दिवाळी वर मराठी भाषण Diwali Speech in Marathi
आज मी तुमच्या करीता सम्पुर्ण दिवाळी मराठी भाषण (Diwali Speech in Marathi) भाषेत तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.
दिवाळी वर मराठी भाषण
अध्यक्ष महोदय व उपस्थित मान्यवरांना माझा सविनय नमस्कार
माझ्या सवंगड्यांनो...
' लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योतिया...
अशी न्यारी दिसते दुनिया दिवाळीत ! प्रत्येक घरासमोर लावलेल्या पणत्या, टांगलेले आकाश कंदील पाहिलं की वाटतं, आकाशीच्या चांदण्या पृथ्वीवर उतरल्यात... आकाशही चांदण्यारहित भासू लागतं.
पूर्वीच्या काळी मोठे-मोठे वाडे होते. मोठी-मोठी अंगणं होती. त्यामुळ पणत्यांची रोषणाई केली जाई. मोठ्या -मोठ्या रांगोळ्या काढल्या जातं. हे दृश्य अजूनही खेड्यांतून किंबा छोट्या शहरांतून दिसतं. पण आम्हा मुंबईत राहणाऱ्या मुलांना ही पणत्यांची रोषणाई नि मोठ्ठी रांगोळी याची हौस मात्र थोडक्यातच भागवावी लागते. तीच गत किल्ला बनवण्याची ! हां पण एक मात्र आहे हल्ली मुलांची ही अडचण लक्षात घेऊन ' रांगोळ्या' नि ' किल्ले ' तयार करण्याच्या स्पर्धा अनेक मंडळ आयोजित करतात. मग आम्ही मुलसुद्धा हिरीरीनं त्यात भाग घेतो... नि होस भागवून घेतो.
एकदा मी माझ्या आजीला विचारलं, “ आजी दिवाळी दिवे लावून का गं साजरी करायची ? ' अरे प्राचीन काळी आर्य लोक जेव्हा उत्तर धुवाकडे राहत होते ना तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली बरं... त्यांनीच केली सुरुवात. आजी म्हणाली, “ शिवाय काही लोक असं सुद्धा मानतात की रामानं रावणावर विजय मिळवला नि ते अयोध्याला आले तेव्हा अत्यानंदांनी दिवे उजळवून अयोध्यावासियांनी सारी अयोध्यानगरी दिव्यांनी उजळवली. आनंदाच्या सणाच्या समयी उजळणं ही तर आपली प्रथाच आहे. '' “ मग या सणाला 'दिवाळी' असंच नाव का ? ' “ दिवाळं काढते ती दिवाळी. '' आजी हसत हसत म्हणाली, ““ही गंमत हो ! अरे, 'दिवाळी' म्हणजे 'दिव्यांच्या ओळी' 'दुसरं नाव दीपावली ' दिव्यांचा सण म्हणून त्याचं नाब दिवाळी ! ''
खरंच ! वर्षभरात करत नाहीत एखढे तिश्यट-गोड पदार्थ आपण दिवाळीत बनवतो... आपण फ्ाणजे भाई खगैरे... लाड-करंज्या- शंकरपाळी -वेगवेगळे लाडू. हलवे-चकली -शेव- चिवडा, नाय तरी किती घ्यावीत ? सगळा तेला -तुपाचा खेळ ! आई-ताई- काकृ-आजी बिचाऱ्या घामाघूम होतात बनवताना ! आमचं काय घराची साफसफाई नि स्वरेदी उरकली की आम्ही मोकळे. पदार्थांवर ताव मारायला नि फटाके उडवायला!
मंडळी, पण या पाच दिवस चालणाऱ्या सणांच्या पाचही दिवसांना फार महत्त्व आहे बरं ! पहिला दिवस “धनत्रयोदशी ' वर्षभर कमावलेल्या धनाची प्रतिकात्मक रुपया मांडून पूजा केली जाते... विधीवत –साग्रसंगीत पूजा... धणे-गुळाचा, लाडू करंज्यांचा नेवेद्य दाखविण्यात येतो. हा या धनाला घरधन्यानं दिलेला मान असतो. दुसरा दिवस नरक- चतुर्दशी ' भगवान श्रीकृष्णानं नरकासूराचा वध केला नि सोळा हजार मुलींची त्याच्या बंदीवासातून सुटका केली. ही गोष्ट तर तुम्हाला सर्वांनाच चांगूनीा परिचित आहे. त्या नरकासूराच्या दुष्ट प्रवत्तीचं प्रतीक म्हणून घरातल्या पुरुषांनी अंघोळीच्या वेळी चिराट ' हे विषारी फळ पायानं फोडण्याची प्रथा आली असावी. त्या नरकासूर दैत्याचा विनाश झाला. सारेच जण आनंदले म्हणून अभ्यंगस्नानाची प्रथा आली असावी. .
तिसरा दिवस लक्ष्मीपूजन ' लक्ष्मीची घरोघरी पूजा केली जाते. व्यापारी वर्ग चोपडीपूजन करतात. प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या नि बत्तासे वाटले जातात. खरं तर या दिवशी अमावस्या असते. चोथो दिवस बलिप्रतिपदा. व्यापारी वर्गाचा व्यापाराचा नवा दिवस ! साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त ! बलि ' ला भगवान विष्णून पाताळात पाठवलं तो हाच दिवस ! या दिवशी पती ' ला “पत्नी ' ओवाळते. आणि आपल्या गृहलक्ष्मीचा सन्मान म्हणून एखादी भेटवस्तू पती आपल्या पत्नीला ओवाळणीत घालतो.
पाचवा दिवस “ भाऊबीज. ' प्रत्यक्ष ' यम ' सुद्धा आपल्या बहिणीकडून “ यमी ' कडून या दिवशी ओवाळून घेतो म्हणे ! यादिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते. त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला प्रेमाची ' भेट ' देतो.
हे सगळे दिवस... त्यांची महती पाहिली तर आपली हिंदू संस्कृती किती महान आहे ते लक्षात येतं. फराळाच्या निमित्तानं एकमेकांना आमंत्रित करणं म्हणजे सामाजिक एकोपा-स्नेह वाढवणं. पाडवा-भाऊबीज म्हणजे परस्परांतील नात्यांचा आदर करायला शिकवणारे नाती दृढ करणारे दिवस! पण आपण समजतो दिवाळी म्हणजे शाळेला सुट्टी ! फटाके, खरेदी नि मजा!...
मंडळी, पण तसं नाही. आपल्या समाजात कितीतरी जण असे आहेत. जे दिवाळीचा सण साजरा करु शकत नाहीत. कितीतरी खेडी अशी आहेत जिथं बीज नाही... आपण आनंदात दिवाळी साजरी करतो , तेव्हाते अंधारातच असतात ! याचा विचार करणं आपली आपल्या पिढीची जबाबदारी आहे. तुम्ही ' गोट्या ' आणि ' चिंगी ' ची ' दिवाळी' बाचलीय का ? तसं काहीतरी आपण सुद्धा करु शकतो ! बरोबरना! '
तीच गोष्ट फटाक्यांची. हल्ली शहरात मोकळ्या मैदानावर एकाच ठिकाणी फटाके विकण्याची सक्ती असते. .. पण फटाके वाजवण्याचं काय? आपण ते कुठेही-कसेही नि कितीही वेळ वाजवतो. मग त्यामुळ होणारं... आपल्या नि इतरांच्या इमारतींच नुकसान, आजारी-वयोवद्ध माणसांना होणारा त्रास या गोष्टी आपल्या ध्यानात येऊ नयेत... इतके आपण आपल्यात मशगुल झालेले असतो.
आपण घेतो ते शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवतं. ते विचार आपण आचरणात आणले
पाहिजेत.
जाताजाता तुम्हाला एक सुचवतो हं... माझा दादा नि त्याचे मित्र आपापल्या वडिलांना
विचारतात, “ दिवाळीत किती रुपयाचे फटाके घेणार? एकूण खर्च किती करणार ?... मग
त्यातले अमुक एवढे रुपये ते मागून घेतात. आपल्या जवळच्याच गावात एक अनाथश्रम आणि
वृद्धाश्रम आहे. तेवढ्या रुपयांचा खाऊ फटाके , आकाशकंदील, पणत्या, रांगोळी घेऊन
ते तिथं जातात. त्या मुलांच्या नि आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंदीत
होतात !
मला वाटतंय असा विचार सर्वांनीच केला तर गोर-गरीब-दीन-दुःखी सारेचजण अश्विनच्या शेवटात नि कातिकाच्या सुरुवातीला आनंदानं खऱ्या अर्थानं म्हणू शकतील...
आली माझ्या घरीही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली... !
धन्यवाद
तुम्हाला दिवाळी मराठी भाषण (Diwali Speech in Marathi) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
Read
Post a Comment