१५ ऑगस्ट मराठी भाषण | 15 August Speech in Marathi
आज मी तुमच्या करीत सम्पुर्ण १५ ऑगस्ट मराठी भाषण (15 August Speech in Marathi) तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला १५ ऑगस्ट मराठी भाषण (speech on independence day in marathi) नक्की आवडेल.
१५ ऑगस्ट मराठी भाषण
आदरणीय गुरुजनवर्गास सादर प्रणाम !
मित्रांनो, जानेवरी महिन्यातली गोष्ट. २६जानेवारीचा झेंडावंदन' समारंभ संपला; नि आम्ही काही मित्र-मित्र शाळेच्याच पटांगणात खेळत बसलो. वाऱ्याच्या झोक्यानं झेंडा फडफडत होता. त्याच्या फडफडणाच्या आवाजानं आम्हा सर्वांचचं लक्ष तिकडं गेले. माना उंच करुन आम्ही झेंड्याकडे पाहू लागलो... इतक्यात !...
हा झेंडा आपला स्वतंत्र भारताचा आहे भाऊ १९४७ साली हा मुक्त फडकला... त्याला आता ५९ वर्ष झाली. या झेंड्यांला चैनीची सवय नाही बरं ! हजारो घरात बारशाचे समारंभ होतातच की, पण... हा पेढे, बर्फी खायला कधी गेला नाही.
पण हुतात्म्यांच्या श्राद्धाला जायचा... यानं कधी कंटाळा केला नाही. आलंना!... याच्याही डोळ्यात पाणी आलं त्यावेळी... पण... आपल्याकरता सगळं पाणी पृथ्वीला देऊन टाकणाऱ्या आकाशात जायचं होतं त्याला ! तो म्हणायचा... कुणाच्याही डोळ्यातलं पाणी नकोय मला अंगातून उसळणारं रक्त हवंय... आजही ! '
प्रश्नार्थक नजरेनं “ कोण बोलतंय ?...तू ? ' ' तू नाही मग कोण? आम्ही एकमेकांकडे पाह लागलो... तेवढ्यात !... ' अरे मुलांनो, शू...हॅलो !... मी बोलतोय; तुमच्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज! ... आम्ही स्वप्नात तर नाही ना !... याची खात्री पटवायला हाताला चिमटा काढून पाहिला. नाही खरंच प्रत्यक्ष राष्ट्रध्वज आमच्याशी बोलत होता. आम्ही घाबरुन पळू लागलो... “ अरे, पळू नका थांबा.! आज खूय वर्षांनी मला कुणाशीतरी बोलावं वाटतयं.
नाहीतर माझ्यासाठी कुणाला वेळच नसतो ! मला सलामी देऊन तुम्ही निघून जाता आपापल्या उद्योगांना.नाहीतर चक्क फिरायला ! ' आम्ही ऐकतच राहिलो खरंच आहे की ! “ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झालाय आजकाल !... अरे हे आपले राष्ट्रीय सण. या दिवशी इतर सणांप्रमाणे घरात गोड-धोड करावं. स्वातंत्र्यासाठी लढलेल्यां-हुतात्मा झालेल्या त्या बीरांना स्मरुन श्रद्धांजली वहावी; याही सणांच्या एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, ' हो ! सगळं खरं. पण मला एक सांग, उद्या आम्ही शाळेत येतो ; तेव्हा तू इथून परत नाहीसा होतोस. तू जातोस कुठं ?... ' आम्ही विचारलं ( एव्हाना आमचा धीर चेपला होता.
“ मला एकट्याला सोडून तुम्ही जाता. मग शाळेतलंच कुणीतरी येतं नि मला सूर्यास्ताच्यावेळी उतरवून घेतं. घडी घालून बंद कपाटात ठेऊन देतं. मग मी पुन्हा डौलानं फडकण्याची माझ्या भारताचं नाव सार्थकी लावण्याची वाट पहात राहतो ! मुलांनो, तुम्हाला माहितेय कारे ? सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज लावतात. तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असावा लागतो. आणि फक्त १५ ऑगस्ट २६ जानेवारीलाच नाही तर सर्व सरकारी सुट्या, रविवारी देखील मला फडकवायला पाहिजे. अगदी तशीच विशेष घटना असली तर रात्री देखील मला फडकवता येतं.
राष्ट्राचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे आणि राष्ट्रासाठी फडकत राहणं माझा मान आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची. माझं आरोहण करताना मी झर्रकन वर चढायला हवा... पण मला खांबाबरुन उतरवताना मात्र विधीपूर्वक हळूहळू उतरवायला हवं ! केशरी रंगाचा पट्टा बर असावा. मला सरळ रेषेत ठेवणं शक्य नसेल. तर केशरी रंग माझ्या उजव्या हाताला असला पाहिजे... तुम्हाला या रंगांचे अर्थ माहिती आहेत कारे?
होय ' आम्ही उत्तरलो, केशरी रंग त्यागाचा, पांढरा रंग शांतीचा, हिरवासमृद्धीचा. चोबीस आरे असलेलं अशोक चक्र. दिवसाच्या चोबीस तासाची गतीमानता !..
“ अगदी बरोबर ! "' राष्ट्रध्वज पुन्हा बोलू लागला. पूर्वी या अशोकचक्राच्या जागी... पूर्वी म्हणजे राष्ट्रध्वज ही संकल्पना भारतासाठी अस्तित्वात आली त्यावेळी बापूजींचा चरखा, राष्ट्रफूल कमळ ही चित्रे पांढऱ्या रंगावर होती. पण नंतर अशोक चक्र मध्यभागी ते ही निळ्या रंगांच असलेला राष्ट्रध्वज सर्वसंमत झाला. '
' तुम्हा मुलांना कधी-कधी मला फुलांनी सजवण्याचा मोह होतो. पण फुलं, हार, चिन्ह किंवा इतर कोणतीही वस्तू ध्वजदंडाच्या टोकावर लावायची नसते. तसंच माझ्यासारख्या रंगांची रचना करुन फॅशन म्हणून कपडे वापरताना काहीजण दिसतात. तो माझा अपमान आहे. पण जेव्हा एका हुतात्म्याला मी आच्छादून घेतो. तो माझा मान असतो. आज सकाळी तुम्ही म्हटलेली देशभक्तीपर गाणी मला खृप आवडली. मनापासून गात होतात तुम्ही,
' झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान करतो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम
पण मागच्या वेळी इथंच कुठं तरी सांस्कृतिक कार्यक्रम होते. ' वंदे मातरम् ' या आपल्या राष्ट्रगीताचं ' रिमिक्स ' करुन त्यावर पा श्रात्य पद्धतीनं काय विचित्र नाचत होती ! शरमेनं मान खाली गेली माझी ! अरे, ही राष्ट्रगीत म्हणायचं स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कित्येकांनी आपले प्राण पणाला लावलेत ! माझ्याबाबतीतही तेच.
' डुमारतींच्या आधाराने झेंडे फडकू लागले इमारती मोठ्या झाल्या. झेंडे लहान झाले. अंथरले जाऊ लागलेत पायघड्यांसारखे या विदेशी संस्कृतीला आमंत्रित करण्यासाठी हेंडेही नाचू लागलेत माइकल जॅक्सन ' च्या तालावरती...
...अरे, ' कागदी रुपाचा ' माझा असा गैरवापर माझया म्हणजेच एका परीन आपल्या राष्ट्राचा असा अपमान नकारे करु. आज वर्तमानपत्रात माझ्या चित्राखाली उपहासात्मक ओळी छान आल्यात बघा.
वस्तीत पोरगा नंगा, मस्तीत घाली दंगा.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला ' तडफडतो की फडफडतो मेरा प्यारा तिरंगा '
हीच तर माझी व्यथा !' असं म्हणून झेंडा राष्ट्रध्वज पुन्हा शांतपणे फडफडू लागला... राष्ट्रध्वज आमच्याशी बोलला म्हणून आम्ही स्वत:ला भाग्यवान समजू लागलो... पण एक निश्वयही केला राष्ट्राचा नि राष्ट्रध्वजाचा अपमान करायचा नाही. सहनही करायचा नाही. यासाठी आपल्या पिढीचीच एक पलटण तयार करायची ! " झेंड्याच तेज आता आमच्या डोळ्यात सामावत नव्हतं !
धन्यवाद
तुम्हाला १५ ऑगस्ट मराठी भाषण (15 august marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
Post a Comment