तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो झाडांचे महत्व मराठी निबंध (Jhada Che Mahatva Nibandh), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता. मला खात्री आहे तुम्हाला झाडाचे महत्त्व मराठी निबंध (Importance of Trees Essay in Marathi) पसंद येणार.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते वृक्षांचे महत्व निबंध किंवा झाडाचा निबंध
झाडाचे महत्त्व निबंध
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा ' हा 'वसुंधरा दिना चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे.
केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.
पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. ' सामाजिक वनीकरणा 'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग ? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या रोपट्यांतील फारच थोडी रोपटी जगतात; मोठी होतात.
यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे -' एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट द्यावे. नवीन बालक जन्माला आले को, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.
शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून ' एकतरी झाड जगवा ' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा ' हरितश्यामल ' बनेल.
झाडाचे महत्त्व निबंध PDF
झाडांचे महत्व मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तुम्हाला झाडाचे महत्त्व मराठी निबंध (Importance of Trees Essay in Marath) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.
Read
Post a Comment