तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो माझी आई मराठी निबंध (My mother essay in marathi) , सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "माझी आई" किंवा "आई वर मराठी निबंध"
माझी आई निबंध
वर्गात सर ' दूरस्थ मातेस' ही कविता शिकवताना रंगून गेले होते. आईच्या आठवणींनी कवींच्या व्याकूळ मन :स्थितीचे वर्णन सर करीत होते. ते सांगत होते.... जोपर्यंत आई जवळ आहे, तोपर्यंत तिची किंमत आपल्याला कळत नाही. तिच्यापासून दूर झाल्यावरच तिची किंमत कळते. तोपर्यंत आपण तिचा विचारही करीत नाही. हे सर्व ऐकत असताना माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईची मूर्ती तरळू लागली. आईची दिवसभराची धावपळ दिसू लागली.
आई सकाळी साडेपाचला उठते. सर्वप्रथम माझी व ताईची शाळेची तयारी करते. आमची खाण्यापिण्याची , कपड्यांची तयारी झाली को, त्या दिवशी शाळेतील प्रकल्प वगैरे साहित्य घेतले ना किंवा वेळापत्रकानुसार अभ्यास करून वह्यापुस्तके घेतली ना, हे पाहते. सकाळी न्याहरी केलीच पाहिचे हा तिचा दंडक, न्याहरी केली नाही, तर तिला रागच येतो.
मग ती स्वतःच्या व बाबांच्या जेवणाच्या डब्यांची तयारी करते. आमच्या दुपारच्या जेवणाचीही तयारी करून ठेवते. या काळात विजेच्या वेगाने तिच्या हालचाली होतात. कोणी कामचुकारपणा केलेला तिला खपत नाही.
माझी आई अनेक आघाड्यांवर लढत असते. घरातल्या सगळ्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था तीच पाहते. ती नोकरीही करते. संध्याकाळी परतल्यावर पुन्हा घरकामाला जोडून घेते. मी मनातल्या मनात घरातली कामे मोजली. जेवणखाण करणे, काय शिल्लक आहे व काय आणायचे ते पाहणे, कपडे धुणे, ते इस्त्रीला देणे, झाडलोट करणे, पाहुण्यांची ऊठबस करणे वगैरे सर्व मिळून पन्नासच्या वर कामे होतात. या सर्वांची ती सुरेख व्यवस्था लावते. काहीही अस्ताव्यस्त पडलेले असले की ती चिडतेच.
माझ्या आईचा विशेष म्हणजे ती समानता हे तत्त्व मानणारी आहे. घरात ताईबरोबर मलाही कामे करायला लावते. कधी कधी मला कंटाळा येतो. पण “नाही म्हणण्याची' माझी टापच नसते. मी गृहपाठ कोणता लिहून आणला, नाही तर तिची दम मिळतोच. तिला सर्व गोष्टी जागच्या जागी आणि वेळच्या वेळी हव्या असतात. याचा काही वेळा आम्हांला खूप त्रास होतो. पण कोणाचेही काहीही चालत नाही.
ती आमच्या करिअरचा बारकाईने विचार करते. तसाच स्वत:बाबतही करते. तिच्या ऑफिसची कोणती ना कोणती परीक्षा सतत चालू असते. बाबांच्याही कसल्या ना कसल्या परीक्षा चालू असतात. आम्ही सर्व गोष्टी पद्धतशीर पार पाडल्या, तर ती खूश होते आणि भरपूर लाडही करते. ती आमच्यासाठी कपडेलत्ते उत्तमोत्तम निवडते. स्वतःसाठी व बाबांसाठीही दर्जेदारच कपडे हवेत, असा आग्रह धरते.
खरे सांगायचे तर तिला दर्जेदार जीवनाची ओढ आहे. आम्हांलाही दर्जेदार करण्याचा प्रयत्न करणारी माझी आई दर्जेदारच आहे.
माझी आई निबंध PDF
माझी आई निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
धन्यवाद
तुम्हला माझी आई निबंध (mazi aai nibandh) कसा वाटलं कंमेंट करून
आम्हाला कडवा आणि याला आपल्या मित्रानं सोबत share करा.
Read
Sachin chougule
ReplyDeletePost a Comment