तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो पावसाळा मराठी निबंध (Essay on rainy season in marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

Rainy Season Essay in Marathi

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "पावसाळा" किंवा "वर्षा ऋतू" मराठी निबंध.


पावसाळा मराठी निबंध 

पाऊस किती लहरी ! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय ! पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते, कोण जाणे ! जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करीत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

एके दिवशी अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. ' आला, आला, पाऊस आला !' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरे थेब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला, तसा अचानक थांबला.

केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टबटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! असा हा किमयागार पहिला पाऊस !!


पावसाळा मराठी निबंध 

पावसाळा मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


धन्यवाद
तुम्हाला पावसाळा मराठी निबंध (Rainy Season Essay in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

Read

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक निबंध

माझे बालपण निबंध

माझी आई निबंध मराठी मधे

Post a Comment

Previous Post Next Post