तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो माझे बालपण मराठी निबंध, (My childhood essay in marathi) सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

Majhe Balpan Essay in Marathi

माझे बालपण या विषयावर निबंध तुम्हाला नक्की आवडेल आणि सोबत तम्ही माझे बालपण निबंध पडफ पण डाउनलोड करू शकता. 


माझे बालपण निबंध 

'तारे जमीन पर' मधल्या इशानची अवस्था हृदयद्रावक होती. ती पाहून मन गलबलले. स्वतःला नेमके काय होत आहे, हे तो सांगू शकत नव्हता. त्याचा कोंडमारा झाला होता. काय असते पाहा एकेकाचे बालपण ! त्याच्याएवढा असताना कसा होतो मी ? काय करीत होतो ? मला माझे बालपण तसे स्पष्टपणे काही आठवत नाही. काही प्रसंग धुसरपणाने आठवतात. तुकड्या-तुकड्याने काही काही आठवते.

एकदा एक धमाल चित्रपट पाहिला होता बाबांबरोबर. मी समोर बसलो आहे आणि जंगलातले प्राणी माझ्या समोर, माझ्या अवतीभोवती वावरताहेत. जरा हात लांब केला, तर हातालाच लागतील इतक्याजवळ ! एक माकड तर ज्ञेपावले ते थेट माझ्यावरच ! मी घाबरून जोराने ओरडलो आणि खुर्चीतच वाकून लपण्याचा प्रयत्न केला. ही स्थिती त्या चित्रपटगृहातील सर्वच मुलांची झाली होती. टाळ्या, हशा, आरडाओरड, किंकाळ्या यांनी ते चित्रपटगृह अडीच तास दणाणून गेले होते. कालांतराने मला कळले की, तो त्रिमिती (थ्री-डी) चित्रपट होता.

अशा काही तुरळक आठवणी अधूनम धून जाग्या होतात. मात्र, सहावी-सातवीपासूनचें मला बर्‍यापैकी आठवते. सकाळी आमच्या घरी माझी शाळेत जाण्याची गडबड असायची. त्यानंतर आईबाबा दोघेही ऑफिसला जायचे. मी दुपारी घरी परते, माझी देखभाल करायला एक मावशी यायच्या. त्यांचे नाव वसुधा मावशी. त्या माझे जेवणखाण व कपडेलत्ते यांची काळजी घ्यायच्या. थोड्याच वेळात क्लासला जाण्याची वेळ व्हायची.

संध्याकाळी क्लासहून आल्यानंतरचा वेळ हा खरा माझा असायचा. फूटबॉल व पकडापकडी हे आमचे आवडते खेळ होते. क्रिकेटही अधूनमधून खेळायचो. विशेष म्हणजे आम्हा मित्र-मैत्रिणीमधील प्रत्येकाकडे सायकल होती. आमच्या कॉलनीत आमच्या इतक्या फेऱ्या झाल्या आहेत की, मला वाटते आमच्याइतकी आमची कॉलनी कोणाला माहीतच नसेल! आम्ही सायकलची मंदगती स्पर्धा सतत घ्यायचो. द्रुतगतीपेक्षा मंदगती स्पर्धेत खूप मजा यायची.

आमच्या कॉलनीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोजागिरी पोर्णिमा, दिवाळी पहाट, नववर्षारंभ हे प्रसंग साजरे केले जातात. तसेच, सत्यानारायणाची पूजा, गणेशोत्सव, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन इत्यादींच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मी तर अनेक स्पर्धांमध्ये व नाटकांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत !

दहावीच्या वर्षात मात्र या सर्व गोष्टींमध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आम्ही दहावीवाल्या मित्र-मैत्रिणींनी बोर्डाच्या परीक्षेनंतर सर्वांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरवले आहे.


माझे बालपण निबंध PDF

माझे बालपण निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


धन्यवाद 

तुम्हाला माझा बालपण(Majhe Balpan Nibandh) हा निबंध कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

Read

पावसाळा मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक निबंध

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

माझी आई निबंध मराठी मधे

Post a Comment

Previous Post Next Post