लावून दलित वर्गातील अनेक चंद्र चांदण्यांना आपला प्रकाश दिला... आणि दलित उद्धाराची प्रकाशवाट त्यांना दाखवून दिली... नव्हे तर त्या वाटेवर चालायला गती दिली.

मित्रांनो, या सूर्यांचं नाव आहे " डॉ. बाबासाहेब आंबेडकर" त्यांचे खरे नाव होतं. "भीमराव सकपाळ" रत्नागिरी जिह्यातील मंडणगड तालुक्‍यातील “ आंबवडे  हे त्यांचं मूळ गाव. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला  "महू" या गावी झाला. आईचं नाव भीमाबाई म्हणून त्यांचं पाळण्यातं नाव ठेवलं गेलं 'भीम.' 

त्यांचे वडील रामजी सकपाळ लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या घरी शैक्षणिक बातावरण होते. त्यावेळी संपूर्ण दलितवर्गात मांसभक्षण व मद्यपानाची प्रथा म्हणण्यापेक्षा व्यसनांचे प्रमाण जास्त होते. कारण एकच. अज्ञान ! परंतु बाबासाहेबांचे वडील महात्मा फुले, माधवराव रानडे यांसारख्या लोकांबरोबर ऊठबेस करणारे असल्याने मांसभक्षणही करत नव्हते; वा अन्य कोणतेही व्यसन करत नव्हते. आई-वडिलांच्या उत्तम संस्कारात भीमराव वाढत होते. जात्याच बुद्धिमानी: भीमरावांना समज येताच त्यांनी जाणले होते, की जर आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर एकच अस्त्र आहे ते म्हणजे शिक्षण!

एल्फिन्स्टन कॉलेजमधून चांगल्या मार्काने बी. ए होऊन बाहेर पडलेल्या भीमरावांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी शिष्यवृत्ती देऊ केली. व पुढील शि क्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दाखला मिळवून दिला. आपल्या बुद्धिमत्तेचा व परिश्रमवृत्तीचा कस लावून भीमरावांनी ही शिष्यवृत्ती सा र्थकी लावली. एम. ए. पी. एच. डी. ही डॉक्टरेट डिग्री मिळवून भारतात परत आले ते काहीतरी बनून... ' बार अँट लॉ ही पदवी दिमाखात मिरवत.

पण तरीसुद्धा मायदेशी असलेल्या जातीयवादामुळे त्यांना अनेकदा अपमान, अवहेलना सहन कराव्याच लागल्या. काही काळ सयाजीरावांकडे बडोद्यास ते रवाना झाले. तिथे महाराजांचे लष्करी कार्यवाह म्हणून ते काम करु लागले. पण जातीयवादाचा तिढा अजून तसाच होता... पुन्हा तेच जुने अनुभव.,.! याच अस्पृश्यतेला कंटाळून ते मुंबईला आले. समाजातील दलितांच्या जातीयवादाचा प्रश्न शिक्षणाशिवाय सुटणार नाहीया मताशी ते ठाम होते. त्यासाठी हा वर्ग एकत्रित करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. त्यांच्यातील अस्मिता जागविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.

यासाठी त्यांना मोलाचे सहकार्य मिळालं ते कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजाचं ! त्यांच्या मदतीनं त्यांनी मूकनायक नावाचं एक पाहल्षिक १९२० साली सुरु केलं. दलितांच्या हक्कासाठी.' बहिष्कृत हितकारणी सभा' नावाची एक संस्था देखील स्थापन केली.

पण मूळ प्रश्न होता तो दलितांच्या शिक्षणाचा. ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबरच मिळायला हवे होते. त्याशिवाय समाजसुधारणा घडविणे, अंधश्रद्धा दूर करणे केवळ अशक्य होतं. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने व सहकार्याने याच करिता १९२३ साली त्यांनी लंडन गाठले. अभ्यास, लेखन, शोधप्रबंध कार्य चालूच होते. आता ते लंडन विद्यापीठाचे डी.एस. सी झाले होते. कालांतराने भारतात परत आले; ते दलितांची ' आई ' बनूनच ! शेकडो वर्ष वेठबिगारी करणारा, उपाशीपोटी राबणारा अज्ञानी शूद्र वर्ग, जो सवर्णांकडून उपेक्षित होता... ज्याला देवालयात... शाळात प्रवेश नव्हता.

अंधश्रद्धा रुढी परंपरांच्या विळख्यात अडकला होता... या दुर्लक्षित समाजाला बाबासाहेबांनी एकत्रित केल. संघटित केल. त्यांच्यासाठी शाळा, आश्रमशाळा सुरु केल्या. मानववंश शास्त्राचा नीट अभ्यास केला. शेड्यूल कास्ट फेडरेशन, लीग मजूर संघटना, शेतकऱ्यांच्या सघटना बांधल्या. दलित सत गात प्रखर स्वाभिमानाची ज्वाला आता पेटून उठली. दलितांच्या हक्कांसाठी लढ्यांनी आता वेग घेतला. सारा समाजच ढवळून निघाला.

दोस्तांनो याचेच एक उदाहरंण म्हणजे रायगड जिल महाड येथील ' चवदार तळ्याचा सत्याग्रह... ' हजारो लोकाच्या संख्येने हजारो वर्षांची प्रथा मोडून चवदार तळ्याचे पाणी सर्वांनी प्राशन केले, नि चवदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले झाले. या घटनेने बाबासाहेबांची. सामाजिक बंडखोर ' अशी प्रतिमा देशापुढे निर्माण झाली.

दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. आंबेडकर गोलमेज परिषदेला हजर दलितांबद्दल - त्यांनी दलितांसाठी वेगळ्या मतदारसंघाची मागणी कली. पण ताबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन मान्य नसल्यानेच मोठ्या मनाने न्यांनी आपला हा हट्ट मागे घेतला. दलितांना स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणावर सामिल करणारेही बाबासाहेबच होते.

स्वाभिमाचाने ते खरोखरीच दलितांचे केवारी होते. तरीसद्धा दलितवर्गाने मानाने जगावे, सहानुभूतीने नव्हे ! या मताचे ते होते. स्वतंत्र भारताचे ते कायदामंत्री होते. भारतीय घटनेचे शिल्पकार होते. तरीसुद्धा ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो, त्या हिंदू धर्मात मरणार नाही ! या मताचे होते. गौतम बुद्धांना ते आदर्श मानत होते... म्हणूनच बोद्ध धर्म स्वीकारला, नि ८ डिसेंबर १९५६ ला बुद्धवासी झाले.

प्रचंड जानलालसा असलेल्या बाबासाहेबांनी स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकाग्ले टोन. ' वि शबधुत्व, उदारता, व उदात्तता जगाला पटवून देण्याचा उतम मार्ग म्हणजे प्रेम, बंधुधाव ब मानवता. आपल्यया सर्व समाजाने प्रेमाने, वंधुभावाने राहणे ब मानवता हाच एक धर्म मानून वागणं हीच या थोर नेत्याला खरी आदरांजली ठरेल.

तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण (Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

Read

लोकमान्य टिळक मराठी भाषण

महात्मा गांधी मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post